वांव मासा व साप
वांव या नावाचा एक मासा आहे. त्याचा आकार सापासारखा असतो. त्या जातीचा एक मासा एकदा एका सापाला म्हणाला, 'अरे, तुझा नि माझा आकार इतका सारखा आहे की, त्यावरून तुझं आणि माझं नक्की काहीतरी नातं असलं पाहिजे असं मला वाटतं. पण लोक मलाच तेवढं पकडून नेतात पण तुझ्या वाटेला कोणीही जात नाही. याचं कारण काय ?' साप त्यावर म्हणाला, 'मित्रा, याचं कारण असं की लोक माझ्या वाटेला गेले तर मी त्यांना उलट अशी शिक्षा करतो की त्यामुळे त्यांना चांगलीच आठवण राहावी.
तात्पर्य
- त्रास देणार्या माणसाला नमून राहणे म्हणजे त्याला त्रास देण्याच्या कामी उत्तेजन देणे होय.