कविता एक कला आहे......
अलगदपणे सुचण्याची,
सुचलेलं कागदावर उतरवायची,
मुक्तपणे व्यक्त होण्याची,
वाचणार्याचं मन जिंकण्याची,
थोड्या शब्दात खूप काही सांगण्याची,
आपले विचार मांडण्याची,
प्रेम व्यक्त करण्याची,
अनोळख्याशी संवाद साधण्याची,
भरकटलेल्या मार्ग दाखवण्याची,
काहीवेळेस जनजागृती करण्याची,
तर काहीवेळेस प्रेरणा देण्याची,
यापलीकडे ही जाऊन
कविता एक कला आहे,
जे शब्दात सांगता येत नाही ते कवितेतून सांगण्याची...........
सानिका सुतार