Get it on Google Play
Download on the App Store

अभिनव बिंद्रा

http://one.enewsbihar.com/wp/wp-content/uploads/2015/09/Abhinav_Bindra.jpg

अभिनव बिंद्रा १० मीटर एयर रायफल स्पर्धांमध्ये भारताचा एक प्रमुख नेमबाज आहे. ११ ऑगस्ट २००८ ला त्याने बीजिंग ऑलिम्पिक्स मधील वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आणि वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. पात्रता फेरीत तब्बल ५९६ अंक प्राप्त केल्यानंतर बिंद्रा ने जबरदस्त मानसिक एकाग्रतेचे दर्शन घडवले आणि अंतिम फेरीत १०४.५ स्कोर बनवला. त्याने एकूण ७००.५ अन्कांसाहित सुवर्ण जिंकण्यात सफलता मिळवली. त्याने पात्रता फेरीत चौथे स्थान मिळवले होते, तर त्याचा सहस्पर्धक गगन नारंग खूप कमी फरकाने अंतिम फेरीला मुकला होता. तो ९ व्या स्थानावर राहिला होता. २५ वर्षीय अभिनव बिंद्रा एयर रायफल नेमबाजी मध्ये वर्ष २००६ मध्ये विश्व चैम्पियन देखील राहिला आहे.