Android app on Google Play

 

पत्र क्रमांक - 7

 

क्षमायाचना करण्याजोगे
सभ्य अपुले नाते असावे
त्यात मनातून खचून
उतरलेल्यांना दमडीएवढे
स्थान असावे
मैत्रीचाहि पिंड वेगळा
स्नेहसंबंधाचा धागा निराळा
त्यात गुंतणारा  भावसोहळा
तरी माफी मागावी आम्ही
एकदा म्हणून अवतरली
प्रस्तूत कविता ! ! !
कधी कधी काही कळेनास होतं. मी तुला जो मध्यंतरी त्रास दिला तो खरच “ खोटा “ म्हणून दिला की “ खरा” म्हणून दिला? असो, तो मुद्दा येथे आज मला संपवायचा आहे.जे आज मी तुला ही इमेल करतोय तीस तू ‘ लवलेटर ‘ म्हणायचे की  "दास्ताने-ए-जंग" असे म्हणायचे तूच ठरव. तसे पाहता मी एक खेडवळ भागातून आलेला मुलगा. ना माझ्यापाशी कसली कला न कसली निपुणता. ना मी अभिनय करू शकत, न मी नाच करू शकत , ना गाऊ शकत, ना कोणते वाद्य वाजावू शकत. पण सगळ्या गोष्टी करायची भारी हौस, आवड आहे, होती व असेल यात शंका नाही. कलामंडळात आलो तेव्हा फक्त एकच ध्येय होतं “ नाटक “ बाकी काही नाही. पण इथे फक्त सिनिअर्स बरोबर म्हणतील तोच कायदा? असा पाठ आहे. ते असो कलामंडळाचा विषय निघाला की नुसती वादा-वादी, चर्चा, गटबाजी, रूसवे, फूगवे हेच सर्व गिरवाव लागतं. कारण या सर्व गोष्टी मिळूनच कलामंडळ बनतं.काही गोष्टी सकारण असतात तर काही अकारण. कधी विधायक गोष्टी, कामे केली तर बक्षिसे मिळतात तर कधी “केळकर” करंडक मिळतात. पुरे आता कलामंडळाचा विषय निघाला की असेच होते, गेली चार वर्षापासूनचा इतिहास आठवतो. ते मला आज तुला सांगायचे नाही. मला वेगळेच सांगायचे आहे. आज पाठवत असलेली इमेल किमान वेलेंटाईन दिवसापर्यंत तू वाचशील अशी अपेक्षा. आज खरंच खूप रुक्ष वाटतय. गेले काही महिने खरच मी तुझ्या बाबतीत गंभीर होतो? हेच मला कळत नाही .असो पण मला तुझ्या आठवणीत रमायला मजा आला. काही एक म्हण मला, युजलेस , नावं ठेव. मला त्याचे काही एक वाटणार नही. कारण मी एक अत्यंत निष्ठुर , निर्दयी, निगरगट्ट असा मुलगा आहे. निर्लज्ज म्हणालीस तरीही काही हरकत नही. कारण सजातीय लोक एकमेकांना लागलीच ओळखतात, जाणतात(!). असो आज खऱ्या अर्थाने मी एवढा सेंटी झालोय की खरच आज मला काय झाले ठाउक नाही. गेले काही दिवस मी सातत्याने माझी रोजनिशी वाचतोय. तरी माझ्या रोजनिशी मध्ये दुसरे असणार तरी काय ? एकतर तीच रेल्वे, तेच रस्ते, जेवन, खाणं-पिणं, मित्रांचे विषय व माझे खाजगी विचार, कथा, कविता, संकल्पना, असो. पण काही वेळा मी खूपच सेंटी झालो आहे.कारण एक तर मी सायकलस्वार.कधीतरी झेडब्रीज वरून फिरताना जेव्हा युगुले प्रेमकोषात बसलेले दिसायचे, तर कधी डेक्कनला फिरताना गाड्यांवरून जाणारी युगुले पाहिली कि खुप खट्टू व्हायचो.मला एफ. वाय.. पासून सारखे असे वाटायचे की मला ही कोणीतरी जवळची आवडाणारी मैत्रीण असावी. कारण मी कोणाला मी आवडेन असे माझ्याकडे काहीही नाही, खुप न्यूनगंड यायचा. कारण आपल्याला कोणतरी आवडवं किंवा आपण कोणालातरी आवडावे यासारखी गोड आणि नाजुक भावना खुप मजेशीर आहे. त्यासाठी त्या भावनेतूनच जायला हवे नाहीतर तुम्ही शुन्य आहात. पण नाही मी ते सुख अनुभवू शकत नाही कारण आधी मी खादाडबुदला! खाणं पहिलं बाकी उसके बाद. मी कधीच कोणाशीच वायफळ गप्पा मारल्या नाहीत वा कधी टाईमपास केला नाही. अगं माझा पिंड नाही तसा. कारण माझी एककल्ली वृत्ती, माझ्या महत्वकांक्षा, माझे लिखाण, माझा अभ्यास, चिंतन , मनन. व कलामंडळातील कामे यातून कधी वेळ मिळालाच नाही. गुलछबू आयुष्य जगत आलो. खुशालचेंडू मस्त. काय करणार? प्रेम करावसे खुप वाटायचे पण माझे कौटुंबिक जीवन,मला नेहमीच साद घलते की “ तुला तुझे शिक्षण पूर्ण करून जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत”, त्यात मी नाटक करतो. हे घरच्यंना मुळात आवडत नाही. त्यामुळेच घरात वादंग मजतात. त्यात मी प्रेमप्रकरण करायला धजावलो तर माझी कत्तल ठरलेलीच ! दुसऱ्या दिवशी सकाळ मध्ये बातमी यायची “बापाकडून लेकाचा खून” असो तो काही मुद्दा नाही तुला सांगायचा! पण तसे होणार नाही. माझा कुटुंबसंस्थेवर प्रचंड विश्वास आहे. आरेन्ज मेरेज हीच फक्त चिरकाल टिकणारी आहेत. फालतू प्रेमप्रकरणं यात मला काही एक स्वारस्य नाही. ते असो.  मला ते तूला सांगायचे नाही.
मी माझी डायरी वाचतना केवळ तुझ्याच बाबतीत खुप भावविवश झालो आहे. त्यामुळेच ही इमेल तुला लिहितोय कारणा ज्या व्यक्तीमुळे मी एवढा सेंटी होतोय तिलाच कळालेच पाहिजे नव्हे तर तीला त्याची जाणीव करून देणे माझे आद्यकर्तव्य आहे.या पत्राचा मसुदा याच पायावरच टिकून आहे. माझ्या आजवरच्या आयुष्यात मी खुप मश्गुल होउन वावरलो, केलेली कर्मे, पाप्-पुण्य, या वर्गांमध्ये बसणारी असोत वा नसोत पण त्या अवस्थेतून जाताना मी खरा असतो. सभ्य प्रामाणिक असतो. माझ्या दृष्टीने कलाकारा पेक्षा त्याच्या ठायी असलेली कला महत्वाची. कारण कलाकार हा माणूसच आहे. म्हणजे सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यात येणारे सर्व प्रसंग त्याच्या आयुष्यात येणारच नव्हे तर यायलाच पहिजेत. पण त्यातूनही तो आपल्या कलेसाठी या सर्वावर मात करतो व आपली कला जपतो. रियाजाने ती  वृद्धिंगत करतो. म्हणून तर  तो सच्चा असतो त्याच्या  कलेच्या बाबतीत. म्हणून तर मला या कलाकारांचा खुपच आदर आहे.त्यांच्या कलेचा मी रसिक साधक  आहे. कारण माझ्याकडे अशी कोणतीच कला नाही. बैलासारखे कष्ट एवढेच माझं ब्रीद. पहिल्यांदा तुला भेटलो तेव्हा तुला मी एक इतरांसारखी मुलगी समजलो होतो. पण कलामंडळातील काही नाटकांमधून, वाचिक अभिनयमधून,तुझ्यामधला कलाकार मला आकर्षित करत गेला.तुझ्यातल्या कलेचा मी चाहता बनलो.तुझा सच्चा स्वभाव मला आवडला, मी ज्या पद्धतीने तुझे सूक्ष्म निरीक्षण केले तसा मी बहुधा तुझ्यात गुंतत गेलो. असो. तुझा अभिनय, तुझे नृत्य मला भावले. खरच अप्रतिम! तसे पाहता तुझ्यासारख्या 56 मूली आहेत. पण त्यातूनही मी तुझ्यातच कसा गूंतलो काय माहित? ध्येयवादी दृष्टीकोन ठेउन मी जगणारा अचानक एका मूलीसाठी कसा काय भावूक होतोय कळत नाही.  आता मात्र डायरी वाचल्यावर ध्यानात येते की ही फेज एकाकी,  एकतर्फी होती. बरेच प्रश्न पडलेत! काही प्रश्नांची उत्तरे न मिळनेच हितावह ठरते. तर असो. माझ तुझ्यावर प्रेम आहे अशी मिळमिळित वाक्यं, बुरसटलेली विचारसरणी मनात ठेउन म्हणणाऱ्यांमधला मी मुळीच नाही. कारण अखंड गोष्टी केवळ दोनच विचारधारा आणि प्रेम. पण प्रेम हा अडीच अक्षरी शब्दसुद्धा अगदी बेहाल करून सोडतो.इथे पुण्यात आल्यावर माझ्या मनातील प्रेम विषयक प्रतिमेला तडा गेला. त्यातल्या त्यात कलामंडळात अशा काही अवास्तव घटना घडल्या त्यामुळे प्रेम का कराव हाच यक्षप्रश्न पडला.त्यानं पछाडलं. बर संगतीचा परिणाम म्हणावा तर तेही नाही.  सध्या तरी टाईमपास म्हणूनच  प्रेम करणारी आजूबाजूला मुलं मूली आहेत. मला त्यांची मानसिकताच कळत नाही. लग्नाबद्दल विचारलं तर माझ्यावर हसतात.  मी एखादीचा जीवनसाथी म्हणून विचार करतो हा माझा बुरसटलेला विचार आहे का कळत नाही. प्रचंड राग येतो मला. जाऊ दे काही खरे नाही माझे. असो. इथे अभिप्रेत एकच. माझ तुझ्यावर कोणत्या करणस्तव प्रेम आहे आता प्रेम हा शब्द वापरने जरा अवघड जातय पण नंतर सवय होइल त्याची असो. कारण माझ्या आयुष्यात मला केवळ एकदाच प्रेम व एकच लग्न करायचे आहे. एकमेव.
काय आहे की मी एकपत्नीव्रताचा पुजक आहे. माझे सगळेच विचार वेगळे आहेत तू हसशील हा वेडा प्रपोज करतोय की तत्वज्ञान सांगतोय…?
का कुणास ठाउक पण मध्यमवर्गीय जीवन जगताना आड येणाऱ्या नेभळट गोष्टी,  पांढरपेशी मुर्दाड्पणा टोचतो. कधी कधी विव्हळतो.पण शेवटी समाजाने बांधलेल्या काही गोष्टी स्विकारायच्याच. पर अपने हर अलग अंदज से । चाहे नतीजा गलत हो पर अंदाज हमेशा सही होना चाहिये, क्योंकी नतीजा बदल सकता है। बदलाव अपेक्षित है। जाऊ देत नाही मला कळत मी काय लिहीतोय ! तुला प्रपोज करतोय की तेही समजत नाही ! अनुभव नही ना! तुझ्या बाबतीत काही सांगता येत नाही(!) तुला अनेक प्रपोज आले असतील. अरे मी काय लिहितोय काही कळत नाही. इटेलेच्क्युअल .काय होतय काही कळायला मार्ग नाही! तूला सरळ जाउन सांगवे तर आपली सध्या भेट होत नाहीए!  नाही आणि हातात पैसा अडका गाडी वगैरे पण नाही.कारण मी असे करून तू मला “हो” म्हणशील असे माझ्यात काही नाही. मी फाटका माणूस; पण माझ्या मनाच्या श्रीमंतीसमोर कुबेर सुदधा नतमस्तक होईल.  माझ्या पेक्षा कैक चांगली मुलं तुला नक्कीच भेटतील! त्यात तू एक अमुर्त कलाकार आणि मी गाढवी कामे करणारा बॅकस्टेजर. माझ्या आयुष्यात हातोडी आणि खिळे या व्यतिरिक्त काय असणार आहे?
आज असे मला का होते कळत नही तुझे विचार आले की मी असाच deflect होतो ammeter आणि voltmeter मधील needle सारखा च्यायला! उपमा सुद्धा electronics मधल्याच  !!!!!!!!!!!!!
नक्की मी हे कशासाठी लिहितोय कळत नाही? कारण मी तुझ्याशी कधीच टाईमपास किंवा मजा म्हणून गप्पा मारल्या नाहीत.
आता तरी मला वाटतय की मी खरच तुझ्या प्रेमात पडलो आहे पण मला तूला एकच गोष्ट सांगायची आहे आजवर मी अनेक प्रेम करणारी मंडळी पाहिली आहेत. बहुतेक हे प्रेम तुटन्यासाठीच करत असावेत! कारणं काहिही असतात भांडण तंटे, काहिही इलॉजिकल reasons देतात, तर मग प्रेम कशासठी फक्त वेळ मारून नेण्यासाठी की टाईमपास ? तुझं प्रेमप्रकरण असेल नसेल मला त्याचे जन्माचे सोयर नाही की मरणाचे सूतक नाही.मी आजवर कधीच असं मोकळंपणे बोललो नाही की लिहिले नाही. माझी बायको, सहचारिणी तूच असावीस आज मला खुप मनापासून वाटतेय.  मला तर माझी बायको कलाकारच हवी आहे. तुझ्या सुखासाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे? पण तुला काहीही झाले तरी सोडून देणार नाही आयुष्यभर तुझ्या हिताचच विचार करेन.  हे पत्र तुला Valentine Day च्या दिवशी द्यायचा एकमेव सुप्त हेतू हाच की हे पूर्ण पत्र वाचतना तू एक क्षण जरी विचार केलास माझा तरी त्या क्षणात मी आजवरची सारं जगलो असं म्हणेन! मी प्रेम म्हणजे तपश्चर्या मानतो. असो, गेल्या वर्षभरात लिहिलेल्या डायरीतील विचारांनी प्रभावित होउन मी आज हे शिवधनुष्य उचलत आहे पाहुयात कोण जिंकतय ? सध्या तरी  हार ही माझीच आहे.
तू मला याचे उत्तर देणार नाहीस याची मला 100 टक्के खत्रीच नाही तर पक्का विश्वास आहे. कारण तू आजवर केवळ माझी हेटाळणी केली आहेस मात्र “ हेट’ मधील ‘ आळणी’ पणा काढुन टाकने व ती चविष्ट, स्वदिष्ट, रुचकर करणे मला चांगलेच जमते तर बघ विचार करून काय लिहावे फार कंटाळलो तूही वाचून कंटाळली असशील तर शेवट गोड
व्हावा…………….
चूक होते एकदा
त्रास होतो अनेकदा
चुकणाऱ्यांना फुटतो पाझर
न कळत होतो चूकांचा वापर
नसता तूझी या क्षणी सोबत
क्षमा मगतो तुला विनवत
होउद्यात नाती पुन्हा निर्मळ
गतमैत्रीसारखी सोज्ज्वळ
तुज येत नसेल माझी आठवण
आजुनही तू एक सभ्य साठवण
या साठवनीतले कितीक गोडवे
तुझ्या आन्तरिक मला ओढवे
ऊखडुन टाक सर्व दडपण
क्रंदनातून विनवतो हा
सच्चा भूषण!!!!!!
                                        
तूझा असूनही नसलेला

                                                                    9 फेब्रुवारी 2007

 

पत्रावळी

Bhushan Vardhekar
Chapters
पत्र क्रमांक - 9
पत्र क्रमांक - 6
पत्र क्रमांक - 7