अकाली मृत्यू
कॉलेजमध्ये एके दिवशी पापी असलेल्या मी कैलासाकडे जाण्याचा मार्ग विचारला. पण एका सद्गुणी मुलीने वैकुंठाचा रस्ता दाखवला. त्या रस्त्याने जाताना मी रस्ता चुकलो आणि प्रेमलोकात गेलो. पण ती माझ्यासोबत आली नाही. तिने मला मध्येच सोडले. माझ्या हृदयाच्या धमनी धमनीत प्रेमाचे कोलेस्टेरॉल साठले आणि मला हृदयविकाराचा झटका आला. मी स्वतःला अकाली मृत्यूच्या स्वाधीन केले.