All books by author संत बहिणाबाई
संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनीं तिला गुरूपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिलें होतें. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत. तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे.