Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २

११.आपल्या स्वप्नात सूर्योदय होत असे पाहिल्‍यास- आपली कार्यसिद्धी होते. आपले जवळचे मित्र व भावंडे याची परिस्थिती बरी होईल.
१२.स्वप्नात सूर्य समुद्रातून उदयास येत आहे असे पाहिल्यास- आपल्याला सौख्‍यप्राप्‍ती होते. 
१३.स्वप्नात पहाट होत असे दिसल्यास- आपल्याला द्रव्‍यलाभ होतो, उद्योगवृद्धी होते, आरोग्‍यप्राप्ति होईल. हेच स्वप्न एखाद्या कैद्याने पहिल्यास त्या कैद्याची तुरूंगातून मुक्‍तता होते आणि द्रव्‍यलाभ होतो. 
१४.स्वप्नात विवाहित बायकांना सूर्यदर्शन झाल्यास- पुत्रलाभ होतो.
१५.स्वप्नात विवाहित बायकांना सूर्यास्‍त झालेला पाहिल्‍यास- कन्यारत्नाची प्राप्ती होते.
१६.हेच स्वप्न व्यापऱ्यांनी पाहिल्यास- व्‍यापा-यांचा व्यापारात नाश होईल.
१६.स्वप्नात सूर्य ढगाने झाकलेला पाहिल्यास- घरामध्ये आग लागू शकते.
१७.स्वप्नात आपण सूर्यकिरण पाहिल्यास- आपल्याला लाभ होईल.
१८.स्वप्नात सूर्यकिरणे अंथरूणावर पडलेली पाहिल्यास- आपल्याला रोग उद्धाभावेल.
१९.स्वप्नामध्ये आपल्‍या खोलीभर ऊन पडलेले पाहिल्‍यास- आपल्याला द्रव्‍यलाभ होईल, समाजात मान मिळेल, निपुत्रीकांना संतती इतर प्राप्‍त होतील.
२०.स्वप्नामध्ये सूर्यबिंबाला ग्रहण लागलेले दिसल्यास- फार वाईट समजले जाते, याचा अर्थ आपल्या आयुष्यात काहीतरी विघ्न येणार आहे.

स्वप्नफल- आकाशसंबंधी

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
प्रकरण १ प्रकरण २ प्रकरण ३ प्रकरण ४