Get it on Google Play
Download on the App Store

नेत्रदान श्रेष्ठदान ......

नेत्रदान म्हणजे मृतू पश्च्यात आपले डोळे अंध व्यक्तीला दृष्टीदान करणे.नंतर दोन अंध व्यक्ती जग पाहू शकतात,हे भाग्याचे आहे !

''आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वाधिक अंध,नेत्रहीनांची सर्वाधिक संख्या भारतातच आहे.! जवळपास 52 लाख अंध व्यक्ती आपल्या देशात राहत असून त्यापैकी 2,70,000(दोन लाख सत्तर हजार)लहान मुले आहेत!याचाच अर्थ जगातील एक चतुर्थांश अंध लोकसंख्या हि आपल्या भारतात आहे.हे चित्र विदारक आहे.!

इंडिअन मेडिकल कौन्सिलच्या आकडेवारीनुसार उपोरोक्त 52 लाख अंध व्यक्ती पैकी 25 टक्के संख्या हि corneal blindness ची असून,2.5लाख अंध व्यक्तींच्या संखेपैकी 1लाख तरी corneal disease पासून बरे होऊ शकतात परंतु त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करायला हवे.आता तरी डोळे उघडा.

गतवर्षी 9,50,000 (साडे नऊ लाख) मृतू व्यक्तींपैकी फक्त 10,000 (दहा हजार) लोकांनीच नेत्रदान केले होते!!! जेव्हा लक्षावधी दृष्टीहिनाना दृष्टी द्यायची आहे,त्या समोर हि संख्या फारच अत्यल्प आहे.

''नेत्रदाना विषयीचे गैरसमज (विशेषत: ग्रामीण भागातले)'':-

१)मृतू पाश्च्यात नेत्रदान केल्यास पुढच्या जन्मी अंध किंवा अपंग जन्म होतो.
२)नेत्रदान करण्यासाठी हॉस्पीटलला मृत व्यक्तीची बोडी न्यावी लागत असल्याने,एकंदर प्रकरीयेस खूप उशीर होतो.
३)शेवटी नातेवायीकांची अनुमती तसेच सहकार्य नसेल तर नेत्रदात्याने केलेले प्रतिज्ञापत्र कुचकामी ठरते!

'' नेत्रदान म्हणजे काय?'':-

१)नेत्रदान म्हणजे आपल्या मृतू पाश्च्यात आपले डोळे अंध व्यक्तीला दृष्टी देण्यास दान करणे.
२)नेत्रदान केलेले डोळे CORNEA TRANSPLANTS साठी वापरण्यात येतात.
३) CORNEA हे डोळ्या सभोवतालचे भिंग असते,नेत्ररोगामुळे अथवा जखम झाल्याने रुग्णास अंधुक दिसू लागते ह्यासाठी नेत्रदान केलेल्या डोळ्यातून ''CORNEA TRANSPLANT'' करून,डॉक्टर दृष्टीहीनास नवीन दृष्टी देतात.आपल्या दोन डोळ्यांचे नेत्रदान हे दोन वेगवेगळ्या CORNEALLAY अंध व्यक्तीस दृष्टी देण्यास कारणीभूत ठरत असल्याने,आपल्या मृतू नंतर दोन अंध व्यक्ती जग पाहू शकतात,हे भाग्याचे आहे !!!

'' नेत्रदान कोण करू शकतो ?'':-

१)डोळ्याचे OPEARATION झालेल्या व्यक्ती.
२)आपणास कमी दिसत असेल तरी.
३)आपण चष्मा वापरत असाल तरीही.
४)डीएबेतिक (मधुमेह )रुग्ण असाल तरीही,
५) हायपर तेण्सेन (HYPER TENSION)चे रुग्ण असाल तरीही,
६)नेत्रदानाला वयोमर्यादा नाही.आपण कितीही वर्ष VAYACHE असाल तरीही नेत्रदान करू शकता !!!

''नेत्रदानाची वस्तुस्थिती'':-

१)नेत्रदान हे मरणोत्तर करता येते.
२) मृतू नंतर 4 ते 6 तासात नेत्रदात्याचे डोळे काढले गेले पाहिजेत.
३) फक्त रजीस्तर्द डॉक्टरच नेत्रदात्याचे नेत्र मृतू पश्च्यात काढतील.
४) नेत्रपेढीची टीम नेत्रादात्याचे डोळे घरी येऊन अथवा हॉस्पिटल मध्ये काढून घेऊ शकतील.
५) नेत्रदात्याचे डोळे ( नेत्र ) काढण्याच्या प्रक्रियेला फक्त 20 ते 30 मिनिटाचा अवधी लागत असल्याने,अन्त्य संस्कारासाठी तेवढाच उशीर होऊ शकेल.
६) संसर्गजन्य रोग आहेत कि नाही हे तपासण्यासाठी नेत्रदात्याच्या शरीरातून थोडे रक्त घेतले जाते.
७) डोळे काढल्याने मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप होत नाही .
८) सर्व धर्म तसेच धर्मग्रंथ नेत्रदानाची शिफारश करतात .
९)नेत्रदात्याची तसेच नेत्र प्राप्ती रुग्णाची ओळख गुप्त ठेवण्यात येते.

'' नेत्रदात्याच्या नातेवायीकाना सूचना!!'':-
१) मृतू नंतर नेत्रदात्याच्या डोळ्याच्या पापण्या बंद कराव्यात.
२)पंखे बंद करावेत.
३)मृत व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेऊन,डोक्याचा भाग उंच करावा.
४)जवळच्या नेत्रपेढीस अथवा 1919 ला फोन करावा.
५)नेत्रपेढीच्या टीमला ताबडतोब पोचण्या-साठी घराचा पत्ता,ल्यांडमार्क व फोन नंबर व्यवस्थित द्यावा.
६)डॉक्टर कडील मिळालेला मृतूचा दाखला तयार ठेवावा.
७)नेत्रदात्याचे नेत्रदान हे त्याच्या मृतू पाश्च्यात त्याच्या जवळच्या नातेवायीकांच्या तसेच दोन साक्षीदारांच्या साहिनेच करता येत असल्याने,त्या साठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.

नेत्रदान करावयाची इच्छा असल्यास?

नेत्रपेढीत संपर्क साधून नेत्रदानाचा अर्ज भरावा.

आपल्या कुटुंबियांना आपल्या मरणोत्तर नेत्रदानाच्या इच्छेबद्दल सांगून ठेवावे.

"मरावे परि नेत्ररूपी उरावे '' ....सर्व मानवांना ....माझ्या मित्र-मैत्रिणींना विनम्र आवाहन'' नेत्रदान करा व अंध बांधवांना

दृष्टीदान करा'' !!!!

लेखं  - धनंजय धोपावकर