Get it on Google Play
Download on the App Store

गोरा आणि बदल

पुढच्या दिवशी तांबडे फुटताच १५० पालख्या किल्ल्यावरून खिलजीच्या शिबिराकडे रवाना झाल्या. पालख्या तिथे थांबल्या जिथे रतन सिंहाला कैद करून ठेवले होते. पालख्या पाहून रतन सिंहाला वाटले, की पालख्या किल्ल्यावरून आल्या आहेत, तेव्हा त्यातून राणी सुद्धा इथे आली असणार. तो स्वतःला फारच अपमानित समजू लागला. पण त्या पालख्यांमध्ये राणीही नव्हती आणि दासी देखील नव्हत्या, अचानक त्या पालख्यांमधून पूर्णपणे सशत्र असलेले सैनिक बाहेर पद्डले, त्यांनी रतन सिंहाची सुटका केली आणि खिलजीच्या पगेतील घोडे चोरून वेगाने त्या घोड्यांवरून किल्ल्याच्या दिशेने धावले. या चकमकीत गोरा शौर्याने लढताना कामी आला, तर बदल रतन सिंहाला सुरक्षित किल्ल्यात घेऊन आला.