अंधार आणि जीवन....
बघावा जिकडे नजर उठोणी
तव क्षणी अंधकार होतांना,
आज पाऊले संथ होती
रुक्ष वाटेवरून चालतांना....
निराश होऊनि हरवून जाता
पाऊलखुणा त्या वेचतांना,
उन्हाच्या तप्त सागरी
अंग सारे पोळतांना...
फाजील तो आत्मविश्वास
उगाच वाटे दौडतांना,
भासती सारीच मज
स्मशानात नेतांना....
मी जाणतो आहे त्यांना
शब्दांचे होकार देतांना,
हवेच्या झुळके सरशी
अलगद दूर होतांना...
संजय सावळे