गणपती पूजनात तुळस निशिद्धा!!.
गणपती पूजनात काय असावे काय असू नये याचा उहापोह करताना दुर्वा ही सर्वाधिक प्रिय केवडा दवना सुगंधी फुलं आहेतच सर्वाधिक प्रिय जासवंद.. मात्र गणपती पूजनात तुळस कधी ही अर्पण करू नये असे म्हणतात.
प्रत्येक देवतेच्या काही आवडत्या आणि काही नावडत्या गोष्टी आहेतच मग हे का ठरले असावे याला पुराणात आधार असेलच तो मान्यच पण काही वैज्ञानिक आधार..
सगळ्या देवतांच्या पूजनात वापरात येण्याऱ्या वनस्पती औषधी गुणधर्मानी युक्त आहेत त्यांच्या उपयोगातून लाभ होतात कोणत्या वापरू नयेत यात जसे विज्ञान आहे तसे कोणत्या वापरू नयेत यात देखील विज्ञान आहेच.
गणपतीला तुळस वाहत नाहीत तर देवीच्या उग्ररुपाला दुर्वा वाहत नाहीत विष्णू प्रिया तुळस बाप्पाला का आवडत नसेल.
दोन गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी तिचे एकत्रिकारण वाईट ठरू शकते त्या वेगवेगळ्या च आपले अस्तित्व दाखवू शकतील.जसे तांब्याच्या भांड्यात पाणी अमृत होते मात्र त्याच भांड्यात दूध अमृतोमय विषासमान.. तसेच दुर्वा आणि तुळस यात परस्पर विरोधी गुणधर्म एक उष्ण तर दुसरी शीतल दुर्वा, एक मधुर तुळस तर दुसरी कटू, एक पित्तशामक तर दुसरी पित्त वर्धक मग अशा परस्परविरोधी गोष्टी एकत्र केल्या तर उपासना करणाऱ्या चे म्हणजे आपले नुकसानच आणि ते बाप्पाला अजिबात आवडणार नाहीच म्हणून हा नियम असेल कि गणपती पूजनात तुळस निशिद्धा. असे हे त्यामागील विज्ञान. हे कळल्यामुळं गणपतीउपासनेचा आनंद घेता येईल मनातील शंका दूर होवून ही अशी एक सेवा गजानन चरणी अर्पण!!
©मधुरा धायगुडे