Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

शनि शिंगणापूर मंदिराचे महत्त्व

शनि शिंगणापूर हे एक जाज्वल्य तीर्थस्थळ आहे. शिंगणापूरच्या या चमत्कारी शनि मंदिरामध्ये देस-विदेशातून अनेक शनि भक्त येतात. मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी कडक नियमांचे पालन करावे लागते. शनि बाल ब्रह्मचारी असल्यामुळे महिलांना चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्यास परवानगी नाही. दर्शनापूर्वी स्नान करणे अवश्य आहे. सर्व पुरुष स्नान करून ओल्या कपड्यांनी दर्शन घेऊ शकतात. शनिदेवाच्या मूर्तीवर तिळाचे तेल अर्पण करून प्रदक्षिणा घातल्या जातात.