भाग १
प्रेम तर ती सुद्धा करायची, ते सुद्धा जीवापाड फरक फक्त एवढाच होता कि, तिच प्रेम हे वस्तीच्या चाळीमधील भिंतीपुरतं मर्यादित होत. आणि त्याच प्रेम हे या समाजाचे बंधन तोडणार असं होत. दोघांचं एकमेकांवर असणार प्रेम हे खूपच निराळं आणि वेगळं होत. पण या प्रेमावर असणाऱ्या मर्यादा आणि त्यांना दाबून ठेवणारा हा समाज या साऱ्या गोष्टी त्यांना अजून जवळ घेऊन येत होत्या. गोष्ट आहे मिहीर आणि अंजलीची, एकमेकांवर वेड्या सारखं प्रेम करणारे हे दोघे एकमेकांच्या इतके जवळ कधी आले हे त्यांना सुद्धा समजलं नाही. आणि जेव्हा या दोघांना याची जाणीव झाली तेव्हा त्यांचं प्रेम हे खूप चांगल्या पद्धतीने बहरून आलं होतं.
मिहीर Last Year ला होता आणि कॉलेजमधून Subject Clear साठी, सगळ्यांना एक प्रोजेक्ट दिला होता. याआधी कधी कोणी Study आणि कॉलेज प्रोजेक्टला एवढं Importance दिल न्हवत. पण आता Last Year असल्यामुळे सारेजण त्यांच्या त्यांच्या कामामध्ये Busy झाले होते होते. सगळ्यांनी आपले आपले विषय निवडून कामाला सुरवात केली होती. पण मिहीरची गाडी अजून तिकडेच अडली होती. त्याला समजताच न्हवत कि कोणत्या विषयावर काम करायचं ? आणि जरी विषय निवडला तर, कुठून सुरवात करायची, सगळा गोंधळ सुरु होता. संपूर्ण दिवस कॉलेजमध्ये घालवल्या नंतर डोक्यामध्ये तोच विचार करत मिहीर घराकडे वळला. नेहमी प्रमाणे ट्रेनला गर्दी होती, कशी बशी ठाणेनंतर मिहीरला बसायला सीट मिळाली. अजून सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये हाच विचार सुरु होता. घरी गेल्यावर आई कडून काही Suggestion मिळत आहे का ? म्हणून तिला कॉलेजमधील प्रोजेक्ट बद्दल सांगितलं. आईने २-३ विषय दिले खरे पण त्यावर काम करण्यासारखं काही नाही आहे असं बोलून मिहीरने ते विषय ड्रॉप केले. दुसऱ्या दिवशी मिहीर प्रोजेक्टच्या विषयाला घेऊन घराबाहेर निघाला. मोकळी हवा आणि एकांत मिळावा म्हणून मिहीर मरीन ड्राईव्हवर जाऊन बसला. तिकडे मिहीरच्या आजूबाजूला अनेक विषय त्याला दिसत होते. आपल्या कुत्र्या सोबत खेळणार लहान मुलगा, वय साठीकडे जरी वळलं असलं तरी सुद्धा एकमेकांवर प्रेम करणारे आजी आजोबा, दिवसभर डोक्यावर थेला घेऊन फिरणारा भेळ वॉल भैया, असेच अनेक विषय त्याच्या समोर खेळ करत होत. पण यांपैकी कोणताच विषय त्याच्या मनात उतरत न्हवता. मारिन ड्राईव्ह वर वेळ घालवल्यानंतर मिहीरने घरचा रस्ता गाठला. चर्चगेट वरून ट्रेन होती म्हणून मिहीरला आरामात बसायला सीट मिळाली होती. हळू हळू ट्रेन भरू लागली, आणि ट्रेन सुरु होणार तेवढ्यात एक मुलगी पळत येऊन मिहीरच्या बाजूला बसली. धावत आल्यामुळे धाप लागली होती, मिहीरने त्याच्या जवळ असणारी पाण्याची बॉटल तिला दिली, तिने सुद्धा कोणत्याच गोष्टीचा विचार ना करत मिहीरच्या हातामधील बॉटल घेऊन पाणी पिलं,
खरंच खूप Thank You, निघताना पाण्याची बॉटल विसरली आणि आता हि सगळी धावपळ, गडबडीमध्ये लक्षातच नाही आलं. त्या मुलीने तिच्या हातातली बॉटल पुढे केली.
अरे नाही ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तर बॉटल तुमच्याकडे राहूद्या, असं म्हणत मिहीरने ती बॉटल त्यामुलीकडेच ठेवायला सांगितली.
प्रवास जस जसा सुरु होत गेला, तसा मिहीर आणि त्यामुळे मधील संवाद वाढत गेला. खूप दिवसांपासूनची मैत्री असते त्या पद्धतीने दोघे एकमेकांसोबत बोलत होते. आणि या प्रवासामध्ये मिहीरने त्या मुलीला सुद्धा त्याच्या प्रोजेक्ट बद्दल सांगितलं होत. काय माहित तिच्या कडून जर एखादी चांगली Idea मिळाली तर, तिने सुद्धा मिहीरला २ -३ Idea दिल्या खऱ्या, पण जे रोज होत होतं तेच झालं या Idea सुद्धा मिहीरला आवडल्या नाही.
चला माझं स्टेशन आलं, परत भेटू जर अस काही घडलं तर, त्या मुलीने मिहीरला सांगितलं
Yes Sure पुन्हा नक्कीच भेटू, अशीच भेट झाली तर, मिहीर सुद्धा हसत हसत म्हणाला.
Btw मी तृप्ती, आणि तू ?
मी मिहीर,
घाबरत घाबरत, मिहीरने तृप्ती कडे तिचा नंबर मागितला, तिने सुद्धा मिहीरला नंबर दिला.
बघू वेळ मिळाला तर आपण पुन्हा भेटू,, असं बोलून तृप्ती तिच्या स्टेशनवर उतरली आणि निघून गेली.
ट्रेन सुरु झाल्यानंतर, मिहीरने लगेचच तृप्तीला Whatsapp वर मेसेज केला. आणि नंतर दोघांची अचानक झालेली भेट, एकमेकांसोबत बोलत बोलत पुढे सरसावली.
यानंतर तृप्ती आणि मिहीरची भेट होत गेली. मिहीरला अजून सुद्धा त्याचा विषय मिळाला न्हवता. आणि याच विषयाबद्दल तृप्ती आणि मिहीर मध्ये रोज बोलणं व्हायचं. मिहीरला मदत म्हणून, तृप्तीने त्याला एक पत्ता दिला आणि त्या पत्यावर येऊन तिला भेटायला सांगितलं. मिहीर सुद्धा नेहमी प्रमाणे तिला भेटायला गेला. रोजच्या भेटीच्या जागेपेक्षा हि जागा वेगळी होती. तृप्ती त्याला मीरारोड स्टेशनवर भेटली, आणि मिहीरला घेऊन ती एका वस्ती मध्ये गेली. वस्तीमधून चालत असताना मिहीरला थोडी फार त्या जागेची ओळख झाली होती. आणि इथेच मिहीरला त्याच्या प्रोजेक्टसाठीचा विषय मिळाला. मिहीरने वेश्यावस्तीवर शॉर्ट फिल्म करण्याचा निर्णय घेतला. नेहमीच्या विषयापेक्षा जरा बाहेर येत, स्वतःला एका चौकटींमधून बाहेर काढत मिहीरने हा निर्णय घेतला होता. आणि या विषयावर त्याने काम करायला सुरवात सुद्धा केली होती. कॉलेज झाल्यानंतर मिहीर नेहमी वेश्यावस्ती मध्ये जायला लागला. तिकडच्या वस्तीमध्ये जाऊन, प्रत्येक घरात जाऊंन त्याला शक्य असले तेवढी, माहिती काढण्याचा प्रयन्त करायचा. पण वेश्यावस्ती तीच मिहीरला कोणीच माहिती द्यायला तयार न्हवते. कारण कोणत्याच वेश्याला स्वतःला बद्दल असं कॅमेरा वर सांगणं योग्य वाटत न्हवत. इथे सुद्धा मिहीरने तृप्तीची मदत घेतली. मिहीरच्या वतीने तृप्ती तिकडच्या स्त्रियांसोंबत बोलायाला जायची. थोड्या फार प्रमाणात त्याला माहिती मिळाली होती, पण हि माहिती मिहीरच्या प्रोजेक्टसाठी खूप कमी होती. पुढे मिहीरने स्वतः एका चाळीमध्ये जाऊन काही स्त्रियांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत संवाद साधला.. आता एकच मुलगा रोज त्याच्या चाली मध्ये येत होता हे पाहून काही स्त्रिया स्वतः समोरून त्याच्या सोबत बोलायला आल्या, पण ते सुद्धा शरीर विक्रीच्या हेतूने. असेच दिवस जात गेले, मिहीरने जास्तीत जास्त माहिती जमा केली होती. आता शेवट टप्पा बाकी होता आणि तो म्हणजे, एका वेश्याचा Interview आणि सगळ्यात कठीण अशी हि गोष्ट होती. आणि यावेळी त्याच्या सोबत त्याला मदत करायला तृप्ती सुद्धा सोबत न्हवती. काही कामाच्या निमिताने तिला बाहेर जावं लागलेलं. आणि पुढील १ आठवडा तरी ती मुंबई मध्ये येणार न्हवती. मिहीरच असं रोज वेश्यावस्तीमध्ये येणं त्यामुळे आता त्याला तिकडच्या सारेजण ओळखीचे झाले होते. अगदी दुकानदार पासून तिकडचे लहान मुलं सुद्धा, मिहीरसुद्धा कधी कधी तिकडच्या लहान मुलांसाठी खायला घेऊन जायचा. मिहीरचा हा सारा उपद्व्याप जेव्हा पासून सुरु होता. तेव्हा पासून त्याच वेश्या वास्थीमधील एक मुलगी त्याच्या वर लक्ष ठेऊन होती. अनेक वेळा त्या मुलीने, मिहीरला त्यांच्या चाळीमध्ये बघितले होते. खुप वेळा मिहिरांसोबत बोलायचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण नेहमी काही ना काही आडवं येत राहून जायचं. नेहमी प्रमाणे चाळीमध्ये येऊन बसला होता, तिकडच्या लहान मुलांना त्याच्या लॅपटॉप वर काही तरी दाखवत होता.
चहा घेणार ? त्या मुलीने मिहीरला विचारलं
नाही नको, माझा झालाय चहा. मिहीरने त्या मुलीला उत्तर दिले.
मी रोज तुला इथे बघते, इथे कोणी राहत का तुझं ? कि सगळ्याच माणसांसारखं तू सुद्धा इथे, तुझी भूक भागवायला येतोस ? त्या मुलीने मिहीरला प्रश्न केला.
मिहीर हसत बोलला, असं काही नाही आहे मी एक कॉलेज Student आहे. कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे. आणि त्यासाठी मला एक प्रोजेक्ट करायचा आहे, आणि हि वेश्या वस्ती माझा विषय आहे.
आमच्या वस्तीवर प्रोजेक्ट ? इथे फक्त पोलिसांची रेड पडते बाकी काही नाही. त्या मुलीने हसत मिहीरला उत्तर दिले.
असं नाही आहे, हि सुद्धा इतर चाळीं प्रमाणे एक चाळ आहे. फरक फक्त एवढाच कि, इथली माणसं स्वतःच्या पोटासाठी या व्यवसाय करतात, आणि बाहेरच जग या व्यवसायाकडे एका वेगळ्या नजरेनी बघतात. मिहीरने त्या मुलीला उत्तर दिले.
मी अंजली, रूम नंबर १४ मध्ये राहते, त्या मुलीने स्वतःची ओळख मिहीरला करून दिली होती.
मी मिहीर, आता तर या चाळीमधील प्रत्येकाला माझ्याबद्दल माहित झालं असेल, गेले ३ आठवडे सारखा मी इथे येतोय. माहिती गोळा करतोय. आता माहिती तर मिळाली आहे. फक्त एक शेवटचा Interview मिळाला कि, मी मोकळा झालो. खूप साऱ्या आठवणी जोडल्या आहेत गेल्या ३ आठवड्यामध्ये, आता तर या चाळी मधील सारेजण माझ्या नावाने मला ओळखतात. आणि मी सुद्धा त्यांना तसाच ओळखतो...
एवढ्या दिवसांनंतर मिहीरने एखादया मुली सोबत एवढा संवाद साधला होता. तो सुद्धा बोलत राहिला आपण कोणासोबत बोलतोय, काय बोलतोय याच काहीच भान त्याला राहील न्हवत. एवढ्या दिवसानंतर एक मित्र भेटल्या सारखा, मिहीर अंजली सोबत बोलत होता. आणि अंजली सुद्धा तेवढ्याच शांतपणे मिहीरच बोलणं ऐकत होती.