भगवती देवी
या चित्रामध्ये देवीचे संहारक रूप दर्शविण्यात आले आहे. हि प्रतिमा भगवती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळ राज्यातील स्थानिक देवीची आहे.
पहिल्या दृष्टीक्षेपात, देवी तीक्ष्ण दात आणि रक्ताने माखलेल्या खंजीरासह उग्र दिसते. ती एक हिंस्र देवी आहे, जी राक्षसांचा वध करते आणि त्यांचे रक्त पिते.
पण मग आपण पाहतो की तिच्या उजवीकडे तिच्या पतीचे प्रतीक शिवलिंग आहे आणि डावीकडे तिचा मुलगा गणेश बसलेला आहे. अशा प्रकारे ती पार्वतीचे रूप आहे. याचाच अर्थ शक्तीचे हे स्थानिक स्वरूप आहे.