आजचं सत्य....
लोक बदलली खरी,
पणं विचार....
अजूनही मळले आहे,
फॅशन बदलली जुनी,
आज ही लोकांना ,
भूतांनी जखळले आहे ,
लोक म्हणतात,
लोक सांगतात आम्हाला ,
असे प्रसंग आमच्यासोबत,
लई रे घळले आहे,
पुर्वज हीचं अमृतवाणी,
जगात पेळले आहे,
जाळ टाकला विरोधकांनी,
भूतांच्या कहाण्या सांगून,
जग त्यात पळले आहे,
मेंदूच्या कोप-यातले,
विचारांचे अर्क वितळले आहे,
विनाकारण हे,
उगाचचं रडणे आहे,
भूतवैगरे काही नाही,
आजतरी..
जगाला हे कळने आहे,
म्हणे तो तरूण मला,
भूतांना पाहून आमचे,
काळीज जळले आहे,
भूतांनी नव्हे,
माणसाला विचारांनी,
छळले आहे,
समाजांत जगतांना या ,
आज मला हे कळले आहे...
- महेश नामदेव तिवाडे