Get it on Google Play
Download on the App Store

इधाया

टक्कल पडलेले काही वैज्ञानिक एका डिजिटल स्क्रीनकडे पाहत फायबरग्लास खुर्च्यांवर आपापल्या जागेवर बसले होते. स्क्रीनवरील चित्रामध्ये यंत्रमानवांची अतिशय असामान्य क्रमवारी होती. लांब, आकड्यासारखा वाकडा बोटांनी दहा धातूचा हात त्याच्या शरीरातून तयार झाले होते. प्रणेश, यंत्रमानवांचा डिझायनर, परिपूर्ण इंग्रजीमधून वैज्ञानिकांना संबोधित करत होता.

“माझी रचना असलेले यंत्रमानव आपण पाहत आहात. यांचा वापर औद्योगिक क्षेत्रांमध्ये होऊ शकतो, आणि बांधकाम क्षेत्रांमध्ये यांचा वापर नोकरदार म्हणून देखील होऊ शकतो. त्यांच्यामध्ये दोनशे हातांचे बळ आहे. समजा पन्नास विविध भाग एकत्र करावे लागत असेल; ते काम हा यंत्रमानव काही क्षणांतच पूर्ण करू शकतो. हे पुर्णपणे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने केले आहे, आणि त्याच्या रचनेत हाइड्रोलिक किंवा न्युट्रीलक्स नाही आहे.”

"आम्ही एक प्रात्यक्षिक पाहू शकतो का?" एका वैज्ञानिकाने विचारले

"नक्कीच" प्रणेश म्हणाला, आणि दहा शास्त्रज्ञांच्या नेतृत्व पथकासह ते चाचणी कक्षामध्ये गेले. कक्षाच्या मध्यभागी तो यंत्रमानव रोमन सैनिकासारखा उभा होता. वैज्ञानिक त्याच्या भोवताल उभे होते. प्रणेश तिथे उभा राहून पुढे म्हणाला: "आपल्यासाठी चाचणी करण्यासाठी मी एका गाडीचे संपूर्ण भाग वेगवेगळे केले आहेत. मी आज्ञा केल्यावर हा यंत्रमानव ते भाग जोडण्याच काम करेल. १५ मिनिटांच्या आत यंत्रमानव या भागांची पुनर्बांधणी करेल." तो त्याच्या खिशातून एक रिमोट काढतो आणि त्याच बटन दाबताच ते यंत्रमानव कार्यान्वित होते. त्याचे खांदे हालचाल करू लागतात आणि त्याचे डोळे हिरवे होतात. प्रणेश सुरु होण्याच बटन दाबतो आणि आणि आज्ञा करतो "ते भाग पुन्हा जोड!"

यंत्रमानव गाडीच्या त्या भागांजवळ जातो. सिलेंडर प्लग, सिलेंडर हेड, कर्बोरेटर, पेट्रोल पंप, आणि एयर कंडीशनर योग्य त्या जागी अगदी बरोबर जोडतो आणि गाडी १५ मिनिटांच्या आतच पूर्ववत होते. "आपल्यापैकी कुणाला गाडी चालवून पहायची आहे का? ही खोली एक टेस्ट ड्राइव्ह करण्याइतपत मोठी आहे!"

एक तरुण वैज्ञानिक गाडीमध्ये बसला आणि त्याने ती गाडी खोलीच्या भोवताल चालवली. हे पाहून इतर वैज्ञानिक मोठ्याने जल्लोष करू लागले.

“उत्कृष्ट, मि.प्रणेश!”

"धन्यवाद."

"आपण यासाठी किती किंमत मोजाल?"

"हा 2020 मधला सर्वात लक्षणीय शोध आहे," एक परदेशी शास्त्रज्ञ म्हणाला. "अशी रचना आमच्या देशाकडे असणे आवश्यक आहे!" आणखी एका अविचाराने त्याच्या बोलण्यात व्यत्यय आणला:

"नाही, हे सर्वप्रथम माझ्या देशात असायला हवे!"

प्रणेश हसून म्हणाला, "कृपया थांबा! आपण माझी दुसरी रचना पहाच, इधाया २०२०. त्यानंतर मी दोन्ही यंत्रांसाठी माझी किंमत सांगेन."

"इधाया २०२० नक्की काय आहे?" एका वैज्ञानिकाने विचारले.

"ती एक स्त्री यंत्रमानव आहे."

"काय? यंत्रमानवांमध्ये लैंगिक भेद कसा काय असू शकतो?"

"माफ करा, आपण लक्षात घ्यायला हवं इधाया खूप वेगळी आहे. जसा तुम्ही विचार करत आहात तशी ती यंत्र नाही आहे."

"मग?"

"या, तिला भेटा!" प्रणेश त्या सर्वांच नेतृत्व घेऊन दुसऱ्या कक्षात जातो, आणि त्यांना सिलिकॉनपासून तयार केलेला नवीन यंत्रमानव दाखवतो.

 

"सादर आहे माझी इधाया २०२०. अगदी १०० टक्के जैविक यंत्रमानव. ती विचार करू शकते. याचे कारण आहे, मी तिच्यामध्ये बसवलेली बायो-मेमरी चीप, तिला चांगले आणि वाईट यांच्यातील समाज आहे. ती निर्णय घेऊ शकते. ती माझ्या पत्नीसोबत गप्पा मारू शकते, आणि ती तिच्याकडून वीणा वाजवायला शिकली, कोलम बनवायला शिकली, ती खूप सुंदर कोरीव काम करू शकते. जेव्हा माझी पत्नी स्वयंपाकघरात व्यस्त असते तेव्हा तेव्हा इधाया तिला मदत करते, आणि..."

“आणि?”

"ती तसेच चांगले संरक्षण करू शकते."

"ते कसे काय?"

"ती बर्गर कापू शकते. ती एका स्वतंत्र स्त्रीची चांगली मैत्रीण आणि संरक्षक होऊ शकते. तिच्याकडे मानवी संवेदना आहेत. मी तिच्या रचनेची सुरुवात २०१५ मध्ये केली होती आणि ही रचना २०२० मध्ये पूर्ण झाली आहे; ही माझ्या आयुच्याचा मोठा गौरव आहे."

"ती खरंच चांगलं आणि वाईट यांच्यामध्ये भेद करू शकते." एकाने विचारणा केली.

प्रणेश हसतच म्हणाला, "हेच तर माझ्या इधाया २०२० च वैशिष्ट्य आहे. आपण आपल्या समाधानासाठी तिला काही प्रश्न विचारू शकता. आणि तुमच्यासाठी पाहू शकता?"

"ती बोलू सुद्धा शकते?"

"होय. ती अगदी स्त्रीच्या आवाजात बोलू शकते."

एक वैज्ञानिक इधायासमोर आला आणि तिला विचारू लागला, "यांपैकी आरोग्यासाठी नक्की काय चांगलं आहे, व्हिस्की कि ब्रेन्डी?"

इधायाने आपले पोलादी तोंड उघडले आणि स्त्रीच्या मधुर आवाजात बोलू लागली, तिचा प्रत्येक शब्द अगदी स्पष्ट होता. “दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत.”

"एड्स बरा होऊ शकतो?"

"नाही"

"खोट बोलणं म्हणजे नक्की काय?"

"ती चुकीच आहे."

"आणि चोरी?"

“ती बाब देखील अनैतिक आहे.”

"कोणत्या गुन्ह्याला क्षमा करता येणार नाही?"

"विश्वासघात!"

तिला प्रश्न करत असलेल्या वैज्ञानिकाला आता काहीएक कळत नव्हते. " उत्कृष्ट, इधाया! तू आम्हाला एखादी कविता म्हणून दाखवू शकतेस का?"

"अर्थात मी करू शकते."

"म्हण मग!"

“जरी मी मृत्युच्या दरी आले असेल,

तेव्हा अश्रू गोठू देणार नाही,

फुले!

त्यांच्या हास्यातून, जगणं शिक,

अरे माणसा!"

वैज्ञानिकांनी प्रणेश सोबत हस्तांदोलन केले.

"अद्भुत, मि.प्रणेश! इधायाच्या सिलिकॉन शरीरात तू बसविलेल्या बायो-मेमरी ने खरोखरच एक वेगळी उंची गाठली आहे. तर मग तू तिच्यासाठी किती किंमत मोजशील?"

प्रनेशने स्मितहास्य केले. "कृपया थांबा. तुम्ही इधायाच्या क्षमतेवर आधारित आणखी एका चाचणीचे साक्षीदार व्हा. त्यानंतर आपण आपल्या व्यवहाराबद्दल बोलू.

"ते काय आहे?"

"इधायाच्या शरीरात पिस्तूल लपवले आहे. ती कोणत्याही हल्लेखोरावर नेम धरू शकते."

"तिचा नेम चुकण्याची शक्यता किती आहे?"

"शुन्य, आता मी माझ्याकडे असलेला रबरी चेंडू इथे रुममध्ये - शंभर फुट लांब फेकतो आहे. जेव्हा मी आढ्या करेन तेव्हा ती चेंडूला गोळी मारेल."

"करा!" वैज्ञानिकांनी विनंती केली.

"इधाया!" प्रणेश म्हणाला, "मी समोर फेकलेल्या चेंडूवर नेम धर आणि त्याला गोळी मार!"

“आपली इच्छा हाच माझा आदेश.” इधाया म्हणाली. आपल्या शरीरातून बंदूक बाहेर काढत अलगद आपले खांदे वर उडवत तिने नेम धरला. पण तो नेम चेंडूवर नव्हता.

वैज्ञानिकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. तिने ट्रिगर दाबले आणि प्रणेश रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला.

इधाया वैज्ञानिकांकडे वळली आणि शांतपणे सांगु लागली, ‘‘प्रणेशला वाटलं असेल, मी ही वाईट गोष्ट घेऊन कुणालाही मारु शकते. हा माणूस प्रसिध्द प्राध्यापक होता, उत्कृष्ट यंत्रमानव बनविण्याइतका विद्वान, अत्यंत हुशार असा हा माणुस होता - पण त्याला मानवी मुल्यांची जरादेखील कदर नव्हती. एखाद्या स्त्रीशी कसं वागावं याची त्याला कल्पनादेखील नव्हती. त्याची पत्नी वात्सल्या खुप सुंदर आणि हुशार स्त्री होती. माझा जन्म झाला तेव्हापासून आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी होतो. तिने मला विणा वाजवायला, कोलम बनवायला शिकवलं, मला शिल्पकला देखील शिकवली.

‘‘आज ती सुंदर वात्सल्या या जगात नाही आहे. तिने मागच्या महिन्यात आत्महत्या केली. प्रणेशनेच तिला असं करण्यास भाग पाडलं. तो खुपच वाईट होता! एखाद्या माणसाने त्याच्या सुंदर पत्नीवर जळावं तरी किती? असो, तो तसा होता. वातानुकूलीत खोलीमध्ये तिने विवस्त्र झोपावं असा त्याचा आग्रह असायचा. वर्णाने ती त्याच्यापेक्षा अधिक गौरवर्णी होती. म्हणून त्याने काय केलं तुम्हाला माहित आहे का? त्याने तिच्या डोक्यावर लाल रंग फासला.

‘‘त्याच्या शिव्यांची यादीच्या यादी मी तुम्हाला देऊ शकते. वत्सल्या हे सहन करु शकली नाही आणि तिने स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं. मी मनुष्य प्राणी नाही, तिच्या मृत्यूवर माझ्या डोळयांतून अश्रुदेखील नाही आहे. प्रणेशसारखी माणसं हुशार असतील, पण त्यांना हृदय नाही. अशा माणसांना जगण्याचा काहीएक अधिकार नाही. त्याला मारुन टाकावं हे मी अगोदरच ठरवलं होतं. पण मला तुमच्यासारख्या साक्षिदारांची गरज होती. आज मी हे पूर्ण करु शकले. मला एक गोष्ट सतावते ती म्हणजे त्याने माझी निर्मिती केली. मला या गोष्टीची लाज वाटते आणि म्हणूनच मला स्वतःला नष्ट करायला आवडेल, तेच चांगलं.’’

हे सर्व बोलून झाल्यानंतर, इधायाने हळूच ती बंदुक स्वतःच्या कानफटीवर ठेवली आणि बंदुकीचं ट्रिगर दाबलं.

ते सर्व वैज्ञानिक मोठ्या धसक्याने सिलिकॉनच्या त्या डोक्याचे लहान लहान तुकडे पाहत उभे राहिले.