All books by author प्रबोधनकार ठाकरे
प्रबोधनकारांचे विचार आजही ताजेतवाने आहेत. त्यांचं संघर्षाने भरलेलं जीवन तर प्रेरणेचा अखंड प्रवाह आहे. विचारवंत, लेखक, इतिहाससंशोधक, पत्रकार, शिक्षक, वक्ते, नेते, चळवळे, फोटोग्राफर, संगीततज्ज्ञ, समाजसुधारक, धर्मसुधारक असे चहुअंगाने विकसित झालेले ते बहुढंगी वटवृक्षच होते. भिक्षुकशाहीच्या चिंधड्या उडवण्यापासून ते समर्थ रामदारांचं इंग्रजी चरित्र लिहिण्यापर्यंत आणि नाटक, पोवाड्यांपासून वैदिक विवाहविधीच्या संपादनापर्यंत त्यांची प्रतिभा स्वतंत्र विहार करत राहते. त्यामुळे आजच्या ठराविक वादांच्या चौकटीत बसवता येत नाही.