Get it on Google Play
Download on the App Store

अयोध्येला परतताना


युद्ध जिंकल्यावर रामाने सांगितले, "आता आपल्याला अयोध्येला परत जायचे आहे." एक भलेमोठे असे पुष्पक विमान बाहेर उभे होते जे मनाच्या आदेशावर चालत असे. जेव्हा सर्व लोक विमानात चढले तेव्हा बाहेर शिल्लक राहिलेल्या वानरांनी सांगितले की, "आम्ही या पुलावरून पायी चालत येणार नाही, आम्ही देखील विमानानेच येणार." तेव्हा प्रभू रामांनी विमानाला आदेश दिला की "आपला आकार वाढव." तेव्हा विमानाने आपला आकार वाढवला आणि सर्व वानर आत बसले.