श्री सुंदर नारायण गणेश, देवबांध, मोखाडा, ठाणे.
ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुका म्हणजे आदिवासी व कुपोषित अनारोग्याचा डोंगराळ भाग म्हणून ओळखला जायचा
धर्माच्या मार्गातून परिसर सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न म्हणून येथे सुंदरनारायण गणेशाची स्थापना केली गेली
१२ फेब्रुवारी १९८६ साली देवबांधला गणेशाची विधिवत स्थापना केली गेली
गणेशाची बैठी पंचधातूची ध्यानस्थ अशी ही मूर्ती आहे ही मूर्ती अलंकार वधिष्ट असून उंदरा भोवती सर्प मेखला आहे
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी लोकांना शुचिर्भूत होऊन आणले जाते. त्यातूनच व्यसनमुक्तीचे कार्य घडते.
तिथे औषधोपचार विनामूल्य केले जातात. औषधांचे वाटप देखील आदिवासींना केले जाते.
इतर समजोपयोगी कार्य देखील येथे घडवून आणली जातात. मंदिरासमोर सामुदायिक विवाह देखी संपन्न होतात.
जव्हारपासून व इगतपुरीपासून हे मंदिर केवळ ४५ किलोमीटरच्या अंतरावर आहे
एका दिवसात मुंबईला परतता येईल असे देखील आहे.
मुंबई कसारा रेल्वेने व नंतर एसटी बसने प्रवास करावा लागतो.