Get it on Google Play
Download on the App Store

युधिष्ठिराचा आरसा

एक दिवस युधिष्ठिराला एक जादूचा आरसा भेटीच्या रूपाने मिळाला. जेव्हा कोणी त्या आरशा समोर उभं राही तेव्हा त्याला आरशात स्वतः ऐवजी त्या व्यक्तीचा चेहेरा दिसायचा ज्या व्यक्तीबद्दल तो सर्वात जास्त विचार करतो. पांडव आणि त्यांचे साथीदार मौज मजा करत होते. कोणी त्या आरशात आपले प्रेमिक, कोणी आपले पती तर कोणी सोन्या चांदीचे दर्शन घेतले. एक दिवस कृष्ण त्यांना भेटायला आला. पांडवांना हे पहायची उत्सुकता होती की कृष्ण कोणा विषयी विचार करतो. अर्जुनाने सांगितले की कृष्ण माझ्या बाबतीतच विचार करीत असणार, ज्याच्याशी सर्वजण सहमत देखील झाले. परंतु त्यांनी बघितलं की आरशात शकुनी मामा फासे टाकत आहे. अर्जुन म्हणाला, "कृष्णा, जर तुम्ही राधा, रुक्मिणी किंवा सत्यभामेचा विचार करत असतात तर मी समजू शकलो असतो. आम्ही सगळे तुमचे मित्र आहोत, भक्त आहोत, भाऊ आहोत, परंतु आमच्यापैकी कोणी दिसलं नाही, भीष्म किंवा द्रोण देखील दिसले नाहीत, तुझ्याजवळ याचं उत्तर आहे?" यावर कृष्णाने उत्तर दिलं, "अर्जुना, खूप सरळ गोष्ट आहे. शकुनी नेहेमीच काहीना काही नवी चाल खेळत असतो. त्याला अशी चिंता असते की मी त्याची प्रत्येक खेळी उध्वस्त करून टाकेन. तुम्हा सगळ्यांपेक्षा देखील जास्त तो माझा विचार करतो. म्हणूनच मी देखील सदा सर्वदा त्याचा विचार करतो आणि आपली खेळी त्या हिशोबाने करत असतो."