शिवतांडवामागील विज्ञान
शिवाच्या नृत्याची दोन रूपे आहेत. त्यापैकी एक म्हणजे लास्य, ज्याला नृत्याचा सौम्य प्रकार म्हटले जाते. दुसरा तांडव आहे, जो विनाश दर्शवतो. भगवान शिवाच्या नृत्य अवस्था सृष्टी आणि विनाश या दोन्ही गोष्टी स्पष्ट करतात. शिवाचे तांडव नृत्य विश्वातील मूलभूत कणांच्या चढ-उतारांचे प्रतीक आहे.
नटराजाची मूर्ती युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च अर्थात CERN प्रयोगशाळेच्या बाहेर ठेवण्यात आली आहे. नटराज मूर्ती आणि वैश्विक नृत्याबाबत कैपरा यांनी सांगितले की, वैज्ञानिक प्रगत तंत्रांचा वापर करून कॉस्मिक डान्सचे म्हणजेच वैश्विक नृत्याचे प्रारूप तयार करत आहेत. कॉस्मिक डान्स म्हणजे भगवान शिवाचे तांडव नृत्य, जे विनाश आणि सृष्टी या दोन्हींचे प्रतीक आहे. जर आपण शिवाच्या नटराज रूपाकडे लक्षपूर्वक पाहिले तर आपल्याला त्याच्याभोवती एक वर्तुळ दिसेल, हे चक्र कृष्णविवराचे (black hole) प्रतिनिधित्व करते, चक्रातून बाहेर येणाऱ्या ज्वाला (fire) आणि पदार्थ (matter) दर्शवितात, अग्नी दरम्यानचे अंतर निर्वात पोकळीचे(vacuum space) प्रतिनिधित्व करते.
तर या विश्लेषणावरून आपण असा अंदाज लावू शकतो की शिवाच्या तांडवांच्या कंपनांमुळे विश्वाची निर्मिती झाली. विज्ञानाला शिवाचे तांडव कॉसमॉस डान्स म्हणून माहीत आहे की फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे?