Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

महाराष्ट्रातील भूतें

 

१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो.

२ ब्रम्हग्रह : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.

३समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही.

४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.

५ मुंजा: हे ब्रम्हणां पैकी भूत असते.जो ब्राम्हण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.

६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.

७ गिव्हा : जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.

८ चेटकीन : हे कुणबी किंव्हा मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.

१० विर : हे भूत क्षञाय जातीच्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.

१७ : वायंगी भूत

कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोकणातील हे वायंगी भूत फार प्रचलित आहे. हा प्रकार केवळ कोकणातच पहावयास मिळतो.घराच्या भरभराटी साठी या भूताचा वापर करतात.कोकणात हमखास बहुतेकांच्या घरात हा भूतांचा प्रकार बघायला मिळतो.

प्रथम या भूता बद्दल जाणून घेऊ. वायंगी भूत हे मोरा एवढे मोठे व कोबंड्या पेक्षा लहाण अशा पक्षाच्या आकाराचे असते.ही भूते भारण्यासाठी नारळ किंव्हा नदीच्या पञात मिळणारे काटेरी वांगे जे आकाराने लहाण असते आशा वस्तूत भारले जाते व जातकाला दीले जाते.

एखाद्या चाडी प्रमाणे हे भूत काम करते.ते जातकाच्या कानात गुणगूणत असते. हे भूत मुदतीच्या स्वरूपात दिले जाते. ज्या माणसाला जितके वर्ष पाहीजे असते. तितक्या वर्षासाठी हे भूत विकत मिळते.व जितके वर्ष हे त्या माणसाच्या घरात रहाते तितके वर्ष हे त्या माणसाला धन संप्पती प्रदान करते. त्याला भरभराट देते.

हे भूत मुख्यत: गरीबाला श्रीमंत व श्रीमंताला गरीब बनवण्याचे काम करते.

पण याचे काही दूश् परीमाम ही आहेत. हे भूत जितक्या वर्षासाठी आहे तितक्या वर्षासाठी भरभराट देते. व एकदा या भूताची मुदत संपली की ते माणसाला मुळा सकट घेऊन जाते. त्याला जितके त्याने प्रदान केले आहे त्याच्या कितीतरी पट जास्त घेऊन जाते.त्या मानसाचा सर्वनाश करते.व त्याला अचानक काळाच्या पडद्याआड करते.

एवढेच नव्हे तर त्याच्या वारसांना,नाते वाईकांना देखिल ञास देण्यास सुरूवात करते.कधीकधी ते शेजा-यांना देखिल बाधते.अक्षरक्ष: माणसाला नरक यातना भोगावयला भाग पाडते हे भूत.

ज्यानां आपल्या भावी पिढीची व वंशाची किंमत नसेल त्यांनीच हे भूत आणायच्या भानगडीत पडावे.

लक्ष्मी ही चंचल असते ती केंव्हाही योग्य मार्गाने प्रसन्न करून घ्यावी...........