Get it on Google Play
Download on the App Store

बालपण आणि स्वयंवर

राणी पद्मिनीच्या पित्याचे नाव गंधर्वसेन होते आणि मातेचे नाव चंपावती होते. राणी पद्मिनीचे पिता गंधर्वसेन सिंहल प्रांताचे राजा होते. लहानपणी पद्मावती कडे "हिरामणी" नावाचा बोलणारा पोपट होता. या पोपटाच्या बरोबर तिने आपल्या अधिकतम वेळ व्यतीत केला होता. राणी पद्मिनी बालपणापासूनच अप्रतिम सुंदर होती आणि ती वयात आल्यावर तिच्या वडिलांनी तिचे स्वयंवर आयोजित केले. या स्वयंवरात त्यांनी सर्व हिंदू राजे आणि राजपूत यांना आमंत्रित केले. एका छोट्या प्रदेशाचा राजा मलखान सिंह देख्हील त्या स्वयंवराला हजर होता.
राजा रावल रतन सिंह देखील आधीपासून एक नागमती नावाची पत्नी असून देखील त्या स्वयंवराला उपस्थित होता. वंशाला अधिक उत्तराधिकारी मिळावेत यासाठी प्राचीन काळी राजे एकाहून अधिक विवाह करत असत. राजा रावल रतन सिंह याने त्या स्वयंवरात मलखान सिंह याला पराभूत करून पद्मिनिशी विवाह केला. विवाह संपन्न झाल्यानंतर तो आपली दुसरी पत्नी पद्मिनी हिच्यासह चित्तोड ला परत गेला.