Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

इंग्लंडला प्रयाण 1

बेंजामिन पुनरपि गव्हर्नराच्या भेटीस जाऊं लागला. गव्हर्नरानीं त्याची नकारात्मक वार्ता ऐकून त्यास सांगितलें निराश होऊं नको, धीर धर; मी आहेना तुला मदत करावयास ? -  तूं नवीन छापखाना काढच; परंतु यंत्रसामुग्री मी इंग्लंडहून मागवून घेतों तोंपर्यत दम धर. तूं एक प्लॅन करून मला दाखवावयास घेऊन ये. ''

गव्हर्नराच्या या शब्दानीं बेंजामिन यास पुन्हां हुरूप आला. त्यानें छापखान्याच्या उभारणीं संबंधीचा एक आराखडा तयार करून गव्हर्नर यांस नेऊन दिला. गर्व्हनर तर खूष झाले. परंतु ते म्हणाले ' हें पहा, बेंजामिन, स्वत:च विलायतेंत जाऊन यंत्रसामुग्री आणली तर जास्त चांगलें होईल तूच जा यंत्रसामुग्री नीट पाहून पारखून घेऊन ये. विलायतेंतील छापखान्यांची पण नीट माहिती मिळवून तेथील कामांत चांगला तरबेज व निपुण होऊन ये. लौकरच येथून एक गलबत विलायतेस जाण्यासाठी निघणार आहे. तूं यास गलबतांतून जा. शुभस्य शीघ्र उगीच दिरंगाई कशाला ? करा एकदां स्वतंत्र उद्योगधंदा. करावयाचें ठरलें खरें - मग कां मागे घ्यावयाचें ?

बेंजामिननें हा नवीन अकल्पित विचार आपल्या स्नेहासोबत्यांस सांगितला. त्याच्या मित्रांपैकीं एकजण त्याचे बरोबर येण्यास तयार झाला. गव्हर्नर साहेबर इंग्लंडातील होकांस ओळखीचीं पत्रें देणार होते. बेंजामिन व त्याचा मित्र फिलाडेल्फिया येथून इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. परंतु गव्हर्नरच्या सहीचीं ओळखपत्रें निघतांना मिळाली नाहींत. गव्हर्नर म्हणाला मी न्यूयॉर्क येथें पत्रें मागून पाठवून देतों. परंतु न्यूयॉर्क येथें गेल्यावरही पत्रें आलीं नाहींत, इंग्लंडच्या गलबतावर नांवाचीं दोन तीनच पत्रे इंग्लंडमधील २/३ लोकांस बेंजामिनसाठीं लिहिलेले होतीं. परंतु निराळीं प्रशंसापत्रें बेंजामिन यास मिळाली नाहींत. बेंजामिन यास जरा चमत्कारिक वाटलें. परंतु तो धीराचा मनुष्य होता. निश्चय हा त्याचा स्नेही होता. तो डगमगला नाहीं. गलबत निघालें. समुद्रावरच्या लाटावरच्या लाटा खालीं वर होत होत्या त्याप्रमाणें बेंजामिनचें ह्दय आशा निराशांच्या लाटांनीं हेलकावत होतें. शेवटीं बरेच दिवसांनीं एकदांचें इंग्लंड आलें, बेंजामिन व त्याचा मित्र किना-यावर उतरले. ज्या देशांत, ज्या भूमींत त्यांचे पूर्वज १०० वर्षापूर्वी राहात हाते त्या भूमींत पाय ठेवतांना एक प्रकारचा आनंद बेंजामिन यास झाला.

बेंजामिन यानें भाडयाची एक लहानशी खोली घेतली. बेंजमिनबरोबर जो मित्र आला होता, तो घराहून पळून आलेला होता. बायको व मुलगा ह्यांस सोडून तो इंग्लंडमध्यें आला होता. त्यानें आपला उदरपोषणाचा भार बेंजामिनाबरच घातला.

बेंजामिन यानें तीं दोनतीन पत्रें त्या त्या गृहस्थांस नेऊन दिलीं - परंतु ते गृहस्थ म्हणाले ''हा गर्व्हनर फार लफग्या माणूस आहे - फारच लबाड''हे त्या गृहस्थांचे उद्दारर ऐकून विरघळला. ज्या पत्रांचा त्याला काडी इतकाही फायदा झाला नाहीं. अशा रीतीनें या फिलाडेल्फियाच्या गव्हर्नरानें बेंजामिन यांस परकी देशांत पाठवून त्यास बिकट परिस्थितींत ढकलले. इतर कच्या दिलाचा माणून तेव्हांच काय करावें अशा दु:खद खिन्न व निराशेच्या विचारांनीं गांगरून जाता. परंतु बेंजामिनचें ह्दय शूराचें होतें; परिस्थितीशीं झगडण्यास तो लहानपणापासूनच शिकला होता. परिस्थितीवर तो स्वार होऊन आपल्या इच्छित ध्येयाकडे जाण्यास तयार झाला.

बेंजामिन फ्रँकलिन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
प्रस्तावना 1
थोडा पूर्व इतिहास 1
जन्म -बालपण 1
जन्म -बालपण 2
जन्म -बालपण 3
आरंभीचे उद्योग 1
आरंभीचे उद्योग 2
आरंभीचे उद्योग 3
आरंभीचे उद्योग 4
फिलाडेल्फिया येथील हकीगत 1
फिलाडेल्फिया येथील हकीगत 2
फिलाडेल्फिया येथील हकीगत 3
फिलाडेल्फिया येथील हकीगत 4
इंग्लंडला प्रयाण 1
इंग्लंडला प्रयाण 2
स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 1
स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 2
स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 3
प्रयत्नांत यश:सिद्धि 1
प्रयत्नांत यश:सिद्धि 2
सार्वजनिक कामगिरी 1
सार्वजनिक कामगिरी 2
शास्त्रीय कामगिरी 1
शास्त्रीय कामगिरी 2
राजकीय कामगिरी 1
राजकीय कामगिरी 2
* अंत व उपसंहार 1
* अंत व उपसंहार 2