सर्वोत्कृष्ट चित्रपट
चित्रपटासाठी ह्या वर्षी विशेष अशी चुरस नव्हती. Martian आणि Revenant हे दोन्ही चित्रपट बिग बजेट वाले होते आणि त्यांनी बराच गल्ला कमावला होता. पण बाजी मारली ती Spotlight ह्या चित्रपटाने. ख्रिस्ती पाद्र्यांनी बोस्टन शहरांत लहान मुलांचे लैगिक शोषण चालवले होते आणि २००३ साली Spotlight ह्या बोस्टन ग्लोबच्या पत्रकारांच्या चमूने त्याचा परदा फाश केला. ह्या सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित होता.