Get it on Google Play
Download on the App Store

हिंगलाज माता मंदिर, बलूचिस्तान

http://images.jagran.com/naidunia/nanika-mandir_201568_11599_08_06_2015.jpg

पाकिस्तानात दुसरे विशाल मंदिर आहे हिंगलाज देवीचे. या मंदिराची गणती देवीच्या प्रमुख ५१ शक्तीपीठांमध्ये केली जाते. असे म्हटले जाते की या जागेवर आदिशक्तीचे मस्तक पडले होते. हे मंदिर बलुचिस्तान मधील ल्यारी जिल्ह्याच्या हिंगोला नदीच्या किनाऱ्यावर आहे. निसर्गसौंदर्याने नटलेली ही जागा इतकी सुंदर आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला इथून परत जावेसेच वाटत नाही. असे म्हणतात की सतीच्या मृत्यूने नाराज झालेल्या भगवान शंकराने इथेच तांडव समाप्त केले होते. एक मान्यता अशी देखील आहे की रावणाला मारल्यानंतर प्रभू रामाने या ठिकाणी तपश्चर्या केली होती.
भारत पाकिस्तान वाटणीच्या आधी इथे लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू येत असत, परंतु आता इथे बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे श्रद्धाळू लोकांची संख्या खूपच कमी झाली आहे. तरीही स्थानिक लोकांसाठी या मंदिराचे खूप महत्व आहे. असे सांगण्यात येते की या मंदिराचे दर्शन घ्यायला स्वतः गुरु गोविंदसिंह देखील आले होते. हे मंदिर विशाल पर्वताच्या खाली आहे आणि इथे भगवान शंकराचा एक प्राचीन त्रिशूळ देखिल आहे.