Get it on Google Play
Download on the App Store

द किलर क्लाउन भाग १

"द क्लाउन डॉल", "द किलर क्लाउन","इट द क्लाउन","द क्लाउन सिरीअल किलर" या नावाने हि ओळखले जाते.

ताम्रा एस नामक वाचकद्वारा सांगितल्या प्रमाणे डिसें २२, २००४:
अमक्या तमक्या ची मैत्रीण, एक किशोर वयीन मुलगी, न्यूपोर्ट बीच सीए येथे एका कुटुंबासाठी  बेबी सिटींग चे काम करत होती. ते कुटुंब श्रीमंत  होते आणि त्यांचे खूप मोठेसे असे घर हि होते - म्हणजे तुम्हाला अंदाज आलाच असेल कि क्रमवारीने असलेल्या अनेक  रूम. असो तर पालक उशिरा रात्रीच्या जेवणासाठी/ सिनेमासाठी जाणार होते. वडिलांनी बेबी सिटींग करणाऱ्या मुलीला सांगितले कि मुले झोपी गेली कि तिने अमुक एका रूम मध्ये जाउन टीव्ही पाहत बसावे( त्यांना तिने घरामध्ये कुठे हि इतरत्र फिरत बसलेलं आवडणार नव्हत.)

आई - वडील बाहेर पडताच , तिने लवकरच मुला झोपविले आणि ती टीव्ही पाहण्यासाठी रूम मध्ये जाते. ती टीव्ही पाहण्याचा प्रयत्न करत असते पण कोपर्यामध्ये असणाऱ्या एका विदूषकाच्या पुतळा पाहून तिला अस्वस्थ वाटायला लागते. तिला जितका अधिक वेळ शक्य होत , तोपर्यंत तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तो पुतळा तिचे इतके लक्ष वेधून घेत होता कि तिला ते नकोसे वाटायला लागले.

ती मुलांच्या वडिलांना फोन करते आणि विचारते, "" मुले बेडरूम मध्ये आहेत, पण मी जर रूम बदली केली तर तुमची काही हरकत नसेल न ? या रूम मधील विदुषकाचा पुतळा मला खूपच भीतीदायक वाटत आहे.

वडील गंभीरपणे उत्तरले, "मुलांना घेऊन शेजार्यांकडे जा आणि ९११ वर फोन कर "

तिने विचारले , "काय चालू आहे ?"

त्यांनी पुन्हा उत्तर दिले, "तू शेजारी जा आणि एकदा का पोलिसांना फोन केलास कि लागलीच मला हि फोन करून कळव "

तिने मुलांना घेतले आणि ती शेजारी गेली , आणि पोलिसांना कळविले, जेंव्हा पोलिस त्यांच्या मार्गावर होते , तिने पुन्हा मुलांच्या वडिलांना फोन केला आणि विचारले," नेमक काय झाल  आहे?"

त्यांनी सांगितले कि, "आमच्या घरात मुळी विदुषकाचा पुतळा च नाहीये." त्यांनी पुढे सांगितले, मुलांनी ते झोपलेले असताना त्यांना एक विदुषक पाहत असल्याचे सांगितले होते. पण त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मुलांनी काही तरी स्वप्ने पहिली असावीत असा  विचार करून त्यांचे म्हणणे साफ उडवून दिले.

पोलिस आले आणि त्यांनी त्या "विदुषकाला " अटक केली जो कि एक फारच साधारण असा मनुष्य निघाला. एक लहानखुरा साधा विदुषक ! मला अस वाटत , कि तो कोणी तरी बेघर मनुष्य असावा ज्याने विदूषकाचे कपडे घातलेले होते, त्याने कसा तरी घरामध्ये शिरकाव केला होता आणि तो गेल्या काही दिवसांपासून त्याच घरामध्ये राहत होता. तो बहुधा रात्रीचा मुलांच्या रूम मध्ये जात असावा आणि ते झोपलेले असताना त्यांना पाहत असावा. घर इतके मोठे होते, कि त्याने सहजरीत्या स्वतःला लपविले होते, आणि त्यांच्या खाण्यावर जगात होता. तो टीव्ही रूम मध्ये च होता जेंव्हा बेबी सीटर हि त्याच वेळी रूम मध्ये आली, त्याला स्वतःला लपविण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नसावा म्हणून मग तो तिथेच थिजून राहिला आणि त्याने पुतळा असल्याचे सोंग घेतले.

मेलेला मित्र
एक मुलगी आणि तिचा मित्र त्याच्या कार मध्ये प्रणयाधीन होती. त्यांनी झाडांमध्ये पार्किंग केलेले होते जेणेकरून ते कोणाच्या दृष्टीस पडावयास नको. जेंव्हा त्यांचे उरकले , मुलगा लघवीसाठी कार च्या बाहेर उतरला आणि मुलगी सुरक्षित अशी कार मधेच त्याची वाट पाहत होती.

पाच एक मिनिट वाट पहिल्या नंतर,ती तिच्या  मित्राला पाहण्यासाठी कार मधून खाली उतरली. अचानकपणे, तिने सावलीमध्ये एका माणसाला पहिले. घाबरून ती पुन्हा कार च्या आत येउन बसली आणि कार चालावयास घेणार तोच तिला अस्पष्टसा आवाज ऐकायला आला..ची ... ची ... ची ...

हा प्रकार पुढचा काही वेळ चालू होता, जो पर्यंत मुलीने हे ठरवले कि तिला इथून निघून जाण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय उरला नाहीये.तिने तिलाशाक्य होते त्या शक्तीनिशी गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण  कार इंचभर हि हलली नाही,कारण कोणी तरी कार ला तीच्या बम्पर पासून जवळच्याच एका झाडाला एका दोराने बांधून ठेवलेले होते.

असे असले तरी , पुन्हा पुन्हा तिने एक्सेलटर वर पाय दिला आणि तिला एक मोठी किंकाळी ऐकायला आली. ती कारच्या बाहेर आली आणि तिला जाणवले कि तिचा मित्र झाडाला लटकत आहे. तो ची ची असा आवाज त्याच्या बुटांचा होता जो कि झाडाच्या टोकाशी घासला जाऊन येत होता !!!

एके रात्री एक महिला आणि तिचा मित्र  कुठून तरी ( ते इथे महत्त्वाचे नाही आहे) त्यांच्या घरी निघाले होते आणि अचानक त्यांच्या कार मधले पेट्रोल संपले. पहाटेचे एक वाजलेले होते आणि ते कोणी हि नाही अशा निर्जन ठिकाणी पूर्णपणे एकटे होते.

मुलगा कार मधून खाली उतरला आणि आश्वासक आवाजात त्याच्या मैत्रिणीला म्हणाला , " काळजी करून नकोस . मी हा आलोच. काही मदत मिळते का हे पाहायला जातो आहे. तरी तू दार लॉक करूनच बस."

तिने दरवाजे बंद केली आणि ती बैचेन पणे तिथे बसून राहिली, तिच्या मित्राची परत येण्याची वाट पाहत. अचानक, तिला तिच्या मांडीवर कसलीशी सावली दिसून आली. तिने वर आकाशामध्ये पहिले ... पण तिचा मित्र नव्हे तर कोणी तरी अनोळखी, वेडसर मनुष्य तिच्या दृष्टीस पडला. त्याच्या उजव्या हातामधून तो काही तरी हलवीत होता.

त्याने त्याचा चेहरा खिडकीच्या काचेजवळ आणून चिकटवला आणि हळुवारपणे त्याने त्याचा उजवा हात वर केला. त्या हातामध्ये तिच्या मित्राचे शिरच्छेद केलेले, भयानक रित्या वेदनादायक आणि अचंबित झालेले आणि पिरगळलेले मुंडके होते. तिने घाबरून स्वतःचे डोळे बंद केले जेणेकरून ते दृश्य नजरेआड व्हावे. जेंव्हा तिने तिचे डोळे उघडले, तो माणूस तिथेच होता, दात विचकत एखाद्या मनोविकार सारखा. त्याने हळुवार पणे त्याचा दावा हात उंच केला आणि त्याने त्या हातात मित्राच्या किल्ल्या धरलेल्या होत्या...ज्या कि त्याच्या कार च्या होत्या.

एरिन कॅफे ने संपूर्ण कुटुंब ठार केले
एरिन कॅफे ची एक इच्छा होती:  तिला तिच्या मित्रा सोबत, जेम्स विकिंसन सोबत बाहेर जायचे होते. पण तिचे आई वडील यासाठी तयार नव्हते. त्यामुळे तिने पावले उचलायचे ठरवले आणि संपूर्ण कुटुंबाला च ठार केले. मार्च २००८ मध्ये, एरिन कॅफे चा मित्र आणि त्याचा एक जवळचा मित्र, वेड,  या दोघांनी पहाटेच्या सुमारास कुटुंबाच्या  घरावर  हल्ला केला. तिच्या आईला ठार करण्यात आले तिच्या वडीलाना अतिशय वीत रित्या अपंग केले गेले. तिचे दोन भाऊ , मॅथ्यू आणि टेलर, यानाही विचित्र अशा पद्धतीने ठार करण्यात आले. मॅथ्यू ला डोक्यामध्ये गोळी  झाडण्यात आली आणि तोपर्यंत वेड ने आणि विकिंसन ने टेलर भोसकविले. त्या नंतर त्यांनी घराला आग लावायला घेतले. जे कोणी यामध्ये सहभागी होते त्या सगळ्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आणि सर्वाना विस्तारित तुरुंगवास देण्यात आला.

किशोरवयीनने आईला बेड मध्ये ठार केले

१४ वर्षीय मुलगा, जोशुआ स्मिथ ने , स्वतःच्या आई ला गोळी झाडून ठार केले जेंव्हा ती सोफ्य्वर झोपलेली होती.डेट्रोइट मध्ये वाढलेल्या, जोशुआ ने स्थानिक थागांशी संधान साधण्याचा आणि स्ट्रीट क्रेड घेण्याचा प्रयत्न केला. त्याची आई, तामिको रॉबिन्सन, एक मेहनती महला होती जिला त्याला जपायचे होते आणि यशस्वी होताना पाहायचे होते. ती त्याच्या अवेळी आणि कधीही रात्री उशिरा येण्या च्या कारण वरून वैतागलेली होती आणि म्हणून च तिने त्याच्या येण्यावर वाजवी वेळांचे बंधन टाकले होते : त्याने रात्री ११:00 च्या आत घरात असलेच पाहिजे, त्याने फालतू मुलांच्या संगतीत असणे कामा नये, आणि त्याला घरी मुली आणणे निषिद्ध होते. या परिस्थितीमध्ये , जोशुअ ने बंद पुकारले आणि तो घर सोडून पळून गेला. नंतर तो घरी परतला आणि जसे कि किशोरवयीन मुलांना करायचे असते तसे त्याच्या खोलीमध्ये फुरागांतून बसून राहिला. पण अजिबात अपेक्षित नव्हते ते म्हणजे त्याचे पाहते तीन वाजता शॉट गन बाळगून घरी येणे  आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या आपल्या आई वर अनेक वेळा गोळ्या झाडणे. त्याने पळून जन्याचाप्रयात्न केला पण अखेरीस तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

किंग्सबरी रन येथील वेडा खाटिक

क्लीवलंड टोर्सो खुनी असे हि ओळखले जाणार्या नावाने, किंग्सबरी रन येथील एक वेडा खाटिक हा सिरिअल किलर म्हणून १९३० च्या दशकामध्ये क्लीवलंड येथे सक्रीय होता. अधिकृतपणे बळींची संख्या १२ जरी असली तरी, तपासनिसांचा विश्वास आहे कि खरा आकडा हा बराच असणार आहे. वेडा खाटिक असे त्याचे नामकरण झाले ते त्याच्या, खून केल्या नंतर बळींचे शिरच्छेद करण्यासाठी आणि तुकडे तुकडे करण्यासाठी ( गुगल वरती असे फोटो शोधताना सावध राहा, वर दिलेल्या फोटोमध्ये एकाच्या डोक्यामध्ये प्लास्टर कास्ट केलेले आहे,  पण या पेक्षा हि जास्त भीषण असे फोटो हि आहेत ); यातील काही जणाची ओळख पटली नाही कारण त्यांचे डोके कधीच सापडले नाही. काहीना असा हि संशय व्यक्त केला कि एकापेक्षा जास्त वेडे खाटिक असणार आहेत पण कि केस उलगडलेलीच नाही.

झोडीअक किलर  
झोडीअक किलर हे नाव अशा अज्ञात सीरिअल किलरला देण्यात आले आहे जो उत्तर कॅलिफोर्निया मध्ये १९६० च्या सरत्या काळामध्ये आणि १९७० च्या उदय काळामध्ये सक्रीय होता. या झोडीअक किलर ने , बेनिशिया, वालेजो, लेक बेरीएसा, आणि सान फ्रांसिस्को मध्ये देसेम्बेर १९६८ ते ऑक्टोबर १९६९ च्या काळामध्ये अनेक बळींचे जीव घेतले. सोळा ते एकोणतीस वयोगटातील चार पुरुष आणि तीन महिला लक्ष्य बनवल्या गेल्या. ७ ऑगस्ट १९६९ मध्ये किलर ने झोडीअक हे नाव मूळ स्वरूपात एका स्थानिक बे एरिआ वृत्तपत्राला लिहिण्यात आलेल्या एका पत्रामध्ये वापरले , टोमणे मारणाऱ्या पत्रांपैकी हे एक पत्र होते. या पत्रांमध्ये चार गुप्त लिपीमध्ये लिहिलेल्या गूढ लेखांचा ( किंवा गुप्त लिपी ) समावेश होता. जी चार गूढ लिखित लिपीतील पत्रे होती त्यांपैकी केवळ एकच स्पष्टपणे सोडवता आले होते.

सर्वात पहिल्या खुनामध्ये ज्याचा व्यापकपणे झोडीअक किलर शी संबध लावला गेला तो म्हणजे २० डिसेंबर १६९८ रोजी लेक हर्मन रोड वरती, बेनेशिया शहराच्या वेशी लागत , हाय स्कूल  विद्यार्थी बेट्टी लोउ जेन्सन आणि डेविड फराडे यांना मारले तेंव्हा. हे जोडपे त्यांच्या पहिल्या डेट वर होते आणि जेन्सेन च्या घरापासून तीन घरे सोडून असलेल्या होगन हाय स्कूल मधील ख्रिसमस कॉन्सर्ट ला जाण्याची योजना बनवीत होते. आपल्या एका मित्राच्या घरी जाण्या ऐवजी ती दोघे एका स्थानिक रेस्टॉरंट मध्ये गेली आणि त्या नंतर लेक हर्मन रोड वर ड्राइव ला गेली. जवळपास १०:१५ वाजता , फराडे ने आपल्या आईची आणलेली रॅंबलर ग्रावेल टर्न आउट ला पार्क केली , जे कि प्रेमिकांची लेन म्हणून प्रसिद्ध होते. त्या नंतर लगेच, ११:०० च्या सुमारास, जवळच राहणाऱ्या स्टेला बोर्जेस ला त्या दोघांचे मृतदेह आढळले. सोलानो काउंटी च्या पोलिस अधिकार्यांनी या गुन्ह्याच्या बाबतीत तपास केला पण त्यांना काहीच धागे दोरे सापडले नाहीत.

उपलब्ध असलेल्या फॉरेंसिक माहितीवरून, रॉबर्ट ग्रेस्मिथ ने हे गृहीत धरले कि आणखी एक कार टर्न आउट मध्ये असणार , ११:०० वाजण्याच्या आधी , जी या जोडप्याच्या बाजूलाच होती.  किलर त्या दुसर्या कार मधून सहज पणे बाहेर आला असणार आणि रॅंबलर च्या दिशेने चालत गेलेला होता ,आणि त्या दोघांना रॅंबलर मधून बाहेर येण्यासाठी दरडावत असल्याची शक्यता होती. असे दिसून येते कि, जेन्सन आधी कार च्या बाहेर आली असावि आणि जेंव्हा फराडे अर्धवट उतरण्याच्या बेतात होता , तेंव्हाच किलर ने फराडे च्या डोक्यामध्ये गोळी झाडली. किलर पासून पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या जेन्सन वर  त्याने पाठीमागून कार पासून २८ फीट दुरून पाच वेळा गोळी झाडली.आणि मग किलर निघून गेला.

जुलै ४ , १९६९ च्या मध्यरात्री आधी, डर्लीन फेरीन आणि मायकल मागू हि दोघे लेक हर्मन रोड च्या मर्डर स्थळापासून ४ मैल (६.४ किमी ) अंतरावर असणाऱ्या ,वालेजो इथे  ब्ल्यू रॉक स्प्रिंग्स पार्क मध्ये गेले आणि त्यांची कार पार्क केली.जेन्व्जा हे ज्प्दाए फेरीन च्या कार मध्ये बसलेले होते . तेंव्हा एक दुसरी कार तेथे पार्किंग जागेमध्ये आली आणि त्यांच्या बाजूलाच त्याने कार पार्क केली पण अगदी लागलीच ती कार निघून हि गेली. जवळपास दहा मिनिटा नंतर परतल्या नंतर टी कार त्यांच्या मागे पार्क झाली. त्या नंतर त्या कार चा चालक वाहनातून बाहेर आला, आणि फेरीन च्या कार च्या एका बाजूने जवळ आला , त्याच्या हातामध्ये फ्लॅशलाईट आणि ९ मिमी लुगर होता. किलर ने त्या दोघांना पाच वेळा गोळी झाडून ठार करण्याआधी फ्लॅशलाईट मागू आणि फेरीन च्या डोळ्यांवर मारला. दोघा हि बळींना मारण्यात आले आणि अनेक बुलेट ने मागू आणि फेरीन च्या शरीर मधून आरपार गेल्या. किलर त्या नंतर कार पासून दूर गेला पण मागू च्या कण्हण्याचा आवाज ऐकून तो परत आला आणि त्याने दोघां वर हि निघून जाण्या पूर्वी आणि दोन वेळा गोळी झाडली.

जुलै ५ , १९६९ , रात्री १२:४० (००:४० ) वाजता , वालेजो पोलिस खात्याला एका माणसाने हल्ल्याची माहिती आणि जवाबदारी घेणारा एक फोन केला. फोन करणार्याने साडेसह महिन्यांपूर्वी झालेल्या जेन्सन आणि फराडे च्या खुनांचे हि श्रेय स्वतःकडे घेतले. पोलिसांनी आलेल्या फोन च्या स्थानाचा मागोवा घेतला , जो कि स्प्रिंग्स रोड आणि ट्युलुमिनरोड वर च्या  एका पेट्रोल पंपाच्या फोन बूथ वरून करण्यात आला होता जे फेरीन च्या घरापासून ३/१० मैल ( ४८० मी ) आणि वालेजो पोलिस खात्या पासून अवघ्या तीन घरांच्या अंतरावर होते.

हॉस्पिटल मध्ये फेरीन ला मृत घोषित करण्यात आले. मागू या हल्ल्यामधून बचावली जरी तिच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.12

लेक बेरेशिया
२७ सप्टेंबर , १९६९ ,पॅसिफिक युनिअन कॉलेज चे विद्यार्थी ब्रायन हार्टनेल आणि सिसिलिया शेफर्ड लेक बेरेशिया च्या  सॅन्ड स्पिट आणि ट्वीन ओक रिज यांना जोडणाऱ्या  एका लहानश्या बेटावर सहलीसाठी गेलेले होते. तिथे जाल्लादासारखे हूड सासलेले कपडे घातलेल्या आणि डोळ्यांवर असलेल्या गॉगल वर नेमक्या डोळ्यांच्या भोवती उघडझाप करणारे झापड असलेल्या आणि छातीवर बिब सारखे उपकरण असलेल्या ३ बाय ३ (७६ मिमी ७६ मिमी ) पांढर्या रंगाचे वर्तुळा मध्ये क्रॉस असलेले चीन परिधान केलेल्या एका माणसाने त्यांच्या शी संपर्क साधला. त्याने त्यांना गन दाखविली , जी हार्टनेल च्या मते .४५ होती.त्या हूड घातलेल्या माणसाने असा दावा केला कि तो डीअर लॉज मोन्टाना , इथून  पळून आलेला गुन्हेगार असून, त्याने तिथल्या एका सुरक्षा रक्षकाचा खून करून गाडी चोरलेली आहे आणि त्याला आता मेक्सिको ला जाण्यासाठी पैसे आणि कार हवी आहे. त्याने शेफर्ड ला बांधण्यापूर्वी , सोबत आणलेल्या प्लास्टिक च्या कपडे वळवण्याच्या दोरीने तिला हार्टनेल ला बांधण्यास सांगितले. किलरने हार्टनेल चे बांधलेले हात एकदा तपासले आणि पुन्हा घट्टपणे बांधले जेंव्हा त्याला हे लक्षात आले कि शेफर्ड ने हार्टनेल चे हात सैलपणे बांधलेले आहेत. हार्टनेल ला सुरुवातीला हा इक विचित्र दरोडा वाटला पण त्या माणसाने चाकू बाहेर काढला आणि त्या दोघांवर हि अगणित वार केले. या नंतर किलर नॉक्सविल रोड पर्यंत 500 यार्ड (460 मीटर) मागे गेला आणि त्याने हार्टनेल च्या कार च्या दारावर काळ्या रंगाच्या फेल्ट टीप पेन ने एका वर्तुळामध्ये क्रॉस करून चिन्ह काढले आणि त्या खाली लिहिले,""Vallejo/12-20-68/7-4-69/Sept 27–69–6:30/by knife"

सात वाजून चाळीस मिनिटांनी किलर ने स्वतः नापा काउंटी च्या शेरीफ पोलिस स्टेशन ला पे बूथ वरून फोन करून स्वतःच्या नुकत्याच केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. KVON रेडिओ रिपोर्टर पॅट स्टॅन्ली द्वारा नापा च्या मुख्य रस्त्यावरील नापा कार वॉश येथे काही मिनिटा नंतर च हवेमध्ये हेलकावणारा फोन सापडला जे कि शेरीफ च्या कार्यालयापासून अवघ्या तीन ब्लॉक्स च्या अंतरावर होते , जरी गुन्हा घडलेल्या स्थानापासून २७ मैल अंतरावर होते. गुप्तहेराना टेलिफोन वर अजूनही ओलावा असणाऱ्या तळहाताचे ठसे मिळाले परंतु ते कधीच कोणत्याही संशयितांच्या ठश्यानशी जुळले नाही.

त्या दोघांच्या मदतीसाठी च्या किंचाळ ण्याच्या आवाजाने जवळच्याच खाडीमध्ये मासेमारी साठी आलेल्या बाप लेकांना हि दोघे पिडीत आढळले त्यांनी बाजूच्या पार्क मधील रक्षकांना बोलावून त्यांना मदत केली. नापा काउंटी शेरीफ चे अधिकारी डेव्ह कॉलिन्स आणि रे लँड हि दोघे घटनास्थळी जाउन कायद्याची अंमलबजावणी करणारे पहिले अधिकारी होते. कॉलिन्स घटना स्थळी. पोहोचले त्या वेळेस सिसिलिया शेफर्ड शुद्धीत होती आणि तिने मारेकर्याचे तपशीलवार वर्णन त्यांना दिले. हार्टनेल आणि शेफर्ड या दोघानाही अम्ब्युलन्स ने नापा येथील Queen of the Valley  रुग्णालयामध्ये नेण्यात आले. रुग्णालयामध्ये नेण्या दरम्यान शेफर्ड कोम मध्ये गेली आणि पुन्हा कधीच शुद्धीत आली नाही.  दोन दिवसानंतर ती मरण पावली, पण माध्यमांना झालेल्या घटनेची माहिती देण्यासाठी हार्टनेल चा जीव वाचला.  नापा काउंटी शेरीफ चे गुप्तहेर केन नर्लो हे १९८७ साली विभागामधून निवृत्त होई पर्यंत या गुन्ह्याची उकल करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, जे कि सुरुवाती पासून या गुन्ह्याचा तपास करत होते.