विश्रांतीचा थांबा
मी तुला पाहत आहे.
कॅरलने स्नानगृहाच्या दरवाजावर कोरलेला तो संदेश वाचला आणि तिला हुडहुडी भरली. तिने अजूनही फ्लश केलं नव्हतं, नाहीतर तिने शौचालयात ते धुळीने माखलेलं आसन बदलले असते. किटकनाशकाचा एक फवारा देखील पुरेसा असता मग त्या अप्रिय वातावरणाचा देखील काही फरक पडला नसता.
तिला लगेचच आराम मिळाला कारण गेल्या एका तासापासून ती तिच्या मांड्या आवळून होती. मद्यपान करुन तिला जे धैर्य मिळाले ते कधीत उतरले होते. तिने ताणून धरण्यास नकार दिला होता. सुरक्षित वाटण्यासाठी ती त्या हरामखोरापासून खुप दूर आली होती. तिला शौचाचा त्रास झाला नसता तर ती टेरीपासून आणखी दूर जाऊ शकली असती, पण निसर्गाने ही लढाई जिंकली होती.
केली गाडीमध्ये झोपली होती. पाच वर्षांच्या त्या मुलीला उठवणे कॅरलला शक्य नव्हते. ती मध्येच उठल्यानंतर तिला शांत बसायला सांगणं आणि काहीही स्पष्टीकरण न देता तिला तिच्या वडीलांपासून दूर नेणं हे असं नाटक त्या एका रात्रीसाठी खुप होतं. प्रश्न सहजच आले असते, पण तशी वेळ आली नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा तिला कळेल की जे काही झालं आहे ते चांगल्यासाठीच झालं आहे.
स्नानगृहाचा दरवाजा उघडला.
पावलांचा आवाज आला,
‘‘केली?’’ त्या पावलांचा आवाज लहान मुलांसारखा वाटत नव्हता. तरीही तिने केलीला आवाज दिला. तिच्या मनात एक भयानक विचार आला की, जर मध्येच कुठेतरी त्या रिकाम्या गाडीमध्ये केलीला जाग आली तर काय होईल? ते अशा ठिकाणी होते जिथे कुणीही नव्हतं. टेरीला सोडल्यानंतर कॅरल महामार्गावर आली होती आणि ती दक्षिणेकडे निघाली होती जे 80 कि.मी. दूर होते. रहदारी कमी असल्याने ती लवकरात लवकर जाऊ शकली असती, पण तिने तसं नाही केलं. तिचं शेवटचं ठिकाण हॅडॉनफिल्ड हे 10 मैल मागे गेलं होतं, आणि आता तिला पुढे रस्त्यावर फक्त झाडे आणि जूनी घरंच दिसत होती.
‘‘हॅलो.’’ तिथे पावलांचा आवाज ऐकून कॅरलने विचारले.
शांतता.
तो जड पावलांचा आवाज लहान मुलांचाही वाटत नव्हता आणि तो आवाज एखाद्या स्त्रीच्या पावलांचा देखील नव्हता.
कॅरलला काही बोलायचे होते पण ती बोलू शकत नव्हती. त्याउलट ती दरवाजाखालून वाकून बघत होती. काही अंतरावर तिला गमबुटाची जोडी दिसत होती. ती बाकी काही पाहू शकत नव्हती.
तो बरोबर दरवाजाबाहेरच उभा होता. ती धास्तावली. कॅरलला काही सुचत नव्हते. भयानक शांतता होती पण बोलण्याची काही सोयच नव्हती. जर त्याला कळलं की मी इथेच आहे, या विचाराने तिच्या हृदयाचा ठोका चुकला.
शांतता खुप होती.
‘‘तुम्हाला काय हवं आहे?’’ तिने विचारले. तिला हे मोठ्याने विचारायचे होते पण तिला तसे करता आले नाही. तिला मद्यपान करुन जी हिंमत आली होती ती कधीच गेली होती आणि त्याची जागा आता भितीने घेतली होती.
तिला काही उत्तर मिळाले नाही.
अलीकडेच ती केलीला तिच्या शिवराळ पतीपासून दूर नेण्यासाठी काहीही करायला तयार होती. तिला जी कानाखाली पडली होती ती एवढी कठोर नव्हती आणि एवढी वाईटही नव्हती जेवढे तिच्या पतीने तिच्याबरोबर केले होते. पण तो शेवटचा वार होता. त्यानंतर टेरी मद्यात धुंद होऊन बेशुद्ध झाला होता. रात्रीचे जेवण पुर्ण झाल्यानंतरच्या 12 ग्लास मद्य पिण्याने तो झिंगलेला असायचा. केरल काही वर्षांपुर्वीच त्याच्या पिण्याच्या सवयीवर बोलू शकली असती, पण तिला हे माहित होतं की, त्यामुळे तिला काही रात्रींचीच शांतता मिळू शकत होती. पहिल्या दोन-चार ग्लासांमध्येच तो शुध्दीवर असायचा तेच काहीसं आनंददायी असायचं.
बाहेर उभा असलेला तो माणुस काहीही बोलत नव्हता आणि काही करतही नव्हता. कॅरलने पुन्हा दरवाजातून डोकावून पाहलि. तो तिथेच उभा होता.
त्याला काय हवे होते?
दरवाजा उघड आणि काय ते कर, कॅरलच्या मनात आले. एका लाथेमध्ये तो दरवाजा उघडू शकला असता त्यामुळे ते उघडनं त्याच्यासाठी एवढं कठीण नव्हतं. त्याचवेळी तिला ती परिस्थिती एवढी सोयीस्कर करुन द्यायची नव्हती. तिला हा प्रकार आवडत नव्हता. ती अशातली स्त्री नव्हती जी टेरी तिला मारत असतानाही समोर तशीच उभी राहील किंवा पळून जाईल किंवा पलटवार करुन त्याचा राग आणखी वाढवेल. तिचे हात फक्त तिचा चेहरा सांभाळण्यासाठी उठायचा, बस्स.
कॅरलने पुन्हा दरवाजातून डोकावून पाहिले. ते बुट अजूनही तिथेच होतो आणि त्या बुटांच्या लेस जमिनीवर रेंगाळत होत्या. तो बाकी कसा असेल? आणि तो तिथेच का उभा होता?
तिने चेहर्यासमोर असं चित्र उभं केलं की, एक माणुस दरवाजाबाहेर उभा आहे आणि दरवाजा उघडताच तो एका असहाय्य बाईवर झडप घालण्यासाठी तयार आहे. ती स्त्री तीच होती, पण खरंच ती असहाय्य होती का? तिची पर्स टॉयलेट पेपर नष्ट करण्याच्या मशीनवर होती आणि त्या पर्समध्ये मिरपूडेचा छोटासा स्प्रे होता. तिचा पती माजी पोलिस अधिकारी होता, त्याने तिला तो दिला होता. जेव्हा कधी गाडी चालवत असताना काही झालं तर, यासाठी. ही गोष्ट त्याने अती मद्यपान करण्याचा खुप अगोदरची आहे आणि अजूनही ती शिकागोमधील स्ट्राईक 3 या बारमध्ये संध्याकाळच्या शिफ्टमध्ये काम करत होती. दुर्दैवाने सहा वर्षांपूर्वी एका रात्री तो स्प्रे बाहेर काढण्यास सक्षम नव्हती, आणि जरी ती सक्षम असती तरी त्या तीन तरुणांशी लढने (ते तरुण होते असे तिला वाटले कारण त्यांनी मुखवटा घातला होता) तिला शक्य नव्हते. कदाचित त्या मिरपूड स्प्रेने ती एकादुसर्याशी लढू शकली असती पण तिसर्याशी नाही.
तिने तो स्प्रे तिच्या पर्समधून बाहेर काढला.
बलात्कार होऊन एक वर्ष झालं होतं तरी अजून टेरी त्या बलात्कार्यांना पकडू शकला नव्हता. तो त्याचा पुर्ण वेळ त्या बारभोवती फिरण्यात खर्च करत होता, या आशेने की ते लोक पुन्हा तिथे येतील. पण त्यांनी तसं केलं नाही. त्याने डी.एन.ए. चाचणीवर देखील भर दिला, त्यातून देखील काही निष्पन्न झाले नाही.
कॅरलने तो स्प्रे तयार ठेवला. आणि तिला फक्त दरवाजा उघडण्यासाठी हिंमत हवी होती. त्या स्प्रेचा एक फवारा देखील पुरेसा होता. त्यानंतर ती व्यक्ती काहीही करु शकत नव्हती.
सहा वर्षांपुर्वी जर तिने तो फवारा मारला असता तर कदाचित केरीचा जन्मही झाला नसता. कॅरलने तो विचार झटकला. बलात्कार होणं हे वाईट होतंच, पण त्या गोंडस मुलीचा जन्म होऊ न देणं हा विचार त्याहीपेक्षा वाईट होता.
‘‘आई.’’ केरी ओरडली.
तिच्या मुलीच्या आवाजाने तिला हवं असलेलं धैर्य तिला मिळालं. कॅरलने दरवाजा उघडला. तिथे कुणीही नव्हतं. तिथे फक्त बुट ठेवलेले होते.
‘‘आई!’’ केलीने पुन्हा आवाज दिला.
कॅरल स्नानगृहातून धावतच निघाली.
वाळू असलेल्या वाहनतळावरुन एक गाडी घसरुन निघून गेली. त्यात केली होती. गाडीच्या मागच्या काचेमध्ये तिचे ते लहान हात दिसत होते. कॅरल धावली.
गाडी वेगाने जात होती.
कॅरल तिच्या स्वतःच्या गाडीजवळ गेली. त्या काळोखात सुध्दा पाहू शकत होती की तिच्या गाडीच्या चारही चाकांची हवा काढून टाकली होती. पण ही एवढीशी गोष्ट तिला त्यांचा पाठलाग करण्यापासून थांबवू शकत नव्हती. एवढं करुनही काही उपयोग झाला नाही कारण त्या विश्रांती थांब्यापासून बाहेर निघेपर्यंत ती गाडी दिसेनाशी झाली होती.