भास आभास (Marathi)
Sangieta.Devkar.Print&Media Writer.
आलो पुन्हा त्याच मार्गा वर तुझ्या, किती रुतले काटे,रक्तबंबाळ पाऊले फिकिर कोणाला? समजलेच नाही मला,कुठे मी चाललो, किती काळ ,किती दिवस मोजदाद कोणाला? भूलभुलैया हा कसला,की मोह हा तुझा, पुन्हा पुन्हा का फसतो तुझ्या या भुलवन्याला? कसली ही नशा कसला कैफ भावनांचा, सांग कसा शमवू मी माझ्यातल्या वादळाला? शाश्वत अशाश्वताचा हा खेळ सारा, दाटून आले आभाळ मनीचे सांग कुठे खाली करू याला? हरवले किती जपले किती त्या आपल्या सोनेरी क्षणांना, नको उगाच आता देऊ भास नको जगण्याची आस, राहु दे असाच एकटा,वेड पुन्हा तुझे लावू नकोस या वेड्याला... प्रश्नच प्रश्नच आहेत,नको आता खोटी उत्तरे मला, श्वासच नाही या देहात तर कारण का असावे जगण्याला? ........संगीता देवकरREAD ON NEW WEBSITE