Get it on Google Play
Download on the App Store

यमपुरी चे दार

पुराणांनुसार यमलोक एक लाख योजन क्षेत्रात विस्तारले आहे आणि त्याचे चार दरवाजे आहेत. यमलोकात आल्यावर आत्म्याला या चार प्रमुख दारांमधुन एका दाराने त्याच्या कर्मानुसार प्रवेश मिळतो.  
 
दक्षिण दार- चार मुख्य दारांपैकी दक्षिण द्वारातून पापियांचा प्रवेश होतो. हे दार अंधार, भयानक साप, सिंह, कोल्हे आणि इतर राक्षसांनी घेरलेला असतो. इथून प्रवेश करणाऱ्या पापी आत्म्यांसाठी हे प्रचंड कठीण असते. याला नरकाचं दार असंही म्हटलं जातं. यमनियमांचे पालन न करणाऱ्यांना नक्कीच या दारातून प्रवेश मिळून कमीतकमी १०० वर्षे कष्ट करावी लागतात.
 
पश्चिम दार- पश्चिम दरवाजा हा रत्नजडीत आहे. ज्यांनी दान, पुण्य केलं असेल, धर्माचे रक्षण केले असेल अश्यांना या दारातून प्रवेश मिळतो.
 
उत्तर दार- उत्तर दरवाजा देखील वेगवेगळ्या सुवर्णजडीत रत्नांनी सजलेला असतो. ज्यांनी आयुष्यभर मातापित्याची खूप सेवा केली, सत्न बोलणे केले आणि मनाने, कामाने, शब्दाने हिंसा केली नाही अश्यांनाच ये दारातून प्रवेश मिळतो.

पूर्व दार-
पुर्वेचे दार हीरे, मोती, नीलम आणि पुश्कराज अशा रत्नांनी सजलेले असते. या दारातून योगी, ऋषी, सिद्ध साधू अशा आत्म्यांनाच प्रवेश मिळतो. याला स्वर्गाचे द्वार असेही म्हणतात.