Get it on Google Play
Download on the App Store

सीता ही मंदोदरीची कन्या होती

रावण हा आपण मारलेल्या साधूंचे रक्त एका मोठ्या मडक्यात भरून ठेवत असे. साधू ग्रीतास्मद हे देवी लक्ष्मीला आपल्या कन्येच्या रुपात प्राप्त करून घेण्यासाठी प्रार्थना करत होते. त्यांनी दर्भापासून दूध काढून ते मंत्रांनी शुद्ध करून एका मडक्यात बंद केले जेणेकरून लक्ष्मी त्याच्यामध्ये वास करू शकेल. रावणाने या मडक्यातील दूध आपल्या मडक्यात टाकले. मंदोदरी रावणाच्या पापकर्मांनी हैराण झाली होती आणि आत्महत्या करण्यासाठी तिने त्या मडक्यातील पदार्थांचे सेवन केले. आणि तिचा मृत्यू होण्याऐवजी तिच्या गर्भात देवी लक्ष्मीचा अवतार स्थापित झाला. मंदोदरीने त्या कन्येला कुरुक्षेत्रात पुरून टाकले जिथे ती राजा जनकाला मिळाली आणि त्याने त्या कन्येचे नाव सीता असे ठेवले.