Get it on Google Play
Download on the App Store

शिव परिवार प्रतिमेचे रहस्य

शिवपरिवार

या चित्रात दाखवलेल्या कुटुंबात वडील, आई आणि दोन मुलगे आहेत पण हे काही सामान्य कुटुंबाचे चित्र नाही. हे देवाधिदेव भगवान शिवाचे कौटुंबिक चित्र आहे. तो डोंगरावर त्याची पत्नी म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती आणि त्याची दोन मुले गणेश अर्थात गजानन आणि भालाधारक कार्तिकेय यांच्यासोबत बसला आहे.

हिंदू धर्म किंवा हिंदुत्वाशी परिचित नसलेल्या व्यक्तीसाठी हे चित्र विचित्र असू शकते. एखाद्याच्या केसातून नदी कशी वाहू शकते? एखाद्याला हत्तीचे डोके आणि चार हात कसे असू शकतात? कोणी मोरावर कसा स्वार होऊ शकतो? ते ईश्वराचे प्रतिनिधित्व कसे करू शकतात? इतके देव कसे असू शकतात? परंतु हिंदू या संकल्पना सहजपणे स्वीकारतात , कारण ही चित्रे आणि मूर्ती लहानपणापासून पाहत ते मोठे होतात. त्यांना समजून घेण्यासाठी कोणत्याही तर्काचा अवलंब करावा लागत नाही. हे विचार पिढ्यानपिढ्या चालत आले आहेत. या माध्यमातून हिंदूंना देवत्वाच्या संकल्पनेची ओळख होते.

हिंदू धर्मात देवत्वाची संकल्पना आश्चर्यकारक आहे. इस्लामच्या उलटपक्षी, ते सत्य आहे. हि संकल्पना वनस्पती जगतापासून प्राणी जगतापर्यंत आणि मानवी जगापर्यंत विस्तारलेले आहे. ख्रिश्चन धर्माच्या उलट, हे केवळ एका विचार किंवा विश्वासापुरते मर्यादित नाही, अनेक देवता आणि देवी आहेत. हे सर्व देवाचे भिन्न भाग किंवा रूपे आहेत.

हा विश्वास किंवा संकल्पना या कथेतून अधिक स्पष्ट करता येते

एक दिवस जेव्हा शिव कुटुंब एकत्र बसले होते, मुनीवर नारदजी तिथे आले, ते जिथे जायचे तिथे ते काही ना काही आपत्ती निर्माण करायचे.

नारदजी म्हणाले, "तुमच्या श्रेष्ठ मुलासाठी माझ्याकडे एक आंबा आहे."

भगवान शिव पत्नी पार्वतीकडे वळून म्हणाले, " कोणता मुलगा अधिक श्रेष्ठ, मी हा निर्णय कसा घेणार?"

"चला, एक स्पर्धा आयोजित करूया." पार्वती म्हणाली, "हा आंबा त्याला दिला जाईल जो जगाची तीन वेळा प्रदक्षिणा करून प्रथम परत येईल."

"ठीक आहे तसे करूया!" भगवान शिव म्हणाले.

कार्तिकेय लगेच मोरावर स्वार होऊन आकाशाच्या दिशेने जाऊ लागला. त्याने संकल्प केला की तोच प्रथम जगाच्या तीन प्रदक्षिणा पूर्ण करेल. पण गणेश सुद्धा हलला देखील नाही. तो त्याच्या आई वडिलांसोबत बसून राहिला आणि उंदराशी खेळत बसला. कार्तिकेयने जगाला प्रदक्षिणा घातली, मग आणखी एक आश्चर्य! गणेश ने मात्र तसे केले नाही. पण गणेशजी डगमगला नाही.

जेव्हा कार्तिकेय तिसरी आणि अंतिम फेरी पूर्ण करणार होताच इतक्यात गणेशाने उभे राहून त्याच्या आईवडिलांभोवती तीन फेऱ्या केल्या आणि

"मी जिंकलो आहे" असे घोषित केले.

"माझे जग भावनिक आणि अंतर्दृष्टीपूर्ण आहे. हे जग गोल आहे, विशाल आहे आणि माझे जग मर्यादित आहे. दोन्ही खरे आहेत"

पण गणेश विचारतो,

"कोणते जग अधिक महत्वाचे आहे? प्रत्येक संस्कृतीत जग वेगवेगळ्या रूपात पाहिले जाते. काहींसाठी निराकार देवत्व आहे, काहींसाठी शारीरिक स्वरुपात देवत्व आहे. बरोबर कोण आहे?काहींच्या मते एकच जन्म आहे, पुनर्जन्म नाही. तर काही जण मानतात की आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो. कोण बरोबर आहे? या प्रश्नांना कोणतीही सार्वत्रिक उत्तरे नाहीत. ही उत्तरे संस्कृती सापेक्ष आहेत. ती उत्तरे विश्वास आणि श्रद्धा निर्माण करतात. विश्वास हा वर्तनाचा आधार आहे. या आधारावर, कोणीही कमी सहनशील नाही किंवा अधिक सौम्य नाही! म्हणूनच माझे जग अधिक महत्वाचे आणि सारगर्भित आहे! मिथक ही एक कल्पना आहे, जी माझ्या जगातील मंथनातून प्राप्त झाली आहे,

पौराणिक कथा, चिन्हे आणि विधींचा एक संच आहे, जो मिथकाशी संवाद साधतो. कल्पनांप्रमाणे, कथा, चिन्हे आणि विधी एखाद्या बाहेरील व्यक्तीला हास्यास्पद वाटू शकतात, परंतु विश्वास ठेवणारा व्यक्ती त्यांचा संपूर्ण अर्थ समजू शकतो. यातील प्रत्येक आकृती हिंदूंच्या मनात स्पष्ट भावना जागृत करते; पण जे हिंदू नाहीत ते ही भावना समजू शकत नाहीत; तसेच त्यांना तर्कसंगतपणे समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्नही नाही.

हेच कारण आहे की अहिंदूंना हे समजत नाही की शिवाच्या जटेमधून नदी का वाहते आणि त्याच्या पुत्राच्या धडावरती हत्तीचे डोके का आहे.म्हणून, एखाद्याने अशा विषयाकडे परानुभूतीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे आणि त्याचा खूप आवडीने अभ्यास केला पाहिजे. त्याच वेळी, हेही लक्षात ठेवले पाहिजे की अशा गोष्टी संस्कृतीच्या आत्म्याचा आरसा आहेत.

आधुनिक युगात माणसात सहानुभूतीचा मोठा अभाव आहे. प्रत्येक गोष्टीची चाचणी आणि चाचपणी केली जाते, सर्वकाही परिमाणाने मोजले जाते. कल्पना तेव्हाच मान्य केल्या जातात जेव्हा ते तथ्य आणि पुरावे आणि गणित आणि विज्ञान यांचे निकष पूर्ण करतात. पण आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तर्कशास्त्राच्या आधारे समजावून सांगता येत नाहीत. कमीतकमी जीवन, मृत्यू आणि देव यांच्या बाबतीत तरी नाहीच नाही.

मृत्यूनंतर काय होते, कोणाला माहित आहे? या प्रश्नाला वेगवेगळ्या संस्कृतींनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. प्रत्येक उत्तर हा विषय सापेक्ष सत्य आहे, म्हणून प्रत्येक उत्तर एक मिथक, एक कथा, एक विश्वास आहे.\

शिव हा देव आहे, परंतु तो एकमेव देव नाही. तो अनेक देवांमध्ये एक देव आहे. हिंदु जगतात ही गोष्ट सर्वमान्य आहे की देव एकच नाही; त्याचे एकच अस्तित्व नसते. त्याला पुरुषरुपी अस्तित्व सुद्धा नाही. आकृतीत दाखवल्याप्रमाणे, शिवाची पत्नी पार्वती देवी आहे, जीची स्थिती तिच्या पतीच्या बरोबरीची आहे. गणेश आणि कार्तिकेय दोन्ही देवता आहेत, ज्यांची स्थिती शिव आणि पार्वतीच्या खाली दाखवली आहे. गणेश अडथळे दूर करतो आणि कार्तिकेय असुरांविरुद्ध युद्धात देवांचे नेतृत्व करतो; पण जेव्हा शिव डोळे मिटतो तेव्हा संपूर्ण सृष्टी नष्ट होते. म्हणूनच शिवाला संहारक म्हटले गेले आहे आणि त्याला महादेव मानले गेले आहे.

पार्वतीला देवी मानले जाते कारण तिच्याकडे भीतीपासून प्रेमापर्यंत, वर्चस्वापासून करुणेपर्यंत सर्व प्रकारच्या अभिव्यक्ती आहेत. दुसरीकडे, शिवाच्या केसांमधून बाहेर पडणारी गंगा कनिष्ठ दर्जाची देवी आहे. तिचे देवत्व ती प्रतिनिधित्व करत असलेल्या नदीपर्यंत मर्यादित आहे.

खरंच, देवत्व निराकार आहे; पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी आकृतींची गरज आहे. प्रत्येक आकार अपूर्ण आहे, हा त्याचा स्वभाव आहे. कोणतीही आकृती स्वतः परीपूर्ण होऊ शकत नाही; परंतु देवदेवतांच्या सर्व अपूर्ण व्यक्तिमत्त्वांद्वारे आपण किमान देवत्वाची संकल्पना समजू तरी घेऊ शकतो.

 

 

शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य

महाकाल
Chapters
शिव परिवार प्रतिमेचे रहस्य