भरू आयुष्यात रंग
भरू आयुष्यात रंग
आयुष्य रंगीत करू
उधळीत स्वप्न रंग
आनंदीत होळी करू ॥
रेलचेल जिव्हाळ्याची
नात्यांना देऊ उभारी
निसटलेल्या क्षणाची
दिवाळी करू साजरी ॥
भरकटलेल्या मना
हळूच कवेत घेऊ
दोन प्रेमाच्या शब्दांनी
सौख्याचा रंग उधळू॥
गोंजारता आयुष्याला
हळूच कवेत घेऊ
पांघरताना वात्सल्य
सुखस्वप्न मार्गी लावू ॥
सौ.अर्चना जितेंद्र परदेशी
लासलगाव