Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

बोधकथा !!

एका गावात कॉलर्याची साथ पसरली होती.सारे लोक हैराण झाले. पण वैद्यकीय इलाज करण्याऐवजी,पाणी उकळून पिण्याऐवजी सारे लोक एका भोंदूबाबाच्या नदी लागले. त्याने सांगितले कि,''देवीचा कोप झाला आहे,बळी द्या.सारं संकट दूर होईल.''

त्यानुसार लोकांनी एक बोकड जिवंत पुरून देवीला बळी द्यावा असे ठरले. देवीच्या मंदिरासमोर खोल खड्डा खणण्यात आला.तिकडून बोकडाची मिरवणूक आली.

खड्ड्याजवळ येउन पाहतात,तर त्या खड्ड्यात उभे राहून गाडगेबाबा,''गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला''असे भजन करीत आहेत.

लोक म्हणाले,''बाहेर या.बोकडाचा बळी द्यायचा आहे.'' गाडगेबाबा म्हणाले,''बोकडाचा बळी देउन कॉलरा जाणार असेल,तर त्याच्याऐवजी मलाच पुरा. नरबळी दिल्याने देवी आणखी संतुष्ट होईल.कायमचा कॉलरा जाईल.'

हे ऐकून लोक खजील झाले.त्यांना आपली चूक उमगली.

तात्पर्य :- आचार हेच प्रचाराचे सर्वोत्तम साधन आहे.