मुलांचे संगोपन
मुलांचे संगोपन
प्रत्येकजण आपल्या मुलाची प्रशंसा करतो आहे. यापेक्षा कोणत्याही आईसाठी दुसरा आनंद असू शकत नाही. पण मुलाला या स्तुतीस पात्र बनवण्यासाठी मोठ्यांना काही कष्ट घ्यावे लागतात. ही काही साधी बाब नाही. वडिलधाऱ्यांच्या तोंडून जे काही बाहेर पडते, जे काही काम त्यांच्या हातून घडतात, त्या सगळ्याच मुले अनुकरण करतात. म्हणूनच मुलांच्या चांगल्या वाईटाला वडीलमंडळीच जबाबदार असतात. आपण मुलांना किंवा त्यांच्या समोर कधीही शिव्या देऊ नयेत, वाईट रागावून बोलू नये. नेहमी प्रेमाने पहावे.
आपण असं वागलो तरच मूल आपल्यावर प्रेम करायला शिकेल. जरा विचार करा बाजारातून मिठाई किंवा खेळणी आणल्यानंतर आपलं मुल इतकं आनंदी का होतं? आपण आणलेली भेटवस्तू लहान असते, पण त्यामुळे मुलाला होणारा आनंद ही त्याहून मोठी गोष्ट आहे. पण हो, आपण त्यांना जे काही देतो त्याचा त्यांच्या शरीरावर किंवा मनावर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. भेटवस्तू प्राप्त करून, मूल उदारता शिकते.
भेटवस्तू घेण्यापेक्षा भेटवस्तू देण्यात अधिक आनंद असतो हे ही आपण मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. कदाचित त्यामुळेच लहान मुलांना भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असे आपले वडीलधारी मंडळी सांगतात.
जगातील प्रत्येक गोष्ट मुलाला नवीन आणि अद्वितीय वाटते. म्हणूनच ते नेहमीच अनोखे प्रश्न विचारत असतात. हे प्रश्न ऐकून वडीलधरी काही मंडळी संतापतात त्यांना ओरडतात. पण असे कधीही करू नये. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे संयमाने द्यायला हवीत. मुलांना काहीतरी नवे शिकवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी इतर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अश्या अनेक गोष्टीबद्दल मी माझ्या लेखांमध्ये लिहिणार आहे.
मी सखी माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी असे अनेक लेख या मालिकेतून प्रकाशित करणार आहे.
सखी