प्रकरण २
११.विहीर भरून पाणी बाहेर वाहात असलेले दिसल्यास- द्रव्यनाश होतो. हे स्वप्न पुरूषांनी पाहिल्यास त्यांच्या मित्रांमध्ये व आप्तेष्टापैकी एकाचे मरण किंवा दुर्दशा प्राप्त होईल. हेच स्वप्न बायकांनी पाहिल्यास त्यांना वैधव्य प्राप्त होते किंवा पतीवर मोठे संकट येऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो.
१२.आपण विहिरीतून पाणी काढीत आहोत असे पाहिल्यास- द्रव्यलाभ होतो.
१३.आपण विहिरीतून पाणी काढत आहोत असे स्वप्न अविवाहिताने पाहिल्यास– अविवाहिताचे लग्न होऊन सासूकडून त्यास द्रव्यप्राप्ती होते.
१४.विहिरीतील पाणी गढूळ असल्सास- कष्ट प्राप्त होतील.
१५.दुस-यासाठी आपण पाणी काढीत आहोत असे पाहिल्यास– लोकांची सेवा करवी लागते.
१६.अंघोळ केल्याचे स्वप्नात पाहिल्यास– रोग होण्याची संभावना असते. अंघोळीचे पाणी जितके जास्त गरम असेल तितके कष्ट जास्त आयुष्यात येतात.
१७.विवस्त्र अंघोळ न करताच परतल्याचे स्वप्नात पाहिल्यास- आप्तेष्टामध्ये भांडण होऊन ते लवकरच शांत ही होईल असे समजावे.
१८.नितळ पाण्याचा तलाव, ओढा किंवा नदी स्वप्नात पाहिल्यास– आपल्या मनातील कार्य सिद्धीस जाईल, शरीरास आरोग्य प्राप्त होईल.
१९.तलाव, नदी,ओढा यांचे पाणी गढूळ आहे. असे पाहिल्यास- मनातील कार्य सिद्धीस जाणार नाहीत, शरीर रोगी होईल.
२०.स्वप्नात पाय धुताना पाहिल्यास– घरात क्लेश होतील.