Get it on Google Play
Download on the App Store

जीतू राय

http://www.cnmsports.com/img/articles/Jitu-Rai.jpg

जीतू राय (जन्म: २५ ऑगस्ट १९८९, नेपाळ) एक नेपाळी वंशाचा शूटर आहे जो भारतासाठी खेळतो. एकाच विश्वचषक स्पर्धेत २ पदके जिंकणारा तो प्रथम भारतीय आणि नेपाळी आहे. त्याने ग्लासगो मध्ये आयोजित २०१४ राष्ट्रामंडळ खेळांमध्ये २८ जुलै २०१४ रोजी १९४.१ गुण मिळवून सुवर्ण पदक जिंकले. तो भारतीय सैन्याचा जवान आहे. रायने मे २०१४ च्या विश्व चषक स्पर्धेमध्ये १० मीटर एयर पिस्तोल मध्ये सुवर्ण आणि ५० मीटर पिस्तोल मध्ये रौप्य पदक जिंकले होते.
स्पेनच्या ग्रानाडा मध्ये आयोजित ५१ व्या विश्व नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर पिस्तोल स्पर्धेमध्ये जीतूने रौप्य पदक जिंकून रियो मध्ये २०१६ च्या ऑलिम्पिक्स स्पर्धांसाठी पात्रता मिळवली.
२०१४ च्या आशियाई स्पर्धेमध्ये त्याने पहिल्याच दिवशी ५० मीटर मेन्स पिस्तोल रायफल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.