Get it on Google Play
Download on the App Store

ललिता पंचमी


आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात.हे काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे करता येते.ललिता देवी ही या व्रताची देवता आहे.यात एखाद्या करंडकाचे झाकण तिचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात. दुर्गानवमी- आश्विन शुद्ध नवमीस हे नाव आहे.शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात.सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात.केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात.या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र असा ४८ दुर्वा ललितेला वाहतात.नैवेद्यासाठी लाडू, घारगे,वडे वगैरे पदार्थ करतात.पूजेच्या अंती घारग्यांचे वायन देतात. रात्रौ जागरण,व कथाश्रवण करतात. दुस-या दिवशी देवीचे विसर्जन करतात.