Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

चिंचेच्या झाडावरील भूत...

हि गोष्ट आपल्या पेजच्या वाचकाने पाठवली आहे

नमस्कार मी संजय भोपी

मी 9 वी मध्ये असताना माझ्या मामाच्या गावी मे महिन्याच्या सुट्टीत गेला असताना मी, मामाचा मुलगा गणेश आणि त्याचे मित्र पोहायला गावाच्या बाहेर असणाऱ्या तळ्यात गेलो.

मला तस जास्त पोहता येत नाही म्हणून मी काठालगत पोहोत होतो व थोड्या वेळाने मी लगेच बाहेर आलो. बाकी सर्व जण पोहोत होते. मी कपडे घातले आणि तळ्याच्या काठावर बसून आजूबाजूला पाहायला लागलो. अचानक माझी नजर तळ्याच्या दाव्याबाजूच्या माळालागत असणाऱ्या चिंचेच्या झाडाकडे गेली. चिंच हि पाहताच कोणाच्याही तोंडात पाणी येणार तसंच माझ्यासोबत हि झालं मी लगेच गणेश ला आवाज देऊ लागलो चिंच पाडण्यासाठी सोबत यायला पण तो व त्याचे मित्र पोहण्याची शर्यत लावत होते. त्यांना बाहेर यायला उशीर होणार म्हणून मी लगेच उठलो आणि त्या चिंचेच्या झाडाकडे जायला लागलो, खरं सांघायच तर ते चिंचेचे झाड मला चिंचेचे अमिश दाखवून त्याचा जवळ खेचत होत. झाडाखाली जाताच वरती पाहिलं तर खूप चिंचा आलेल्या होत्या, मी एक जमिनीवरील दगड उचलला आणि चिंचेवर मारला आ........ आवाज आला आणि दोन चार चिंचा खाली पडल्या मी त्यातली एक उचलली आणि खाल्ली खूप छान लागत होती चिंच अशी चिंच तर मी उभ्या आयुष्यात खाल्ली नव्हती मी क्षणाचा हि विलंब न लावता जमिनीवरून एक दगड उचलला आणि चिंचेवर जोरात मारला पुन्हा आ..... जोरात आवाज आला. या वेळी आवाज इतका जोरात आला की मला घामच फुटला, झाडावरती नक्की कोणी तरी आहे हे वाटू लागलं, मी घाबरत झाडाच्या खोडाजवल जाऊन वर पाहू लागलो तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली वरती अंदाजे 12 फूट उंचीवर एक 5 फूट उंचीची अंगावर खूप केस असलेली एक वयस्कर बाई झाडावर बसलेली होती. माझ्या तोंडातून किंचाळी निघाली तशी ती बाई ने माझ्या अंगावर उडी मारली. तिकडे मामाचा मुलगा गणेश आणि त्याच्या मित्रांचे पोहून एव्हाना झाले होते कपडे घालून ते मला शोधू लागले माझ्या किंचाळी ने घाबरत घाबरत चिंचेकडे आले पाहतात तर मी खोडाजवल बेशुद्ध पडलो होतो.

त्यांनी मला उचलून घरी नेलं मामी ने मामला फोन करून तातडीने बोलावलं, मामा डॉक्टर घेऊन आला मला इंजेक्शन दिल्यावर मी शुद्धीवर आलो शुद्धीवर येताच मी ओरडायला लागलो नुसता जोरात आ..... आवाज निघत होता एकदम भयानक आवाज होतं ते(असं नंतर मला आजही सर्व सांघतात) डॉक्टर गावातीलच असल्याने त्यांनी मामला मला भूतबाधा झाली आहे असं सांघितलं. मला शेजारच्या गावात भागताकडे नेलं तिथे नेताच मी तिथून पळून जायचं प्रयत्न करायला लागलो तोंडातून तेच खूप भयानक आ...... आवाज निघत होत मला तर तिघे जणांनी पकडून त्या भागताच्या घरात नेलं आणि मंत्र तंत्राने माझ्या अंगावर भसम् टाकून माझ्या अंगातील त्या बाईला एका नारळा मध्ये उतरविले आणि मी पुन्हा बेशुद्ध झालो.

शुद्धीवर आलो तेंव्हा तुझ्याबरोबर काय झालं ते विचारू लागले

मला मी झाडावर पाहिलेलं भयानक चेहरा डोळ्यासमोर आला आणि मी जोरात किंचाळलो तस सर्व घाबरले, मामाने मला धीर देत जवळ घेतलं आणि माझी समजूत काढली.

मामाने सांघितलं तळ्याच्या इथे पूर्वी शेती केली जायची पण आता त्या शेतीच माळात (पडीक जमिनीत) रूपांतर झालं आहे, कारण आहे ते चिंचेच्या झाडावर असणारी हेरली. हेरली म्हणजे जादू टोन करणारी बाई मेल्यावर तिचं भूत चिंचेच्या झाडावर बसते, हि बाई त्या झाडाची चिंच खाणाऱ्यांना झपाटले, मलाही तिनेच झपाटले असे मामाने सांघितलं त्या भगताने तिला एका नारळात उतरविले आणि मामाला तो नारळ चिंचेखाली फेकायला सांघितलं.

मी त्यानंतर आजही कोणाकडे सुट्टीला जात नाही

भूत हा शब्द वाचला किंव्हा ऐकलं तरी तो भयानक चेहरा डोळ्यासमोर येत

भूत मी पाहिलंय आणि अनुभवलं सुद्धा

हि गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्या...

आभार:-संजय भोपी.

@भुताच्या गोष्टी