Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भाग २ रा 2

एकदां वज्जिदेशांत दुष्काळ पडला होता. त्या वेळी सुदिन्न आपल्या गांवीं परत आला. तेथें आपल्या घरीं एक दासी शिळें अन्न बाहेर टाकीत असतां पाहून तो तिला म्हणाला, “जर तें बाहेर टाकावयाचें असेल तर ह्या माझ्या पात्रांतच टाक.” त्या दासीनें त्याला ओळखून त्याच्या आईला हें वर्तमान सांगितलें. इकडे सुदिन्न एका भिंतीआड बसून तें शिळें अन्न खात होता. तें त्याच्या बापानें पाहिलें, व घरीं न जातां हें शिळें अन्न कां खातोस, असे विचारलें. सुदिन्नानें त्याच्या घरीच हें अन्न मिळालें असें सांगितलें. तेव्हां बाप त्याला हातीं धरून घरीं घेऊन गेला, व आणखी जेवावयास आग्रह करूं लागला. परंतु जेवण झालें असल्याकराणानें सुदिन्ननें पुन्हा जेवण्याचें नाकारलें. तेव्हां बापानें त्याला दुसर्‍या दिवशी जेवावयास बोलाविलें.

दुसर्‍या दिवशीं तो घरीं गेला. तेथें त्याच्या आईबापांनीं द्रव्याच्या दोन मोठ्या राशी केल्या होत्या, व त्याच्या बायकोला नटवून सजवून तयार केलें होतें. सुदिन्न तेथें पोहोंचल्यावर त्या राशी उघड्या करून बाप त्याला म्हणाला, “हें सर्व तुझ्या पूर्वजांचे द्रव्य आहे. त्याचा उपभोग घेऊन तूं येथें सुखानें रहा.” सुदिन्न म्हणाला, “तुम्हाला वाईट वाटत नसेल तर एक गोष्ट सांगतो.” “सांग काय तें,” असें पित्यानें उत्तर दिलें. सुदिन्न म्हणाला, “मोठमोठे गोण तयार करून त्यांत हें द्रव्य भरा, व गंगेच्या मध्यभागीं तें नेऊन पाण्यांत टाका. कां कीं, ह्या द्रव्यापासून तुम्हांला जें भय व जो रक्षण करण्याचा त्रास पडत आहे, तें भय व तो त्रास पडणार नाहीं.” त्याच्या बापाला अर्थातच हें बोलणें आवडलें नाहीं. त्यानें आपल्या सुनेकडूनहि सुदिन्नाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तेव्हां सुदिन्न म्हणाला, “मला जर जेवावयास घालावयाचें असेल तर घाला. हा उगाच त्रास कशाला देतां?” त्याला चांगलें जेऊं घातल्यानंतर आई म्हणाली, “बाळ सुदिन्न हें आमचें घराणें फार मोठें आहे. आमच्या कुळांत पुष्कळ धनद्रव्य आहे. तेव्हां निदान आम्हांस एक बीजक (कूळ चालविणारा मुलगा) तरी दे. जर आमच्या कुळांत मुलगा नसला तर सर्व संपत्ति लिच्छावी राजे घेऊन जातील.” सुदिन्नला ही गोष्ट पसंत पडली; व त्यानें त्रिवार स्त्रीसंग केला. त्यायोगें त्याच्या बायकोला मुलगा झाला. त्याचें नांव बीजक असेंच ठेवण्यांत आलें; व सुदिन्नला बीजकपिता असें म्हणूं लागले. त्यामुळें सुदिन्नला फार मनस्ताप झाला. ही गोष्ट भिक्षूंना समजली, तेव्हां त्यांनीं त्याची फार निंदा केली. बुद्ध भगवंताला ही गोष्ट समजली, तेव्हां त्यानेंहि त्याची निंदा केली, व भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:- “जो भिक्षु मैथुन करील तो पारजिक समजावा. तो भिक्षुसहवासाला योग्य नाहीं.” हा नियम केल्यानंतर एका भिक्षूनें एका मर्कटीशीं संग केला त्यावरून त्या नियमांत आणखी भर घालावी लागली. शेवटीं पूर्ण नियम करण्यांत आला तो असा:-

जो भिक्षु भिक्षूंचे नियम न सोडतां व आपलें दौर्बल्य आगाऊ कबूल न करतां मनुष्याशीं किंवा पशूशी मैथुन-व्यवहार करील तो पाराजिक व सहवासाल अयोग्य जाणावा ।।१।।

२.बुद्ध भगवान् राजगृह येथें गृध्रकूट पर्वतावर राहात होता. त्या काळी कांहीं प्रसिद्ध भिक्षु इसिगिली पर्वताच्या पायथ्याशीं गवताच्या झोंपड्यांत वर्षाकाळासाठीं राहिले. धनिय कुंभकारपुत्रहि एक गवताची झोंपडी बांधून तींत वर्षाकाळासाठीं राहिले. वर्षाकाळ संपल्यावर गवताच्या झोंपड्या मोडून गवत व लाकडें जागच्याजागीं ठेवून ते भिक्षु प्रवासाला गेले. पण धनिय वर्षभर तेथेंच राहिला. तो जेव्हां गांवांत भिक्षेसाठीं जात असे तेव्हां लांकडें नेणार्‍या बायका त्याची झोंपडी मोडून लांकडे व गवत घेऊन जात असत. धनिय पुन्हां आपली झोंपडी बांधी व त्या बायका पुन्हां ती मोडून नेत असत. असा प्रकार तीनदां घडला. धनियाला कुंभाराचें काम येतच असे. तेव्हां लांकडाच्या झोपडीला कंटाळून त्यानें मातीची झोंपडी बनविली, व लाकडें आणि गवत भरून ती भाजून तयार केली. ती कुटिका फारच सुंदर झाली. इंद्रधनुष्यासारखा तिचा रंग होता; व किंकिणी-शब्दासारखा तिच्यांतून शब्द निघत असे. भगवंताला ही गोष्ट समजली तेव्हां, भिक्षूला अशा रितींने सर्व मृत्तिकामय झोंपडी बनविणें योग्य नाही. असें म्हणून त्यानें भिक्षूंकडून ती मोडविली. त्यानंतर धनियाच्या मनांत असा विचार आला की, आतां आपण सरकारी वखारींतील अधिकारी मित्राकडे जाऊन लांकडें मागून घ्यावीं, व लांकडांची कुटिका करावी. त्याप्रमाणें त्या अधिकार्‍याकडे जाऊन त्याला सर्व वृत्त निवेदन करून त्यानें लांकडें मागितली; पण तो अधिकारी म्हणाला, “हीं सरकारी लांकडें तशाच जरूरीच्या प्रसंगीं उपयोगासाठीं ठेवलेलीं आहेत. जर राजाकडून देवविण्यांत येतील तर खुशाल घेऊन चला.” धनिय म्हाणाला,  “राजानें तीं दिलींच आहेत.” त्या अधिकार्‍यानें असा विचार केला कीं हे शाक्यपुत्रीय श्रमण धर्मचारी, समचारी, ब्रह्मचारी, सत्यवादी, शीलवंत आणि कल्याणधर्म आहेत; आणि राजाचीहि ह्यांच्यावर मर्जी आहे. तेव्हां राजानें न देता दिलेलीं आहेत असें हा म्हणणार नाहीं. तो धनियाल म्हणाला, “असे असेल तर घेऊन जा.” धनियानें त्या लांकडांचे कुटीला लागणारे तुकडे कापून तयार करवून त्यांची कुटिका बनविली.

मगधमहामात्र वस्सकार ब्राह्मण राजगृहांतील निरनिराळ्या कामाची देखरेख पहाण्यासाठीं फिरत असतां सरकारी वकारींत आला. तेथील सरकारी लांकडे राजाकडून धनियाला देण्यांत आलीं हे वर्तमान त्याला समजलें; आणि राजानें असें भलतेंच आचरण केल्याबद्दल त्याला वाईट वाटलें. बिंबिसार राजाजवळ जाऊन ह्या गोष्टीची त्यानें चौकशी केली. राजानें वखारीवरील अधिकार्‍याला बांधून आणण्याचा हुकूम फर्माविला. त्याला बांधून नेत असतां वाटेंत धनिय भेटला; आणि म्हणाला, “तुला बांधून नेत आहेत तें का?” ‘भदंत, त्या लांकडांसाठीं मला बांधून नेत आहेत” असें उत्तर दिलें., धनिय म्हणला, “तूं पुढें हो; मीहि तुझ्या मगोमाग येतों.” अधिकारी म्हणाला, “राजानें मला ठार करण्यापूर्वी या म्हणजे झालें!”

बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी
Chapters
बौद्धसंघाचा परिचय 1
बौद्धसंघाचा परिचय 2
बौद्धसंघाचा परिचय 3
भाग १ ला 1
भाग १ ला 2
भाग १ ला 3
भाग १ ला 4
भाग १ ला 5
भाग १ ला 6
भाग १ ला 7
भाग १ ला 8
भाग १ ला 9
भाग १ ला 10
भाग १ ला 11
भाग १ ला 12
भाग १ ला 13
भाग १ ला 14
भाग १ ला 15
भाग १ ला 16
भाग १ ला 17
भाग १ ला 18
भाग १ ला 19
भाग १ ला 20
भाग १ ला 21
भाग १ ला 22
भाग १ ला 23
भाग १ ला 24
भाग १ ला 25
भाग १ ला 26
भाग २ रा 1
भाग २ रा 2
भाग २ रा 3
भाग २ रा 4
भाग २ रा 5
भाग २ रा 6
भाग २ रा 7
भाग २ रा 8
भाग २ रा 9
भाग २ रा 10
भाग २ रा 11
भाग २ रा 12
भाग २ रा 13
भाग २ रा 14
भाग २ रा 15
भाग २ रा 16
भाग २ रा 17
भाग २ रा 18
भाग २ रा 19
भाग २ रा 20
भाग २ रा 21
भाग २ रा 22
भाग २ रा 23
भाग २ रा 24
भाग २ रा 25
भाग २ रा 26
भाग २ रा 27
भाग २ रा 28
भाग २ रा 29
भाग २ रा 30
भाग २ रा 31
भाग २ रा 32
भाग २ रा 33
भाग २ रा 34
भाग २ रा 35
भाग २ रा 36
भाग २ रा 37
भाग २ रा 38
भाग २ रा 39
भाग २ रा 40
भाग २ रा 41
भाग २ रा 42
भाग २ रा 43
भाग २ रा 44
भाग २ रा 45
भाग २ रा 46
भाग २ रा 47
भाग ३ रा 1
भाग ३ रा 2
भाग ३ रा 3
भाग ३ रा 4
भाग ३ रा 5
भाग ३ रा 6
भाग ३ रा 7
भाग ३ रा 8
भाग ३ रा 9
भाग ३ रा 10
भाग ३ रा 11
भाग ३ रा 12
भाग ३ रा 13
भाग ३ रा 14
भाग ३ रा 15
भाग ३ रा 16
भाग ३ रा 17
भाग ३ रा 18
भाग ३ रा 19
भाग ३ रा 20
भाग ३ रा 21
भाग ३ रा 22
भाग ३ रा 23
भाग ३ रा 24
भाग ३ रा 25
भाग ३ रा 26
भाग ३ रा 27
भाग ३ रा 28
भाग ३ रा 29
भाग ३ रा 30
भाग ३ रा 31
भाग ३ रा 32
भाग ३ रा 33
भाग ३ रा 34
भाग ३ रा 35
भाग ३ रा 36
भाग ३ रा 37
भाग ३ रा 38
भाग ३ रा 39
भाग ३ रा 40
भाग ३ रा 41
भाग ३ रा 42
भाग ३ रा 43
भाग ३ रा 44
भाग ३ रा 45
भाग ३ रा 46
भाग ३ रा 47
भाग ३ रा 48
भाग ३ रा 49
भाग ३ रा 50
भाग ३ रा 51
भाग ३ रा 52
भाग ३ रा 53
भाग ३ रा 54
भाग ३ रा 55
भाग ३ रा 56
भाग ३ रा 57
भाग ३ रा 58
भाग ३ रा 59
भाग ३ रा 60
भाग ३ रा 61
भाग ३ रा 62
भाग ३ रा 63
भाग ३ रा 64
भाग ३ रा 65
भाग ३ रा 66
भाग ३ रा 67
भाग ३ रा 68
भाग ३ रा 69
भाग ३ रा 70
भाग ३ रा 71
भाग ३ रा 72
भाग ३ रा 73
भाग ३ रा 74
भाग ३ रा 75
भाग ३ रा 76
भाग ३ रा 77
भाग ३ रा 78
भाग ३ रा 79
भाग ३ रा 80