Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

अभिजितचे पतन – माझे प्रतिपादन

१.      १४५००BCE नंतर दीर्घकाळपर्यंत अभिजित खगोलीय उत्तर ध्रुवाच्या काहीसा जवळ होता. प्रथम २०००-२५०० वर्षे ध्रुव त्याच्या आणखी जवळ सरकला (१२००० BCE मध्ये अंतर कमीत कमी डिग्री - होते) पण नंतर हळूहळू ध्रुव आणि अभिजित दूर जाऊ लागले. जसा अभिजित ध्रुवापासून दूर गेला तसा त्याचा आकाशाचा नकाशा बनण्यासाठी उपयोग होत नाहीसा झाला. त्याचे नक्षत्रांबरोबर मोजणे निरर्थक होऊ लागले.

२.      इंद्र-स्कंद संवाद कोणत्या काळात झाला हे ठरवण्यासाठी दोन घटना विचारात घ्याव्या लागतात. एक म्हणजे रोहिणीची धाकटी बहीणतापलेल्या पाण्यापाशीगेली आणि दुसरी म्हणजे नक्षत्र आकाशातून पडले. या दोन्हीचा अर्थ लावणे आवश्यक आहे. कोणते नक्षत्रपडले?’ याचे माझेहि उत्तरअभिजितहेच आहे. अभिजित खगोलीय उत्तरध्रुवापासून बराच दूर गेला याचा अर्थ तोआकाशातून पडलाअसा करतां येईल काय ते प्रथम पाहू या. जेव्हा तो ध्रुवाच्या जवळपास होता तेव्हां उत्तरभारतात (अक्षांश ३० डिग्री) नेहेमीच क्षितिजाचे वर दिसत होता. मात्र त्याचे ध्रुवापासूनचे अंतर जसे वाढत गेले तसा तो ध्रुवाभोवती फिरताना प्रत्येक फेरीत काही काळ क्षितिजापाशी खालीं उतरलेला दिसू लागला. अंतर आणखी वाढल्यावर तर फेरा करताना काही काळ तो चक्क क्षितिजाचेहि खालीं जाऊं लागला (मावळूं लागला). माझ्या मते यालाअभिजितचे पतनम्हणणे योग्य होईल. खालील चित्रात हे स्पष्ट केले आहे.(उत्तर ध्रुव क्षितिजाचे वर ३० डिग्री उंचीवर दाखवला आहे कारण कुरुक्षेत्राचे अक्षांश तेवढे आहेत.)

साधारण १०,००० BCE च्या पुढे अभिजितचे गगनातून पतन जाणवू लागले आणि ९००० BCE नंतर ही गोष्ट ब्रह्मदेवाच्या नजरेस आणून देण्याची गरज इंद्राला नक्कीच वाटूं लागली असे म्हणतां येईल! तेव्हां इंद्र-स्कंद संवाद, या घटनेचा विचार केला तर, ९००० BCE  नंतर, आणिगगनात् च्युतंचा अर्थ क्षितिजाखाली जाणेअसा घेतला तर ७००० BCE नंतर झाला असे म्हणता येईल.

दुसरी श्लोकांतील घटना म्हणजे रोहिणीची धाकटी बहीण (कृत्तिका, देवी) अभिजितशी प्रथम स्थानासाठी स्पर्धा करण्यासाठी तापलेल्या पाण्यापाशी जाणे. सर्व नक्षत्रे एकमेकांच्या बहिणी असल्यामुळे, रोहिणीची कन्येसमान धाकटी बहीण कोण तर कृत्तिका! तिला देवीहि म्हटले आहे ते कां याचा उलगडा डॉ. वर्तकानीहि केलेला नाही मलाहि सुचलेला नाही. कृत्तिका तापलेल्या पाण्यापाशी जाणे याचा अर्थ Summer Solstice सूर्य कृत्तिकांत असताना होणे असा घ्यावयाचा तर तो काळ २२००० BCE एवढा मागेच होऊन गेला होता. त्यामुळे हा अर्थ येथे उचित वाटत नाही. १४५०० BCE मध्ये कृत्तिकांपाशी Autumnal Equinox, म्हणजे शरद संपात होता. त्या काळानंतर शरदसंपात मागे धनिष्ठाकडे सरकत गेला तर Winter Solstice मागे सरकत ७००० - ७५०० BCE काळी कृत्तिकांपाशी आला. म्हणजे कृत्तिका Summer Solstice कडे नव्हे तर Winter Solstice पाशी सरकली! याला तापलेल्या पाण्यापाशी जाणे म्हणता येत नाही!

दुसरी शक्यता अशी - श्री. ओक यानी पुस्तकात R. N. Iyengar आणि P. V. Holey यांचे मत उद्धृत केले आहे कीं ज्येष्ठा नक्षत्रालाहि रोहिणी म्हटले जात असे. श्री. ओक यानी हे मत खोडून काढलेले नाही! तेव्हा ते विश्वसनीय आहे असे गृहीत धरून मला असे वाटते कीं श्लोकांत रोहिणीची धाकटी बहीणअसे जे म्हटले आहे तेथे रोहिणी म्हणजे ज्येष्ठा अभिप्रेत असावी! ज्येष्ठाची कन्येसमान धाकटी बहीण मग अनुराधा ठरते! ,०००,५०० BCE या काळी Summer Solstice धनिष्ठापासून मागे सरकत ज्येष्ठा-अनुराधा पाशी पोचला होता. तेव्हाज्येष्ठारोहिणीची धाकटी बहीण अनुराधा प्रथम स्थान मिळवण्यासाठी तापलेल्या पाण्यापाशी गेली आहेहे वर्णन जुळते! अभिजितच्या प्रथम स्थानाला काही अर्थ उरला नव्हताच. तेव्हा प्रथम स्थानासाठी स्पर्धा ज्येष्ठा आणि अनुराधा यांच्यात होती. ‘इच्छती ज्येष्ठतां देवीहा उल्लेख कदाचित तेच दर्शवीत असावा! ही घटनाहि त्यामुळे, इंद्र-स्कंद संवाद ७०००७५०० BCE या काळात झाला असण्याची शक्यता दर्शविते!

इंद्राचा Problem माझ्या मते असा आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने कालचक्र धनिष्ठापासून योजले होते. तेव्हा सूर्य धनिष्ठांत पोचला कीं वर्षाकाळ आला हे जाणून इंद्र आपले पाऊस पाडण्याचे काम सुरू करी. अभिजित तेव्हामेरुमणिया नात्याने नक्षत्रांत मोजला जात होता. पण आतां परिस्थिति फार बदलली होती. Summer Solstice धनिष्ठापासून खूप मागे ज्येष्ठा-अनुराधाकडे सरकला होता. अभिजित उत्तरध्रुवापासून दूर जाऊन रोज मावळत होता. त्याचे आकाशातून पतन झाले होते. इंद्राला काही कळेनासे झाले होते. (मूढोस्मि). म्हणून त्याने स्कंदाला विनवले कीं तूं ब्रह्मदेवाबरोबर चर्चा कर आणि काय करायचे ते ठरवा!

. चौथ्या श्लोकामध्ये काय बदल झाला ते सांगितले आहे त्यात कॄत्तिका खूप आनंदित झाल्या झळाळल्या एवढेच म्हटले आहे त्याचा उलगडा मला खात्रीलायक झाला नाही. या काळी Winter Solstice कृत्तिकापाशी आला होता. मग ब्रह्मदेवाने कालरचना बदलून Summer Solstice पासून सुरू करण्या ऐवजी Winter Solstice पासून सुरू करावी असे ठरवले काय? आणि त्यामुळे कृत्तिकाना नक्षत्रमालेत, धनिष्ठाऐवजी, प्रथम स्थान मिळाले काय? Winter Solstice पासून उत्तरायण सुरू होत असल्यामुळे असा निर्णय झालाहि असेल! प्रथम स्थान मिळाल्यामुळे कृत्तिका झळाळल्या हे ठीकच म्हटले पाहिजे.

. कृत्तिकांचे प्रथम स्थानहि कायम राहिलेले नाही. आपण आता नक्षत्र नामे अश्विनीपासून मोजतो! हा बदल केव्हां आणि कां झाला? इंद्राने मागितला आणि ब्रह्मदेवाने केला काय? Vernal Equinox अश्विनीपाशी होऊ लागला तेव्हां हा बदल झाला काय? आता तोहि तेथे नाही तरीहि अश्विनीचे प्रथम स्थान कायम आहे. आता इंद्र आणि ब्रह्मदेव काही बदल करीत नाहीत असे दिसते.