Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १

१.आपल्‍याला एखाद्याने जमीनदान केलेले स्‍वप्‍नात पाहिल्‍यास- अविवाहिताचे लग्‍न होईल, विवाहितास स्‍त्रीकडून धनप्राप्‍ती होईल.
२.आपल्या जमिनीला हद्द नाही असे दिसल्‍यास- आपल्याला पैसा मिळेल. 
३.काळ्या मातीची जमीन स्‍वप्‍नामध्‍यें पाहिल्‍यास- कष्‍ट प्राप्‍त होतील.
४.स्‍वप्‍नांत जमीन हादरलेली पाहिल्‍यास– पाहणाऱ्याचा कार्यभंग होईल.
५.पायाखालची जमीन हादरलेली पाहिल्‍यास– पैशाचे नुकसान होईल. 
६.पर्वताचा कडा तुटून पडलेला स्‍वप्‍नात पाहिल्‍यास- एखाद्या प्रसिध्‍द मनुष्‍याचे नुकसान होईल.
७. आपल्या ओळखीचे एखादे शहर भूकंपाने उद्ध्‍वस्‍त झालेले पाहिल्‍यास– आपण राहत्या भागात दुष्‍काळ पडेल. 
८.शहर आपल्‍यास माहीत नसल्‍यास- आपले आप्तेष्ट राहतात त्या शहराचे नुकसान होईल.
९.जमीन उत्तम पिकाने भरलेली स्‍वप्‍नात पाहिल्‍यास– धनलाभ संभाव असतो.
१०.परसदारात भाजीची अळी लावलेली पाहिल्‍यास– संकटांना आमंत्रण असेल..

स्वप्नफल- भूमी संबंधी

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
प्रकरण १ प्रकरण २ प्रकरण ३ प्रकरण ४