Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

संग्रह ४

काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत
--- राव गेले ऑफिसला मला नाही करमत

सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
--- रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.

...... लेक, झाले ....सून
..चे नाव घेते गृहप्रवेश करुन

नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू

हिमालयाच्या पायथ्याशि उतरल्या लतिका,
...चे नाव घेते ....चि बालिका

चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा.

अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी
-----रावांच नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी

मंगळसूत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
.......रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.