समकालीन मिडीयात
बोनी व क्लाईड आधुनिक समाजाचे सर्वात पहिले चर्चीले गेलेले अपराधी होते. एप्रिल 1933 ला जेव्हा ते कोणत्याही सामानाशिवाय पळाले होते तेव्हा तेव्हा पोलिसांना डेव्हलप न केलेले बरेच फोटो सापडले होते. रोल डेव्हलप केल्यानंतर फोटोंमध्ये या दोघांबरोबर जोन्स बंदुक आणि पिस्तुल घेऊन वेगवेगळ्या अवस्थेत दिसला. बोनीची कविता 'सुसाईड साल' सगळ्या लोकप्रिय पत्रकांत छापून आली.
छापा पडल्याच्या दोन दिवसांनतर कविता आणि फोटो सगळ्या पेपरांमधे छापून आले. यामुळे 'बैरो टोळी' पुर्ण अमेरिकेत प्रसिद्ध झाली. ही बहुचर्चित केस एका वरदानासारखी होती. यामुळे आयुष्य आणखी कठीण आणि धोकादायक झालं. जसजसे फासे पडत गेले तशी पार्करने 'द ट्रेल्स एंड' नावाची कविता लिहीली जी नंतर 'द स्टोरी ऑफ बोनी एंड क्लाईड' या नावाने ओळखली जाऊ लागली.