Get it on Google Play
Download on the App Store

यमद्वितीयेची (भाऊबिज) कहाणी

सुर्यदेवांच्या पत्नीचे नाव संज्ञादेवी असे होते. त्यांना दोन अपत्य होती- यमराज आणि यमुना. संज्ञादेवी सुर्यदेवांच्या ज्वाळा सहन न करू शकलयाने उत्तरधृवावर सावली बनून राहू लागल्या. त्याच सावलीमुळे ताप्तीनदी आणि शनीचराचा जन्म झाला. इकडे त्यांचे यमराज आणि यमुनेशी वर्तन बिघडले. यावर नाराज होऊन यमाने यमपुरी नावाची एक नविन वस्ती स्थापन केली जिथे पाप करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागली. भावाला हे काम करताना पाहून यमुना गोलोकात गेली जे कृष्णावतरात ही होते.

यमुनेची आपल्या भावावर माया होती. ती त्याला अनेकदा आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण द्यायची. पण यमराज आपल्या कामात व्यस्त असल्याने तिची निमंत्रणं टाळत राहिले. बराच काळ गेल्यानंतर एके दिवशी यमराजाला आपल्. बहिणीची आठवण आली. त्यांनी दुतांना पाठवून यमुनेचा शोध घ्यायला सांगितला परंतू ती कुठेच सापडली नाही. मग यमराज स्वतःच बहिणीला शोधायला गोलोकात निघाले जिथे विश्रामघाटावर त्यांची भेट झाली. भावाला बघून यमुनेच्या आनंदाला उधाण आले. तिने अतिशय आनंदाने स्वागत केले, भोजन केले. यासगळ्याने प्रसन्न होऊन यमाने तिला एक वर मागायला सांगितले. तेव्हा यमुना म्हणाली-
माझ्या जलात स्नान घेणाऱ्या कोणालाच यमपुरीत जायला लागू नये.

हा पेचात टाकणारा प्रसंग होता. यमुनेला असे वर दिल्याने यमपुरीचे अस्तित्त्वच संपणार होते. भावाला असे द्विधा मनस्थितीत बघून यमुना म्हणाली-
काळजी करू नका, मला असे वरदान दया की आजच्या दिवशी जे कोणी बहिणीच्या घरी जेवण करून मथुरेतल्या या विश्रामघाटावर स्नान करतील त्यांना यमपुरीतून मुक्ती मिळेल. यमानेयाचा स्विकार केला. त्यांना बहिणीला वरदान दिले की त्या दिवशी जे कोणी बहिणीच्या घरी जेवणार नाहीत त्यांना मी बांधून यमलोकात घेऊन जाईन आणि विश्रामघाटावर स्नान करणाऱ्यांना स्वर्गलोक प्राप्त होईल.