Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भाग १ ला 17

६३. त्या काळी भगवंताचें शरीर रोगातुर झालें होतें. जीवकाला हें समजले तेव्हां त्यानें विरेजचन देऊन भगवंताला साफ बरें केलं; व प्रद्योताने पाठविलेले वस्त्रांची जोडी घेऊन ती भगवंताला अर्पण केली. ह्या काळपर्यंत भिक्षू चिंधी गोळा करून चीवरें करीत असत. परंतु ह्या प्रसंगीं जीवकाच्या विनंतीवरून भगवंतानें भिक्षुसंघाला गृहस्थानें दिलेलें वस्त्र घेऊन चीवर करण्यास परवानगी दिली; व पुढें क्षौम, कार्पास, कौशेय, कंबल, शाण व भंग ह्या जातीचीं व घेऊनहि त्यांची चीवरें करण्यास परवानगी दिली. भिक्षूंचीं चीवरें मलीन होत असत. तेव्हां ती रंगविण्यासाठी मूळ, सोट, साल, पानें, फुलें व फळें ह्यांजपासून रंग तयार करण्यास बुध्दानें परवानगी दिली; आणि ते पदार्थ शिजविण्यास () व चीवर रंगविण्यास  लांकडाची द्रोणी ठेवण्यास परवानगी दिली. सबंध () मिळालें तरी तें कापून व पुन्हां एकत्र जोडून चीवर केलें पाहिजे; भिक्षूनें असले वस्त्र वापरतां कामा नये, असाहि बुद्धानें नियम केला.

६४. भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या वेळीं विशाखा मिगारमाता ह्या प्रसिद्ध उपासिकेनें आपल्या घरी बुद्ध व भिक्षुसंघाला आमंत्रण केलें. दुसर्‍या दिवशीं जेवण्याच्या वेळीं भिक्षुसंघ () आहे कीं काय हें पाहण्यासाठीं आपल्या दासीला तिनें विहारांत पाठविलें. त्यावेळी भयंकर जोराची पावसाची सर आली होती; व भिक्षु चीवरें विहारांत ठेवून पर्जन्यस्नानासाठीं आवारांत उभे होते. त्यांना पाहून दासी परत आली, व विशाखेला म्हणाली, “आर्ये, विहारांत भिक्षु नसून सर्व आजीवक१ आहेत. पण त्या शहाण्या उपासिकेनें भिक्षु पर्जन्यस्नान करीत आहेत हें तेव्हांच ताडलें. बुद्ध भगवान् भिक्षुसंघासह आपल्या घरीं आल्यावर सर्वांचा योग्य आदरसत्कार करून तिनें त्यांना जेऊं घातलें. सर्वांचें जेवण झाल्यावर ती भगवंताला म्हणाली, “मी आपणांपाशीं आठ वर मागतें.” भगवान् म्हणाला, “तथागत कोणाला वर देत नसतात.” विशाखा म्हणाली, “पण भदंत, मी जे वर मागणार आहें ते योग्य असून अनवद्य आहेत.” बुद्धानें तिला बोलण्यास सांगितलें. तेव्हां ती म्हणाली, “(१) मी यावज्जीव संघाला वर्षाकाळांत लागणार्‍या पंचांचा पुरवठा करूं इच्छितें. (२) आगंतुक भिक्षूला भिक्षा देऊं इच्छतें. (३) प्रवासास जाणार्‍या भिक्षूला भिक्षा देऊं इच्छितें. (४) रोगी भिक्षूला भिक्षा देऊं इच्छितें. (५) रोग्यांच्या उपस्थायकाला२ भिक्षा देऊं इच्छितें. (६) रोग्यांना औषधाचा पुरवठा करूं इच्छितें. (७) संघाला रोज यवागू देऊं इच्छितें. (८) भिक्षुणीसंघाला स्नानाच्या वेळी वापरण्यासाठीं वस्त्रें देऊं इच्छितें.” बुद्ध म्हणाला, “विशाखे, हे वर मागण्याचीं कारणें कोणतीं?” विशाखा म्हणाली, “(१) आज भिक्षु तयार आहेत कीं नाहींत हे पाहण्यासाठीं मी दासीला पाठविंले. ती, आरामांत भिक्षु नसून आजीवक आहेत, असे समजून परत आली. भदंत, नागवेपणा शिष्टाचाराला अनुसरून नाहीं, म्हणून संघाला मी वर्षाकाळांत नेसण्यासाठीं पंचांचा पुरवठा करूं इच्छितें. (२)आगंतुक भिक्षूला शहरांतील रस्त्यांची माहिती नसते व भिक्षाटनाचा त्याला त्रास पडतो. ह्या कारणास्तव मी यावज्जीव आगंतुकाला भिक्षा देऊं इच्छितें. (३) प्रवासास जाणारा भिक्षु भिक्षाटनाला गेला तर बरोबरीच्या मंडळीपासून मागें रहातो. त्यामुळें त्याला त्रास होतो; म्हणून अशा भिक्षूला मी यावज्जीव भिक्षा देऊं इच्छितें. (४) आजारी भिक्षूला जर पथ्यकारक अन्न मिळालें नाहीं तर त्याचा आजार वाढतो, किंवा तो मरतो. म्हणून अशा भिक्षूला आजार बरा होईपर्यंत मी अन्न देऊं इच्छितें. (५) आजारी भिक्षूचा जो उस्थायक असतो त्याला जर भिक्षाटन करावें लागलें तर त्याच्याकडून आजार्‍याचें उपस्थान नीट होत नाहीं. म्हणून तो जोपर्यंत आजार्‍याचा उपस्थायक असेल तोंपर्यंत त्याला मी भिक्षा देऊं इच्छितें. (६) जर आजारी भिक्षूला योग्य औषध मिळालें नाहीं, तर त्याचा रोग वाढतो व तो मरतो. म्हणून अशा भिक्षूला मी औषधांचा पुरवठा करूं इच्छितें. (७) अंधकविंद येथे ब्राह्मणाने यवागू दिल्यावर आपण त्याची स्तुती केली होती. म्हणून भिक्षुसंघाला रोज यवागू देऊं इच्छितें. (८) एकदां अचिरवती नदींत भिक्षुणी बायकांच्या न्हावयाच्या जागीं नग्नस्नान करीत होत्या, तेथेंच स्नानास आलेल्या वेश्या त्यांची थट्टा करूं लागल्या. स्त्रियांचे नग्नत्व शिष्टाचाराला धरून नाहीं. या कारणास्तव मी भिक्षुणीला स्नानाच्या वेळीं वापरण्यासाठीं वस्त्रें देऊं इच्छितें.” भगवंतानें विशाखेच्या ह्या आठ मागण्या मान्य केल्या, व त्याप्रमाणें भिक्षुसंघाला व भिक्षुणीसंघाला परवानगी दिली.१(१- ह्या प्रकरणांत ह्या मागण्यांपैकीं पहिल्या मागणीचा तेवढा संबंध येतो. परंतु त्या जशा मूळग्रंथांत आहेत तशाच येथें दिल्या आहेत.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१-आजीवपंथाचे श्रमण नग्न राहत असत.
२- शुश्रूषकाला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी
Chapters
बौद्धसंघाचा परिचय 1
बौद्धसंघाचा परिचय 2
बौद्धसंघाचा परिचय 3
भाग १ ला 1
भाग १ ला 2
भाग १ ला 3
भाग १ ला 4
भाग १ ला 5
भाग १ ला 6
भाग १ ला 7
भाग १ ला 8
भाग १ ला 9
भाग १ ला 10
भाग १ ला 11
भाग १ ला 12
भाग १ ला 13
भाग १ ला 14
भाग १ ला 15
भाग १ ला 16
भाग १ ला 17
भाग १ ला 18
भाग १ ला 19
भाग १ ला 20
भाग १ ला 21
भाग १ ला 22
भाग १ ला 23
भाग १ ला 24
भाग १ ला 25
भाग १ ला 26
भाग २ रा 1
भाग २ रा 2
भाग २ रा 3
भाग २ रा 4
भाग २ रा 5
भाग २ रा 6
भाग २ रा 7
भाग २ रा 8
भाग २ रा 9
भाग २ रा 10
भाग २ रा 11
भाग २ रा 12
भाग २ रा 13
भाग २ रा 14
भाग २ रा 15
भाग २ रा 16
भाग २ रा 17
भाग २ रा 18
भाग २ रा 19
भाग २ रा 20
भाग २ रा 21
भाग २ रा 22
भाग २ रा 23
भाग २ रा 24
भाग २ रा 25
भाग २ रा 26
भाग २ रा 27
भाग २ रा 28
भाग २ रा 29
भाग २ रा 30
भाग २ रा 31
भाग २ रा 32
भाग २ रा 33
भाग २ रा 34
भाग २ रा 35
भाग २ रा 36
भाग २ रा 37
भाग २ रा 38
भाग २ रा 39
भाग २ रा 40
भाग २ रा 41
भाग २ रा 42
भाग २ रा 43
भाग २ रा 44
भाग २ रा 45
भाग २ रा 46
भाग २ रा 47
भाग ३ रा 1
भाग ३ रा 2
भाग ३ रा 3
भाग ३ रा 4
भाग ३ रा 5
भाग ३ रा 6
भाग ३ रा 7
भाग ३ रा 8
भाग ३ रा 9
भाग ३ रा 10
भाग ३ रा 11
भाग ३ रा 12
भाग ३ रा 13
भाग ३ रा 14
भाग ३ रा 15
भाग ३ रा 16
भाग ३ रा 17
भाग ३ रा 18
भाग ३ रा 19
भाग ३ रा 20
भाग ३ रा 21
भाग ३ रा 22
भाग ३ रा 23
भाग ३ रा 24
भाग ३ रा 25
भाग ३ रा 26
भाग ३ रा 27
भाग ३ रा 28
भाग ३ रा 29
भाग ३ रा 30
भाग ३ रा 31
भाग ३ रा 32
भाग ३ रा 33
भाग ३ रा 34
भाग ३ रा 35
भाग ३ रा 36
भाग ३ रा 37
भाग ३ रा 38
भाग ३ रा 39
भाग ३ रा 40
भाग ३ रा 41
भाग ३ रा 42
भाग ३ रा 43
भाग ३ रा 44
भाग ३ रा 45
भाग ३ रा 46
भाग ३ रा 47
भाग ३ रा 48
भाग ३ रा 49
भाग ३ रा 50
भाग ३ रा 51
भाग ३ रा 52
भाग ३ रा 53
भाग ३ रा 54
भाग ३ रा 55
भाग ३ रा 56
भाग ३ रा 57
भाग ३ रा 58
भाग ३ रा 59
भाग ३ रा 60
भाग ३ रा 61
भाग ३ रा 62
भाग ३ रा 63
भाग ३ रा 64
भाग ३ रा 65
भाग ३ रा 66
भाग ३ रा 67
भाग ३ रा 68
भाग ३ रा 69
भाग ३ रा 70
भाग ३ रा 71
भाग ३ रा 72
भाग ३ रा 73
भाग ३ रा 74
भाग ३ रा 75
भाग ३ रा 76
भाग ३ रा 77
भाग ३ रा 78
भाग ३ रा 79
भाग ३ रा 80