Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

स्वस्त ब्लॉक

नमस्कार

मी अजित

मी आज माझ्या सोबत व माझ्या बायको सोबत घडलेला प्रसंग सांगतोय.
मी मुळचा कोकणातला आहे पण कामानिमित्त पुण्याला असतो, माझं इंजिनिअरिंग देखील पुण्यातच पूर्ण झाली.
आगोदर आम्ही 3 मित्र एकाच रूम मध्ये राहायचो पण माझं लग्न झाल्यानंतर मी स्वतंत्र रूम भाड्याने घेतली
गावी माझं मोठं घर आहे पण शहरात स्वतःच घर असावं असं तर प्रत्येकाला वाटत,
माझं हि ते स्वप्न होत आणि मी त्यासाठी प्रयत्न देखील करत होतो

एक दिवस मित्राने सांघितलं कि एका ठिकाणी एक 2BHK ब्लॉक खूप स्वस्त विकतोय कारण मालकाला अर्जंट पैशांची गरज आहे.
मग मी आणि माझा मित्र संध्याकाळी कामावरून त्या ठिकाणी जाऊन ब्लॉक पहिला
बिल्डिंग सोसायटी खूप चांगली वाटली आणि ब्लॉक देखील मग हा मालक एवढ्या स्वस्त का विकतोय
मी मित्राला हे बोलून देखील दाखवलं
पण तो म्हणाला आपल्याला काय करायचं आहे पेपर तर क्लीअर आहेत ना मग बस झाला
तस त्या मालकाला पैशांची गरज आहे म्हणून स्वस्त भेटतोय
त्या ब्लॉक च्या मालका बद्दल सांघतो
तो खूप बॉडी बिल्डर होता आणि त्याच्या बोलण्यावरून तर तो भाई (टपोरी) वाटत होता
मग मी दुसऱ्या दिवशी कामावर सुट्टी घेतली आणि बायकोला घेऊन त्या ब्लॉक मध्ये गेलो
पण त्या ब्लॉक मध्ये बायकोला किचन मध्ये कसला तरी खूप भयानक वास आला तशी ती किचन मधून बाहेर पाळली, मी विचारलं काय झालं तेंव्हा तिने सांघितलं कि किचन मध्ये काहीतरी जाळल्याचा वास येतोय मी म्हणालो मग मला का नाही वास आला ब्लॉक बरेच दिवस बंद होता म्हणून तुला असं वाटलं असेल अशी मी तिला सांघितलं
तिला देखील तो ब्लॉक आवडला.
मी त्याच दिवशी ब्लॉक च पेमेंट केलं आणि ब्लॉक ताब्यात घेतला आणि एका महिन्या नंतर लगेच ब्लॉक मध्ये गृहप्रवेश केलं
ब्लॉक मध्ये गृहप्रवेश साठी माझ्या गावावरून नातेवाईक व सासू-सासरे आले होते ते वस्तीलाच राहिले
दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामावर गेलो
नातेवाईक देखील दुपार पर्यंत निघून गेले
मी संध्याकाळी कामावरून घरी गेलो
बायकोने दरवाजा उघडला
माझी बायको थोडी घाबरलेली वाटत होती
ती म्हणाली मी तुम्हाला चहा ठेवते
मी तोपर्यंत फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेलो,
बाहेर आल्यावर बायको चहा देत म्हणाली
किचन मधून अधून-मधून जाळल्याचा खूप घाण वास येतोय जरा बघा ना, मी संपूर्ण किचन शोधलं पण काहीच सापडलं नाही
आम्ही रात्री जेवलो आणि झोपलो
रात्री अचानक काहीतरी पडल्याच्या आवाजाने मला जाग आली
शेजारी पाहतोय तर बिछान्यावर बायको नव्हती
मग लगेच उठून हॉल मध्ये गेलो तर ती तेथेही नव्हती मग किचन ची लाईट चालू दिसली म्हणून किचन मध्ये गेलो तर माझी बायको तेथे बेशुद्ध पडली होती
मी घाबरलो आणि चटकन तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं तसं ती जागी झाली आणि आजूबाजूला पाहायला लागली मला म्हणाली मगाशी कोणीतरी बाई होती किचन मध्ये
मी तिला पकडून बेडरूम मध्ये नेलं
आणि संपूर्ण ब्लॉक शोधला पण कोणीच नव्हतं
तिची समजूत काढली तुला झोपेत भास झाला असेल
पण तिला खात्री झाली होती की नक्की कोणीतरी होत
ती तर रात्रभर झोपलीच नाही
सकाळी किचन मध्ये जायला देखील घाबरत होती मी तिला खूप समजावलं हे तुझं घर आहे हे पटवून दिलं आणि कमला गेलो
दुपारी मी कामावर असताना मला बायकोने फोन केला लवकर घरी या म्हणून ती खूप घाबरली होती
मी कामावरून निघालो बायको बिल्डिंग च्या खालीच उभी होत
व्हॉचमन देखील माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता जस त्याला काही सांघायच आहे
मग आम्ही रूमवर गेलो, मी रूम चा दरवाजा उघडला आत गेलो पण काहीच वास आला नाही मग बायकोला आत बोलावलं तिलाही काही वास आला नाही
रात्री जेवलो आणि झोपलो
अचानक रात्री काहीतरी जळल्याचा खूप घाण वास मला आला मी नाकाला रुमाल लावला आणि आत गेलो हॉल मध्ये कोणीच दिसलं नाही मग किचन कडे वळलो किचन मध्ये जे पाहिलं ते पाहून मी थरथरायला लागलो
एक बाई पूर्ण जळालेल्या अवस्थेत उभी होती तिने माझ्याकडे पाहिलं संपूर्ण शरीर भाजलेला होतो तीच
ती खूपच भयानक दिसत होती मी त्याच शब्दात वर्णन नाही करू शकत नाही
मी ओळखलं होत की ती जिवंत नाही ते
मग मी बायकोला घेऊन दरवाजा तसाच उघडा ठेऊन खाली पळालो
खाली नाईट ड्युटी वर असणाऱ्या व्हॉचमन ला सांघितलं माझ्या रूम मध्ये कोणीतरी बाई जळालेल्या अवस्थेत आहे तर तो खूपच घाबरला त्याने काहीच सांघितलं नाही पण त्याला काहीतरी माहित आहे असं मला वाटत होत मग मी भडकून विचारलं सांगतोस का आता
तसा तो म्हणाला
ये रूम के जो पहिले मलिक थे ना "ऊनकी बीबी ने खुद्द को जलकार खुदखुशी कि थी"
बस एव्हड ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली
मी मित्राला कॉल केला आणि झालेल सर्व सांघितलं आणि कार ने त्याच्या घरी गेलो
दुसऱ्या दिवशी सर्व माहिती मिळाली
त्या ब्लॉक च्या मालक सोबत होणाऱ्या भांडणांना कंटाळून त्याच्या बायकोने आत्महत्या केली
काहींचं तर असं मत होत की त्यानेच मारली असेल तीला
मग कळलं एवढ्या स्वस्त का ब्लॉक मिळाला ते
मी दुसऱ्या दिवशी ती रूम खाली केली आणि भाड्याच्या रुम वर राहायला गेलो
तो ब्लॉक मी तेवढ्याच किंमतीला विकला
माझा तसा नुकसान तर नाही झालं पण
तेंव्हापासून आजपर्यंत भाड्याच्या रूम मध्ये राहतोय
त्या दिवापासून मला कधी परत भुताचा अनुभव आला नाही

पण तुम्हाला एक सांगतो
भूत हि सर्व वाईट नसतात
फक्त त्याच्या वास्तवाच्या ठिकाणा मध्ये केलेली आपली ढवळाढवळ त्यांना आवडत नाही...

तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्या

आभार:- अजित.

सर्व वाचकांना एकच नम्र सूचना:-
1. आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही,
तर तुमचं निव्वळ मनोरंजन हाच आमचा हेतू आहे.
2. या पेजवरील गोष्ट म्हणजे कोणासोबत घडलेला प्रसंग असतो, ती लिहिणारा हा कुशल लेखक नसतो. वाचताना त्याच्या नजरेने वाचा आणि काहीही कमेंट करताना थोडं नीट विचार करा नाहीतर आपल्या पेजला कोणीच अनुभव पाठवणार नाही.

@# भुताच्या_गोष्टी