Get it on Google Play
Download on the App Store

पांडवांच्या जन्माची कथा


पाचही पांडवांचा जन्म देखील पित्याच्या वीर्याशिवायाच झाला होता. एकदा राजा पंडू आपल्या दोन्ही पत्नी - कुंती आणि माद्री - यांच्यासह शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. तिथे त्यांना एक मैथुनात रममाण असलेले हरीणांचे जोडपे दिसले. पंडूने ताबडतोब बाण मारून त्यातल्या मृगाला जखमी केले. मारताना त्या मृगाने पंडूला शाप दिला, "राजा, तुझ्या एवढा क्रूर पुरुष या विश्वात कोणीही नसेल. तू मला मैथुनाच्या वेळी बाण मारला आहेस. तेव्हा पुढे जेव्हा कधी तू मैथुनरत असशील, तेव्हा तुझा मृत्यू होईल."
या शापाने पंडू अत्यंत दुःखी झाला आणि त्याने आपल्या राण्यांना सांगितले, "आता मी माझ्या साऱ्या वासनांचा त्याग करून या वनातच राहणार आहे. तुम्ही हस्तिनापुरात निघून जा." त्याचे हे बोलणे ऐकून राण्या दुःखी झाल्या, त्या म्हणाल्या, "नाथ, आम्ही तुमच्याशिवाय एक क्षणही जिवंत राहू शकत नाही. तुम्ही आम्हाला देखील तुमच्या सोबत वनात ठेऊन घेण्याची कृपा करा." पंडूने त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना आपल्यासोबत जंगलात राहण्यास अनुमती दिली.
त्याच दरम्यान पंडू राजाने अमावास्येच्या दिवशी ऋषी - मुनींना ब्रम्हदेवाच्या दर्शनासाठी जात असलेले पहिले. त्याने त्या ऋषी - मुनींना आपल्याला सोबत घेऊन जाण्यासाठी आग्रह केला. त्यांच्या या आग्रहावर ऋषी - मुनी म्हणाले, "राजा, कोणताही निःसंतान पुरुष ब्राम्हलोकात जाण्यास पात्र ठरत नाही, त्यामुळे आम्ही तुला आमच्या सोबत तिकडे घेऊन जाण्यास असमर्थ आहोत."
त्यांचे हे बोलणे ऐकून राजा पंडू आपली पत्नी कुंतीला म्हणाला, "कुंती, माझे जन्म घेणेच व्यर्थ होत चालले आहे, कारण निःसंतान व्यक्ती पितृ-ऋण, ऋषि-ऋण, देव-ऋण तथा मनुष्य-ऋण यांच्यापासून मुक्ती मिळवू शकत नाही. पुत्र प्राप्तीसाठी तू माझी मदत करू शकतेस का?" त्यावर कुंती म्हणाली, "स्वामी, दुर्वास ऋषींनी मला असा मंत्र दिला आहे ज्यामुळे मी कोणत्याही देवतेला आवाहन करून मनाजोगती वस्तू मिळवू शकते. तुम्ही आज्ञा करा मी कोणत्या देवाला बोलावू?" यावर पंडूने धर्माला आमंत्रित करण्याचा आदेश दिला. धर्माने कुंतीला पुत्र प्रदान केला ज्याचे नाव युधिष्ठीर ठेवण्यात आले. कालांतराने पंडूने कुंतीला पुन्हा दोन वेळा वायुदेव आणि इंद्रदेवाला आमंत्रित करण्याची आज्ञा दिली. वायुदेवापासून भीम तर इंद्रदेवापासून अर्जुनाची उत्पत्ती झाली. त्यानंतर पंडूच्या आदेशावरून कुंतीने माद्रीला त्या मंत्राची दीक्षा दिली. माद्रीने अश्वनिकुमारांना आमंत्रित केले आणि नकुल आणि सहदेवाचा जन्म झाला.
एक दिवस पंडू राजा माद्रीसोबत वनात नदीच्या किनाऱ्यावर फिरत होता. वातावरण रमणीय होते आणि थंड, मंद, सुगंधित वारा वाहत होता. तेवढ्यात वाऱ्याच्या झोताने माद्रीचे वस्त्र उडाले. त्यामुळे पंडूचे मन विचलित झाले. आणि तो मैथुनात रत होताच शापाच्या प्रभावाने त्याचा मृत्यू झाला. माद्री त्याच्यासोबत सती गेली, परंतु पुत्रांच्या पालन पोषणासाठी कुंती हस्तिनापुरात परत आली.

अद्भुत पौराणिक जन्म कथा

passionforwriting
Chapters
धृतराष्ट्र, पण्डु आणि विदुर यांच्या जन्माची कथा : कौरवांच्या जन्माची कहाणी पांडवांच्या जन्माची कथा कर्णाच्या जन्माची कथा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा पवन पुत्र हनुमानाच्या जन्माची कथा हनुमान पुत्र मकरध्वज याच्या जन्माची कथा द्रोणाचार्य यांच्या जन्माची कथा ऋषि ऋष्यश्रृंग यांच्या जन्माची कथा कृपाचार्य आणि कृपी यांच्या जन्माची कथा द्रौपदी व धृष्टद्युम्न यांच्या जन्माची कथा राधाच्या जन्माची कथा राजा सगर याच्या ६० हजार पुत्रांच्या जन्माची कथा जनक नंदिनी सीता हिच्या जन्माची कहाणी मनु व शतरूपा यांच्या जन्माची कहाणी राजा पृथु याच्या जन्माची कथा