Get it on Google Play
Download on the App Store

कौरवांच्या जन्माची कहाणी


एकदा महर्षी वेदव्यास हस्तिनापुरात आले. गांधारीने त्यांची खूप सेवा केली. ज्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी गांधारीला वरदान मागण्यास सांगितले. गांधारीने वरदान मागितले की आपल्याला आपल्या पतीसारखेच बलवान १०० पुत्र व्हावेत. वेळ झाल्यावर गांधारी गर्भवती राहिली आणि गर्भ २ वर्षांपर्यंत पोटातच राहिला. त्यामुळे गांधारी घाबरली आणि तिने तो गर्भ पडून टाकला. तिच्या पोटातून एक लोखंडासारखा मांसपिंड निघाला. आपल्या योगदृष्टीने महर्षी वेदव्यास यांनी हे सर्व पहिले आणि ते तत्काळ गांधारीला भेटायला आले. तेव्हा गांधारीने त्यांना तो मांसपिंड दाखवला. त्यांनी गांधारीला सांगितले की तू लगेच शंभर कुंड बनवून त्यांना तुपाने भरून सुरक्षित जागी त्यांच्या रक्षणाची व्यवस्था कर आणि या मांसपिंडावर पाणी शिंपड. पाणी शिंपडल्यावर त्या मांसपिंडाचे १०० तुकडे झाले. व्यासांनी सांगितले की या १०० तुकड्यांना तुपाने भरलेल्या कुंडांमध्ये घाल. आणि ती कुंड २ वर्षांनंतरच उघड. एवढे बोलून वेदव्यास तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात निघून गेले. वेळ झाल्यावर याच कुंडांतून प्रथम दुर्योधन, आणि नंतर गांधारीचे ९९ पुत्र आणि एक कन्या उत्पन्न झाले.

अद्भुत पौराणिक जन्म कथा

passionforwriting
Chapters
धृतराष्ट्र, पण्डु आणि विदुर यांच्या जन्माची कथा : कौरवांच्या जन्माची कहाणी पांडवांच्या जन्माची कथा कर्णाच्या जन्माची कथा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा पवन पुत्र हनुमानाच्या जन्माची कथा हनुमान पुत्र मकरध्वज याच्या जन्माची कथा द्रोणाचार्य यांच्या जन्माची कथा ऋषि ऋष्यश्रृंग यांच्या जन्माची कथा कृपाचार्य आणि कृपी यांच्या जन्माची कथा द्रौपदी व धृष्टद्युम्न यांच्या जन्माची कथा राधाच्या जन्माची कथा राजा सगर याच्या ६० हजार पुत्रांच्या जन्माची कथा जनक नंदिनी सीता हिच्या जन्माची कहाणी मनु व शतरूपा यांच्या जन्माची कहाणी राजा पृथु याच्या जन्माची कथा