Get it on Google Play
Download on the App Store

Petrichor

Petrichor

Petrichor काय आहे? जसं दीर्घकाळ असलेल्या उष्ण आणि कोरड्या वातावरणानंतर पहिल्या पावसाचा आलेला मृद्गंध. हा एक सोपा शब्द देखील खूप खोलवर अर्थ सांगून जातो. आणि, तरीही Petrichor आमच्याकडे असा एक शब्द आहे, जो गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करताना नेहमी आणि नेहमीच व्यर्थ ठरलेला आहे.

हा शब्द मी आता का आठवू? उन्हाळा सुरु आहे, अतिशय उष्ण आणि मी लवकरात लवकर पाऊस पडावा या आशेवर आहे. जर मी कवी असतो तर मी त्या तहानलेल्या पृथ्वीवर आणि बऱ्याच गोष्टींवर आभासी कविता केल्या असत्या. पण मी कवी नाही, तर रस्त्याच्या कडेला असलेला ठक आहे, किमान मी होतो.

हनीफने एकदा मला सांगितलं होतं, “तुम्ही माणसाला ठगांमधून बाहेर काढू शकता, पण माणसांमधून ठगी बाहेर काढता येणार नाही.” “म्हणजे, याचा अर्थ काय आहे?” मी त्याला विचारलं आणि आम्ही दोघे हसू लागलो.

ही आमची गोष्ट होती. आमची अशीच वायफळ बडबड चालू असायची. आम्ही शूर असल्यासारख्या वायफळ बतावण्या करत असायचो आणि दिवसाच्या शेवटी त्या सर्व गोष्टींवर खूप हसायचो. तरुण असण्याचा जेवढा गैरफायदा आम्ही घेतला तेवढा कुणीही घेतला नसेल. दरोडा, तस्करी, खंडणी हे समाजासाठी गुन्हे होते तर आमच्यासाठी एक प्रकारचा थरार. जर तुम्ही लालजीच्या तोंडात बंदूक ठेवून त्याचे पैसे चोरू शकत असाल तर तुम्हाला ८ तास काम करायची गरजच काय? हे जग आम्हाला कधी समजलेच नाही आणि आम्ही कोणत्या जगाचा एक भाग बनलो आहोत हे देखील आम्हाला कधी जाणवलेच नाही. आम्हाला वाटायचं आम्ही संपूर्ण जगापेक्षा काही वेगळंच करत आहोत.

आता जेव्हा मी उतारवयाकडे आलो आहे, कदाचित आता मला कुठे जगण्याचा मार्ग समजत असावा. आज मी त्या सामान्य स्त्री-पुरुषांची जगण्यासाठीची धडपड, त्यांचा संघर्ष समजू शकतो जे आता या जगात नाही आहेत. मी ज्या हॉटेलमध्ये बसलोय त्या हॉटेलमधील गिऱ्हाईकांना जेवण वाढणारी ती स्त्री फक्त वेटरच नाही तर ती कुणाची तरी आई आहे, कुणाची पत्नी आहे. तिला एखादं मुल असावं ज्याच्यावर ती तिच्या पतीपेक्षा जास्त प्रेम करत असेल. तिला संध्याकाळच्या वेळी टीव्हीवर मालिका पाहायला आवडत असेल आणि कामावर असताना विश्रांतीच्या वेळी आपल्या मैत्रीणींबरोबर गप्पा मारायला तिला आवडत असेल.

आम्हाला असे जीवन मिळाले नाही कारण आम्ही झोपडपट्टीमध्ये जन्मलो आणि वाढलो. आमचे वडील अस्तित्वात नव्हते, आणि टेबलावरची फळे उचलत असताना आईच प्रेम कधीही दिसलं नाही. तेव्हा आमच्याकडे टीव्ही नव्हता, पण साधी पुस्तके देखील नव्हती. आमच्या जगण्याचा हेतू काय, आमचा जन्म कशासाठी झाला याचा आम्हा मुलांना जरादेखील अंदाज नव्हता.

हनीफने केले असू शकते. मला माहित आहे, तो खूप वेगळा होता. त्याला सिनेमा पहायला खूप आवडायचं. त्याला अमिताभ खूप आवडायचा आणि रात्री जेव्हा आम्ही पत्ते खेळत असायचो तेव्हा तो त्याच्या आवाजाची नक्कल करायचा.

असा मुर्खपणा तो करत असायचा, पण मला त्याच्या डोळ्यात वेगळंच काही दिसायचं. आम्ही सगळे मारामारीसाठी, परवीन बाबीच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीच्या मादक नृत्यासाठी सिनेमा पाहायचो. पण तो काहीतरी वेगळाच विचार घेऊन सिनेमाघरातून बाहेर पडायचा. कुणालाही समजत नसे की त्याने असं काय वेगळं पाहिलं असेल, पण त्याने काय वेगळं पाहिलंय ते इतरांपेक्षा मला चांगलं समजायचं.

जेव्हा आम्ही गुन्हेगारी विश्वात घुसलो, तेव्हा हनीफ जसं सांगायचा तसं आम्ही करायचो. प्रत्येक वेळी तो योजना आखत असे आणि मी त्या यशस्वी करण्यासाठी हव्या त्या गोष्टींचा पुरवठा करत असे. आमच्या टोळीतील सर्वजण त्याच्या सांगण्यानुसार स्वतःला झोकून देत. तिथे फक्त मीच एकटा असा होतो ज्याला त्याच्यावर शंका होती. जेव्हा बंदुकीच ट्रिगर दाबायची वेळ यायची नेमकं तेव्हाच त्याच्या मनात असं काहीतरी चालत असे ज्यामुळे त्याला बंदुकीच ट्रिगर दाबण्यात प्रतिबंध येत असे, या गोष्टीचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं. जेव्हा आम्ही दुकानांवर दरोडा टाकायचो तेव्हा तो दरोडा रक्त न सांडवता करता यावा अशी आशा आम्ही करायचो पण जेव्हा तुम्ही अशा गोष्टी भर चौकात करता तेव्हा तुम्ही बंदुकीच ट्रिगर दाबायला सक्षम असायलाच हवं.

एकदा त्याला एकांतात घेऊन माझा संपूर्ण धीर एकवटून मी त्याला विचारल की, खरंच तू कधी बंदुकीतून गोळी चालवू शकशील. तो माझ्याकडे अशा डोळ्यांनी पहायचा, जे मला सांगायचे की त्याला देखील याबाबत शंका आहे पण नंतर हो म्हणाला, "मी तुम्हाला कधीही संकटात पाडणार नाही."

स्त्रियांच्या बाबतीत आम्ही सगळे वेडे होतो. झोपडपट्ट्यांमध्ये देखील आमचे प्यायचे अड्डे होते आणि आम्ही वेश्यांसोबत संबंध ठेवून होतो. आमच्यापैकी जवळपास सर्वांनीच ममदु कारपेंटरच्या पतीसोबत एकदा तरी संभोग केला होता. पण हनीफ ने नाही. आम्ही सर्वजण संध्याकाळच्या वेळी उच्च आणि मध्यमवर्गीय मुलींची छेड काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर एकत्र जमायचो. त्यांपैकी एक हनीफची आवडती होती. तो कुणालाही तिच्यावर शिट्टी वाजवू देत नव्हता. आम्ही त्याच्या भावना समजू शकत होतो, एकतर त्याने ममदुच्या पत्नीच्या बाबतीत देखील आमच्यासोबत कधी स्पर्धा केली नव्हती.

ठकाच ते बेपर्वा आयुष्य असंच खर्च होत होतं. तुमच्याकडे पैसे असू शकतात आणि लोक तुम्हाला घाबरून असतील पण, तुम्ही बहिष्कृत असता. तुम्ही तुमच्या आयुष्याचा खूप मोठा काळ त्यात वाया घालवलेला असतो, तुम्ही समाजापासून खूप दूर गेलेले असता. शेवटी एकदा ती मुलगी रेल्वेस्थानकावर यायची बंद होते. आम्ही तपास लावल्यावर आम्हाला समजलं, पुढच्या शिक्षणासाठी ती दुसऱ्या शहरातील चांगल्या कॉलेजमध्ये जात असते. हनीफ अस्वस्थ असावा असा मला संशय आला होता. "मी तिच्याशी काय करायला हवं? लग्न?" त्याने मला विचारलं "तो कुणी दुसराच असेल." हनीफ म्हणाला.

आमचा तिच्याबद्दलच्या चर्चेचा शेवट कधीही झाला नाही. संपूर्ण प्रवासात आम्ही काही कारण नसताना तिच्याबद्दल बोलत होतो. आम्ही हळूच तिला तिच्या मैत्रिणींसोबत बोलताना पाहत होतो. पाणीपुरी खात असतानाचे तिचे भिरभिरणारे डोळे आमच्या निरखून पाहणाऱ्या नजरा पाहू शकले नाही. मध्येच कधी ती अस्वस्थ झाली की हनीफ सुद्धा अस्वस्थ व्हायचा. "हे प्रेम तर नाही ना?" मी विचारलं "बॉबी सिनेमातल्या ऋषी कपूरसारख वाटतंय का तुला?"

"मग आता मी तिला घेऊन नाचायला हवं का?" हनीफ मस्करीत म्हणाला.

पण त्या दिवशी ती आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेली, जसं बंदरावर बसलेला एक लहान मुलगा तिच्या नव्या जगाबद्दल विचार करत तिला पाहत असतो आणि त्याला जरासाही सुगावा लागू न देता किनाऱ्यावरची त्याची होडी नदीमध्ये दूरवर निघून गेलेली असते. हनीफ आता बदलला होता. कुठेतरी काहीतरी राहिल्यासारख वाटत होतं, त्याच्या जोडीदारीनची आकृती स्पष्ट होत नव्हती. मला भीती असायची की बंदुकीच ट्रिगर दाबायला त्याला संकोच वाटत असेल. पण त्या दिवसानंतर आणि नंतरच्या प्रत्येक दिवशी मला तसं कधीही वाटलं नाही. त्याने एकदा तर एना आणि पोलिस अधिकाऱ्याला त्याच्या बंदुकीच्या गोळीचा शिकार बनवलं होतं.

काही टप्प्याने आम्ही दुकानांवर दरोडा टाकत असत आणि पोलिसांपासून बचावासाठी लाच देत असायचो. गुन्हे जगतातील दिग्गज असलेले शामू अन्ना यांचं लक्ष आमच्यावर होणाऱ्या शोषणावर गेलं. जून महिन्याच्या त्या संध्याकाळी, आम्ही दोघे समुद्रकिनारी असलेल्या बाकावर बसून मावळणारा सुर्य आणि शांत होणारं शहर बघत होतो. अचानक आभाळ भरून आलं आणि आकाशातून पावसाच्या सरी बरसू लागल्या. "मला हा मृद्गंध खूप आवडतो." मी म्हणालो, "पहिल्या पावसाच्या वेळी हा मृद्गंध कसा येतो हे माझ्यासाठी कोडंच आहे." मी त्याला म्हणालो. स्मितहास्य करत तो म्हणाला, "पेट्रीचर, या सुगंधाला पेट्रीचर म्हणतात." तो म्हणत होता. "तुला कधीपासून कठीण इंग्रजी शब्द समजू लागले?" मी त्याला आश्चर्याने विचारलं. हनीफ कधीही खोटं बोलणाऱ्यांपैकी नव्हता. तो बोलत होता म्हणजे त्यात नक्की काही तथ्य असावं.

"तो इंग्रजी शब्द नाहीये." जराही कुतूहल न वाटून घेता वर आकाशाकडे बघत तो बोलत होता. "तो एक ग्रीक शब्द होता. ग्रीक कुठे आहे हे मला माहित नाही, पण अनेक देवदेवता असलेला तो एक खूप जुना देश आहे. पेट्रीचर म्हणजे देवतांचं रक्त. ग्रीक लोकांनी मातीच्या त्या वासावरून हा शब्द तयार केला." तो म्हणाला.

"पवित्र कटू." मला माहित नाही असं कोण म्हणालं होतं पण कोणीतरी सुशिक्षित असं म्हणालं होतं. हनीफ मला त्याहीपेक्षा मोठा होता.

पावसाचा जोर वाढण्याच्या आधीच आम्ही घराच्या दिशेने निघालो. आम्ही जेव्हा आमच्या झोपडपट्टीत पोहोचलो तेव्हा तिथे एक पोलिस दरवाजाजवळ आमची वाट बघत उभा होता. मी धावण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा हनीफने मला अडवलं, "एखाद्याला अटक करण्यासाठी पोलिस अशा पद्धतीने येत नाहीत. हे काहीतरी वेगळं आहे." एवढं बोलून तो तिथे उभा असलेल्या हवालदाराजवळ गेला.

हवालदाराजवळ आम्हाला शामूअन्ना दिसले. ते आमच्या दिशेने वळले आणि म्हणाले, "मेरेको पता नही था तुम लोगोंका घर, तो इसको साथ ले आया." एवढं बोलून त्यांनी सोबत आलेल्या हवालदाराच्या हातात ५०० रुपयांची नोट दिली. ते पैसे हातात घेऊन स्मितहास्य करून आभार मनात तो हवालदार तिथून निघून गेला.

शामूअन्ना सोबत त्यांची दोन माणसं होती. त्यांना आमच्या घराचा पत्ता माहित होता पण आपली पोहोच कुठपर्यंत आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी त्या पोलिसाला बरोबर आणले होते. त्याने आमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. त्याच्याशी हातमिळवणी करून तो जे करत असेल ते काम करायचं. "काम काय आहे?" मी विचारलं. "घरपे जाके बात करते है." एवढं बोलून त्याने आम्हाला त्याच्या गाडीमध्ये बसवलं. सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त असलेल्या त्याच्या बंगल्यात तो आम्हाला घेऊन गेला.

बाहेर पाऊस पडत होता. त्याच्या बंगल्यामधील मोठी जागा असलेल्या ऑफिसमध्ये तो त्याच्या योजनांबद्दल चर्चा करत होता. आम्ही सगळे खूप खुश होतो, कारण आमच्यासाठी ते खूप मोठं होतं आणि दरवाजातून आत एक मादक स्त्री आली. ती पाण्याचा ग्लास आणि हातात काही गोळ्या घेऊन आतमध्ये आली आणि आम्ही तिच्याकडे वेड्यासारखे पाहतच राहिलो कारण ती स्त्री काही वर्षांपूर्वी आमच्या नजरेआड झाली होती.

"तुला किती वेळा सांगितलं आहे, जेव्हा मी कामाबद्दल काही बोलत असेल तेव्हा तुझं हे घाणेरडं तोंड घेऊन येत जाऊ नकोस." शामूअन्ना तिच्यावर खेकसले. ती नम्रपणे त्यांना म्हणाली, "पण डॉक्टरने सांगितलं होतं..." "भाड्यात गेला तो डॉक्टर आणि वेश्ये कुठली, भाड्यात गेलीस तू. चालती हो." काही कारण नसताना शामूअन्ना तिच्यावर खूप तापले होते. मला हनीफ काय करतो याची भीती होती. पण तो शांत होता.

डोळ्यांतून अश्रू गाळत ती तिथून निघून गेली आणि आम्ही धंद्यावर आमची चर्चा सुरूच ठेवली. धंद्याबद्दल बोलत असताना ते आम्हाला मध्येच बिझनेसमन बोलत होते याची खरंतर आम्हाला गंमत वाटत होती. आम्ही एक संपूर्ण जागा सांभाळायची हे अन्ना आम्हाला समजावून सांगत होते. शेवटी त्यांनी विचारलं, "मग हा सौदा मी पक्का समजू?"

हनीफ शांतपणे त्याच्या जागेवरून उठला आणि आम्ही त्याच्या तोंडून होकाराची अपेक्षा ठेवलेली असताना तो शांतपणे म्हणाला, "नाही अण्णाजी, आम्ही आपल्याशी व्यवहार करण्याची अजिबात इच्छा नाही."

अन्नाला अगोदर आश्चर्य वाटले पण लगेचच त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्याचे सुरक्षारक्षक हळूहळू पुढे येऊ लागले होते.

हनीफ बाहेर निघण्यासाठी दरवाजाच्या दिशेने निघाला. आम्ही सगळे त्याच्या पाठोपाठ निघू लागलो हे पाहून अन्ना भडकले. "ह्या खोलीतून अन्नासोबत करार केल्याशिवाय कोणीही बाहेर निघू शकत नाही." त्याने त्याच्या कप्प्यातून एक बंदूक काढली आणि आमच्या दिशेने नेम धरला. त्याने ट्रिगर दाबलं पण त्याचा नेम चुकला. त्याच्या सुरक्षारक्षकांनी सुद्धा त्यांच्या बंदुका बाहेर काढल्या आणि आमच्या दिशेने त्यांनी गोळीबार सुरु केला.

चांगलाच गोंधळ झाला होता. शंकरच्या डोक्याला गोळी लागली होती तर माझ्या खांद्याला. हनीफने स्वतःला पलंगाखाली लपवलं होतं. मी अन्नाच्या दिशेने जोरात खुर्ची फेकली ज्याने ते जमिनीवर आदळले. त्याचे सुरक्षारक्षक त्याला उचलायला पुढे सरसावले असताना मी, हनीफ आणि जग्या दरवाजातून बाहेर धावलो. बाहेर आल्यावर एका जाड माणसाने आम्हाला अडवलं, पण त्या मंद माणसाने बंदूक बाहेर काढायला खूप वेळ लावला. तेवढ्यात जग्याने त्याची बंदूक हिसकावून घेतली आणि हनीफ त्याच्या डोक्यावर सतत मारत होता, ती बंदूक हातात घेत मी त्याला सुरक्षारक्षकाला गोळी मारली. आम्हाला त्याच्याकडे आणखी एक बंदूक सापडली. पण आता गेटजवळ असलेल्या त्याच्या इतर माणसांनी गोळी झाडण्याचा आवाज ऐकला आणि ते आमच्या दिशेने धावू लागले. मी आतल्या दरवाजाजवळ धावलो तर हनीफ आणि जग्या घरात कुठेतरी लपले होते. आत असलेले सुरक्षारक्षक अन्नासोबत दरवाजातून बाहेर पाळले होते म्हणून मला आतमध्ये काही धोका नव्हता. कुणीतरी मुख्य दरवाजा तोडला होता. मी आणि जग्याने गोळीबार सुरु केला होता. तीन माणसांना गोळी लागली तर पाठीमागे आणखी सुरक्षारक्षक तैनात होतेच.

"दुसऱ्या दरवाजातून बाहेर निसटा." हनीफ म्हणाला आणि जिने चढून वर असेलेल सर्व दरवाजे उघडून बाहेर जाण्यासाठी रस्ता शोधत होता. तिसरा दरवाजा उघडल्यावर आम्ही मोठ्या खोलीत थांबलो. ती स्त्री तिथेच होती, जेव्हा तिने आम्हाला आणि आमच्या हातात असलेल्या बंदुकी पहिला तेव्हा ती खूप घाबरली आणि आम्ही तिला जीवनदान द्यावं यासाठी भिक मागू लागली. "मी तुमच्या पाया पडते. कृपया मला मारू नका. तुम्हाला काय हवं असेल ते मी तुम्हाला देईल." ती रडू लागली.

हनिफ तिच्याकडे पाहत मंत्रमुग्ध झाला होता, अनवधानपणे त्याच्या हातातली बंदूक तिच्या दिशेने वळली. तिचा परीसारखा चेहरा आता निस्तेज, घामाने थबथबलेला झाला होता. तिचे विस्कटलेले केस तिच्या चेहर्यावर आले होते आणि तिचे कपडे चुरलेले होते. हनिफने तिच्यावर नेम धरलेल्या बंदूकीबद्दल तिच्या मनात दहशत निर्माण झाली होती, जे माझ्यासाठी अनपेक्षित होतं.

जग्याने मोठ्या गॅलरीमधून बाहेर उडी मारली, मी सुद्धा तेच करणार होतो. त्या मित्राची शेवटची आठवण म्हणजे त्याचं ते निरखुन बघणं म्हणजे बहुदा ते त्याच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम असावं. तिने असा समज करुन घेतला होता की तो तिला मारण्यासाठी सक्षम होता. मी गॅलरीमध्ये उभं राहून त्याला आवाज देण्याचा खुप प्रयत्न केला, पण तो सुन्न झाला होता. ती बंदूकधारी माणसं त्याच्या मागचा दरवाजा तोडून आत आले आणि मी गॅलरीमधून खाली उडी मारली. मला बंदूकीची गोळी चालवण्याचा आणि त्या मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आला जिचं नाव आम्हाला माहित नव्हतं.

मी बागेतील चिखलात पडलो. ती ओली माती माझ्या संपूर्ण शरीराला लागली होती आणि माझ्या शरीराला Petrichor गंध येत होता. मी तिथून कसाबसा निसटलो आणि वाचलो. परत मागे वळून हनीफ मृत्यूच्या जबड्यात का गेला हे मला जरादेखील समजले नाही. तो उडी मारु शकला असता. तो वाचला असता.

हे माझ्यासाठी न उलगडलेलं कोडंच आहे, आणि जेव्हा कधी पावसाच्या सरी जमिनीवर पडतात तेव्हा तेव्हा मला वेदना होतात. कदाचित हे माझ्यासारख्याच्या आकलनक्षमतेच्याही पलिकडचं असावं.